जेव्हा कुंभाराला मडके बनवायचे असते तेव्हा तो ओली माती वापरतो, कारण ओल्या मातीचा गुणधर्म लवचिक असून ती कुंभार जो आकार देईल तो ती धारण करते, ह्यामध्येही वेळेला व भौतिकशास्त्राच्या नियमाला खूप महत्व असते, तुम्हाला ओली माती सुकन्याअगोदर तिला आकार द्यायचा असतो आणि जर कुंभाराची हि वेळ चुकली तर तो सुबक असा आकार नाही देवू शकत. असेच काही बालकांचे आहे, त्यांच्या आयुष्याला सुंदर आकार देण्यासाठी तुम्हाला गर्भापासून ते ७ वर्षापर्यंत संस्कार करावे लागतात, जर तुम्ही ह्या वयात मुलांना घडवण्यात चुकलात तर एखादवेळेस मातीचे भांडे परत तोडून ओली माती करून नवीन बनवता येईल पण हाच नियम सजीव मनुष्य प्राण्याला लावू शकत नाही, ह्यासाठीच मी बालक पालक आणि कुटुंब हे नवीन फेसबुक खाते बनवले आहे, वैज्ञानिकंच्या मते ज्या घरतील वातावरण मैत्रीपूर्ण, सकारत्मक असते त्या घरची मुले हि आयुष्यत लवकर जम बसवतात. निर्णय आपल्या हातात.
धन्यवाद
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७


Previous
Next Post »
0 आपले विचार