💸 सोनारच श्रीमंत का ?💸


1) स्वतचे शुन्य रुपये भांडवल लावता लोकांकडून दरमहा एक हजार किंवा त्या पेक्षा ही पैसे जमा करण्याची स्किम मध्ये आपलेच पैसे आपल्या ला व्याजने किंवा त्याचे सोने दिले जाते
यावर सरकारी व पोलिस कायदेशीर नियंत्रण पाहिजे कारण एखादा सोनार आर्थिक बुडाला खुप लोकांचे नुकसान होईल
2)साध्य सराफी दुकान बंद आहे कारण सरकारने आणलेल्या नविन कायद्या मुळे अनैतिक (गैरव्यावहार ) कोणालाही करता येणार नाही पण बंद चे कारण असे सांगतात की एक टक्का कर लावणार आहे म्हणून पण तो तर ग्राहक देणार आहे ना मग सराफाच्या खिशातून थोड़ी जाणार आहे
आणि खरच सराफाना ग्राहकांची इतकी काळजी आहे का ?
3)आपण आपली सोन्याची वस्तु पॉलीश ला देतो तर त्यातील पॉलीश झाल्यावर आपले सोने नक्कीच कमी भरते
हे कोणालाही माहित नाही कारण ज्या आसिड मध्ये टाकले जाते ते सोन्यातील काही अंश सोने वितळून खाली जाते पण वस्तुचा आकार तसाच राहतो व ते वितळलेल सोने आपल्यास दिले जात नाही उलट पॉलिश ची मजूरी पण घेतात
4)बहुतेक लोक सोनाराकडे महिन्याची एक हजार किंवा त्या पेक्षाही जास्त ची पावती लावतात कोणतीही सिक्युरिटी आपण त्या कडून न घेता देत असतो हे सरकार मान्य आहे का किंवा याचे कुठे रजिस्टर केले जाते का हे सरकारी नियामत आहे का ?
आपण जे पैसे देती त्यावर स्वतःचे भांडवल म्हणून उपयोग करतात काही पैशाचे सोने घेतात व बकीच्या उरलेले पैसे तुमच्या आमच्या गरजू व्यक्तीला 5 ते 10 ℅ टक्याने सिक्युरिटी घेऊन मगच व्याजाने देतात
5)आपण जर एक हजार रुपये त्याकडे मागितले तर सराफ लगेच सिक्युरिटी मागतो मग तरी आपण देताना कोणतीही सिक्युरिटी घेत नाही इतका अविश्वास का ?
6)सोने घेताना जर दागिने घेतला तर 22 क्यारेट सोने म्हणून देतात व 3 ℅ मजूरी असे आपल्या कडून घेतले जाते व हेच सोने मोडायला गेल्यावर लगेच घट हा प्रकार 10 ते 20 ℅ पर्यन्त आपल्यावर लादन्यात येतो म्हणजे आपल्याला 10 ते 20 ℅ सोन्यात फसवलेले असते
7)स्री वर्ग मंगलसूत्र किंवा पोत यात मनी टाकतात किंवा आहेरात देण्या साठी घेत असतात त्या वेळेस सांगितले जाते की मणि ला मजूरी नाही पण आपणास कोणास माहित नसते की मणि च्या आत मध्ये लाख असते व त्या शिवाय मणि ला आकार येत नाही पण त्याच्या आत मध्ये लाख ही बहुता अंशी तशीच असते व तिच्या वजना सह आपल्यास विकल्या जाते यात सराफाचा खुप मोठा फायदा होत असतो
8)सराफांच्या म्हनण्या नुसार एक ग्राँम ला 30 रुपये ते 50 रुपये नफा मिळतो आणि दुकानात कमीत कमी 10 ते 15 लोक कामाला ठेवलेले आसतात एका दिवसांचा दुकान खर्च कमीत कमी 20 ते 30 हजार रुपये असतो मग इतक्या कमी नफ्यात इतका मोठा खर्च रोज कसा निघतो म्हणजे रोज किती किलो सोने विकल्या जाते
उदा. :- चहा विक्रित 50 ℅ नफा आहे व चहा रोज सर्वजन पित असतात तरी ही तो गरीबच आहे व राहतो मग सोने असे किती विकल्या जाते की इतका मोठा खर्च करुण सुद्धा सराफ श्रीमंत कस काय हे रहस्य सर्वाना कळाले पाहिजे
9)सध्या पान टपरी पेक्षा सराफी दुकाने जास्त झाली आहेत म्हणजे यात नक्कीच मोठा फायदा असणार आहे
10) सर्वानी सराफाचि महिन्याची पावती बंद करा दोन ते तीन महिन्या तुम्हाला दुकान अर्धा माल दुकानात दिसेल किंवा बंद झालेले दिसेल कारण खुपशा सोनरानी लोकांचा पैसा रियालइस्टेट मध्ये लावलेला आहे व ते क्षेत्र सध्या मंदीचे आहे रोज जे लोक पैसे देतात त्यावर हे साईकल चालू आहे हे कधिही बंद पडू शकते त्या पेक्ष्या सरकारी बैंक मध्ये सुद्धा आशा स्किम आहेत त्यात गुंतवा म्हणजे देशाचे कल्याण होईल
11)स्री वर्ग पायातील पैजन जेव्हा घेता त्या वेळेस पूर्ण वजनाच्या चांदीचे व मजूरी घेतली जाते पण मोडायला गेल्यास फक्त ५०℅ रक्कम मिळते म्हणजे त्यात ५०℅ मिक्स आहे हे सोनाराला माहित असते पैजन मध्ये बनवताना चांदी सरखा दिसणार KDM नावाचा ६ ते ७ रुपये ग्राम चा धातु मिक्स केलेला असतो व आपल्या कडून घेताना पूर्ण चांदीचे पैसे घेतले जातात
12)दिवाळी व दसरऱ्याला सात ते दहा लाखांची फोरव्हीलर कर गिफ्ट केलि जाते म्हणजे किती मोठा प्रॉफिट यात मिळणार असतो कारण घर घालून कोणी धंदा करात नाही
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार