उद्योग किंवा व्यवसाय कसा सुरु करायचाजेव्हा नोकरी शोधताना पगारासाठी कुठलीही नोकरी शोधता तेव्हा तुम्ही द्विधा मनस्थितीत नसतात मग उद्योग चालू करतानाच का तुम्ही द्विधा मनस्थितीत येता? तेव्हा का नाही तुम्ही कुठलाही उद्योग सुरु करून त्यामधून महिन्याची नियमित उत्पन्न सुरु करत? तुम्हाला महिनाभर साहेब जितका वेळ सांगेन तितका वेळ काम करावेच लागते त्यानंतरच तुम्हाला पुढच्या महिन्यात पगार भेटेल तसेच उद्योगाचेही आहे, तुम्हाला ठराविक रक्कम आगाऊ घेवून आपले काम सुरु करायचे असते व ठराविक वेळेत ती वस्तू किंवा सेवा समोरच्या ग्राहकाला द्यावी लागते. नोकरीतील चुका ह्या साहेब खपवून घेत नाही व वस्तू किंवा सेवा ह्यामधील चुका ग्राहक खपवून घेत नाही. उद्योग किंवा व्यवसाय करणे हे नोकरी करण्यापेक्षा कितीतरी पटीने सोपे आहे. 

१) कुठल्याही एका वस्तू किंवा सेवेची कल्पना करा
२) किमंत ठरवण्यासाठी पुढील बेरीज करा
कच्चा माल किंमत + जागेचे भाडे + विजेचा खर्च + कर्मचारी किंवा कामगार यांचा पगार + (ऐच्छिक कर्जाचे हफ्ते) * कमीत कमी २५ % नफा = एकूण उत्पन्न.
३) जिथे आर्थिक बाजू येते तिथे मानसिक आणि भावनिक दृष्ट्या मजबूत राहावे लागते, कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय हा मानसिक व भावनिक कमजोरीने नाही करता येत.
४) कमीत कमी ३ ते ५ किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी उद्योगाचा विचार करावा.
५) उद्योग किंवा व्यवसाय हा तोट्यात चालला असेल तर त्यावर आपण खालील पर्याय करू शकता
अ) कर्मचारी यांच्यावर जास्त गुंतवणूक करावी व तज्ञ अनुभवी कर्मचारी ठेवावे. (कायमची गुंतवणूक.)
ब) आमच्यासारख्या तज्ञ लोकांची मदत घ्यावी. (ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक व नंतर तासानुसार गुंतवणूक)
क) उद्योग दुसऱ्या उद्योगपतीला विका
ड) जास्त तोटा होण्याअगोदर उद्योगातून बाहेर पडा व दुसरा उद्योग सुरु करण्याच्या मागे लागा.


आयुष्यात मरेपर्यंत एक गोष्ट लक्ष्यात ठेवा तुम्ही पैश्याने गरीब झालात तर चालेल ती आज नाही उद्या कमी भरून काढू शकतो पण जर मनाने गरीब झालात तर तुमचे आयुष्य व तुमच्या पुढील पिढीचे आयुष्य धोक्यात येईल. स्वतःपुरता विचार नका करू नेहमी ७ पिढ्यांचा विचार करून ठेवा.


मी लोकांना पहिले मानसिक दृष्ट्या सक्षम करतो जेणेकरून भविष्य उ
ज्वल होते. तुमचे उद्योगाच्या दिशेने एक पाऊल तुम्हाला मानसिक गुलामीतून मुक्त करते व मर्यादा ओलांडायला लावते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो, त्यानंतर मी माझे काम चालू करतो.

उद्योजक कुठल्याही शैक्षणिक संस्थेतून निर्माण केला जावू शकत नाही, त्याला स्वतःच्या मनात विचारात आणि कृतीत स्वतहून बदल करावा लागतो. कृती म्हणजे तुमचे पंख आहे तुम्ही जेवढे कृतीचे पंख वापरून मजबूत कराल तेवढ्या उंच स्वप्नांच्या आकाशात तुम्ही भरारी मारू शकतात.

लक्ष्यात ठेवा गर्दी फक्त पायथ्याशी असते, शिखरावर खूप कमी लोक असतात.


भीतीचा सामना करा,
भविष्य उज्वल करा,
जे उत्तम आहे त्यावर तुमचा हक्क आहे,
भीतीच्या पलीकडे अमर्याद आयुष्य तुमची वाट बघत आहे.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार