परीक्षेच्या कालावधीत मुलांची स्मरणशक्ती वाढवून उत्तम मार्क कसे पाडायचे?



अनेक पालक सध्या माझ्याकडे मुलांच्या शिक्षणासंदर्भात तक्रारी घेवून येतात. अनेक पालक हे आता परीक्षा जवळ आली म्हणून अगदी घाई मध्ये येत आहे. त्यांना त्यांच्या मुलांच्या नापसाची भीती सतावत आहे आणि ह्यामुळे घरातील वातावरण देखील तणावपूर्ण बनत आहे.

ह्यामुळे नवरा बायको, कुटुंबातील इतर सदस्य ह्यांच्यामध्ये भांडणे होत आहेत. म्हणजे वर्षातील आणि आयुष्यातील १० दिवसांच्या परीक्षेसाठी अनेक कटुता निर्माण होत आहे. आणी ह्या भांडणामुळे जोडीदारावर सर्व राग काढला जात आहे. अगदी लहान सहान चुका देखील मोठ्या करून सांगितल्या जात आहे.

शेवटी हाच ताण तणाव मानसिक आणि शारीरिक आजारात रुपांतरीत होतो. मग कुटुंबात सुखसमाधान आणि आरोग्याची जागा हि आजारपण ताण तणाव घेते.

फक्त एका परीक्षेसाठी आयुष्यात आणि कुटुंबात इतके तणाव आणण्यापेक्षा तज्ञांची मदत घेतलेली बरी. सर्वच उपाय आणि घरी करू शकत नाही आणि जर ह्या नकारात्मक भावना साठत गेल्या तर त्यामधून नकारात्मकताच बाहेर येईल. ह्यामुळे अनेक मुल यशस्वी देखील होतील पण ते फक्त बाह्य स्वरूपाने ना कि अंतर्मनाने. त्यांना सतत त्यांचे अंतर्मन, भावना आणि विचार हे आतल्या आत खात जातील.

इतके करण्यापेक्षा घरचे वातावरण हे आनंदी ठेवा. जास्त दबाव निर्माण करू नका. बंधने मर्यादेत आणा. जेव्हा देखील मुल अभ्यास करत असेल तर हळूच आपल्या जोडीदारासोबत बोला कि "मुलगा खूप हुशात आहे, आरामात पास होईल." हाच विचार तुमचा मुलगा पकडून ठेवेल व जरी मन लावून अभ्यास नाही केले तरी त्याच्या लक्ष्यात राहील कारण तुम्ही दाखवलेला विश्वास. विश्वास चमत्कार घडवतो.

त्याच्या नकळत त्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवा. कुठे अडत असेल त्यावर उपाय शोधा. समजण्याचे एक नाही तर अनेक मार्ग आहे त्यापैकी तुमच्या मुलाला जो मार्ग सोयीस्कर वाटल किंवा ज्या मार्गाने समजेल, अंतर्मनात रुजेल त्या मार्गांचा वापर करा.

घरातील परीक्षेमुळे दुषित झालेले वातावरण काढून टाका. वास्तू शांती, वास्तू पूजा, यंत्रे ह्यांचा वापर करा. माझ्या स्पर्श उर्जा शास्त्राचा देखील वापर करू शकता. हे सर्व शास्त्र तुम्हाला तुमचे घर, शरीर शुद्ध करायला मदत करते व शुद्ध वातावरणात सकारात्मकता, भाग्य आणि चमत्कार निर्माण होवून तुम्हाला हवा तो रिझल्ट भेटतो.

संमोहन देखील उत्तम शास्त्र आहे, ह्याचा वापर करून देखील तुम्ही तुमच्यात आणि तुमच्या मुलांमध्ये प्रोग्रामिंग करून घेवू शकता ज्यामुळे त्यांना परीक्षा पास होण्यास मदत होते. संमोहन शास्त्र आणि वरील शास्त्र ८० % रिझल्ट देतातच. हे शास्त्र तेव्हाच वापायचे जेव्हा मी वर सांगितल्याप्रमाणे देखील सकारात्मक परिणाम येत नसतील तर.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जर परीक्षा तुमच्यासाठी समस्या असेल तर त्या समस्येवर मात करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मी जे वर उपाय सांगितले आहे त्याचा वापर दीर्घ कालावधीसाठी नका करू. वरील मार्ग फक्त उत्तेजन दिल्यासारखे आहे, ह्या मार्गाचा वापर फक्त जेव्हा कुटुंबात ताण तणाव वाढतो तेव्हाच करायचा आहे आईन त्यानंतर लगेच तज्ञांची भेट घ्यायची आहे. कायमस्वरूपी बदलासाठी दीर्घकाळ तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करावे लागतात.

परीक्षा पास होणे सोपे आहे पण हे जे नकारात्मक विचार आणि भावना येतात ह्यामुळे हुशार विद्यार्थी देखील येत असून सुधा नापास होतो किंवा स्वतःला कमी मार्ग पाडून घेतो. तुमची मुल हि नैसर्गिक हुशार आहे. जर नैसर्गिक मार्गांनी ते यशस्वी होत असतील तर होऊ द्या, फक्त घरचे वातावरण ठीक ठेवा नाहीतर घरच्या समस्यांमुळे मुलांवर परिणाम होतो किंवा ते परिणाम करून घेतात.

वरील मार्गांचा अवलंब करा, तुमच्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि सोबत तुम्हाला देखील. तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठीक ठेवण्यात मदत होईल.

appointment बुक करून तुम्ही माझ्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेवू शकता. ह्या कालावधी मध्ये रीस्पोंस जास्त असल्यामुळे जो पहिला येईल त्याला अटेंड केले जाईल.

अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक : Balak Palak Children Parents

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही?



उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव
मराठी आणि परप्रांतीय मधील फरक
मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही?

एक परप्रांतीय मुंबई मध्ये येतो. त्याच्याकडे काहीही नसते. पोट भरायला आणि आपले कुटुंब चालवायला काहीतरी करणे गरजेचेच आहे.

एक मराठी मुंबई मध्येच राहतो, सर्व सुखसुविधा आहेत. पोट भरण्यासाठी तर बोलू शकत नाही पण नोकरी सोडून पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो.

परप्रांतीय धंद्यासाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न करतो. जास्त व्याजावर पैसे घेतो. धाडस दाखवतो. जास्तीत जास्त काही हजारांसाठी त्याला जास्त व्याज द्यावे लागते.

मराठी धंद्यासाठी घरातून पैसे घेतो. काहीही व्याज द्यायची गरज नाही. घरचे मुलगा आयुष्यात जम बसवेल ह्याचे स्वप्न बघत बसतात.

परप्रांतीय गरीब आणि दिसायला बारीक पण (पण चे उत्तर खाली भेटत जाईल)

मराठी दिसायल सुखवस्तू कुटुंबातील धडधाकट पण (उत्तर खाली भेटत जाईल)

एक व्यवसायाच्या उदाहरणाने सांगतो

परप्रांतीय पाणीपुरीची घाऊक विक्रीसाठी असलेली गोनी विकत घेतो, टेबल कोणीतरी देतो, एक केटरिंग चा व्यवसायिक त्याला पाणीपुरी साठी लागणारा माल बनवून देतो. ह्यासाठी त्याने सुरवातीला थोडे पैसे दिलेले असतात कारण त्यालाच तितके पैसे व्याजाने भेटलेले असतात. दुकान भाड्याने घेवू शकत नाही म्हणून तो रस्त्यावर एका चार रस्त्याच्या कडेला जागा शोधून ठेवतो.

मराठी जास्त भाडे असलेली जागा विकत घेतो. पूर्ण चकाचक दुकान करतो. फर्निचर वर पैसे खर्च करतो. माल जास्त पैसे घेऊन विकत घेतो. सगळीकडे फक्त पैसा ओतत जातो.

आता खरी सुरवात होते.

परप्रांतीय पाणीपुरी १० रुपये प्लेट ने विकायला सुरवात करतो. बघता बघता माल संपतो. त्याच्याकडे पैसे येतात.

मराठी दुकानाचे उद्घाटन समारंभ करतो. लोकांना बोलावतो. लवाजमा गोळा करतो. गिर्हाईक तर नाही पण कुटुंबातील आणि परिचयातील लोक असतात. ह्यावरच जास्त पैसे खर्च होवून जातात. त्या दिवशी एकही गिर्हाईक येत नाही तर समारंभाला जास्त पैसे खर्च होतात. तिथे पाणीपुरी तो ३० रुपयांना ठेवतो. सगळीकडे फक्त शो असतो व्यवसाय दिसत नाही.

परप्रांतीय पाणीपुरी च्या जास्तीत जास्त प्लेट विकतो. बघता बघता नफा वाढू लागतो ते देखील काही दिवसातच. नेहमीचे गिर्हाईक देखील इतक्या कमी वेळात तयार होतात.

मराठी फक्त ग्राहकांची वाट बघत असतो. फक्त नवीन दुकान आहे म्हणून काही म्हणजे बोटावर मोजता येईल इतके ग्राहक येतात. पाणीपुरी च्या प्लेटी विकल्याच जात नाही. बघता बघता तोटा वाढत जातो, परत त्यामध्ये पैसे टाकले जातात, पण तोटा वाढण्याचे थांबत नाही. नेहमीचे ग्राहक तयारच होत नाही आणि असले तरी खूप कमी किंवा जे काही स्वस्तात भेटेल त्यासाठी किंवा जास्त वेळ बसायला भेटते म्हणून येतात.

परप्रांतीय व्यवसायिकामुळे अनेकांचे व्यवसाय चालतात. म्हणजे पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारे सामान व जे काही गरजेचे आहे ते सर्व व्यवसाय चालतात, त्यांचा माल खपायला लागतो, पैश्यांची देवाण घेवाण होते. त्याच्यासोबत सर्व उद्योग व्यवसायाची शृंखला सुरु होते. हफ्ते किंवा लाच देखील जायला लागते ज्यामुळे त्यांना देखील आर्थिक फायदा होत जातो.

मराठी मुळे फक्त एकदा सुरवातीला दुकान चकाचक करायला इतर व्यवसायिकांना फायदा होतो पण जो महत्वाचा खाद्य पदार्थाचा व्यवसाय आहे त्या शृंखलेला काहीही फायदा होत नाही. म्हणजे एकप्रकारे फक्त लघु कालावधी साठी फायदा होतो.

परप्रांतीय व्यवसाय करायला जितकी जागा लागते तशीच जागा शोधतो आणि तिथे कायमस्वरूपी आपले बस्तान बसवतो. मग ती जागा एखाद्या दुकानासमोरची का असेना. नफ्या तोट्याचे गणित तो योग्य मांडतो आणि नफा घेवूनच जातो.

मराठी फक्त मोठ मोठी जागा शोधण्यात गुंग असतो आणि पैसे असल्यामुळे तो बिनधास्त असतो पण हाच पैसा सतत भाडे भरून दुकान चकाचक करण्यात कधी निघून जातो तेच समजत नाही. म्हणजे व्यवसाय तर उभा राहतच नाही आणि फक्त पैसे जात असतात. त्यापेक्षा फिक्स डीपोझीट मध्ये टाकलेले किंवा स्वतःवर उडवलेले बरे.

नवीन परप्रांतीय जुन्या परप्रांतीयाचे बघून दुसऱ्या खाद्यपदार्थाचे तसेच टेबल रुपी दुकान मांडतो आणि त्याचा देखील व्यवसाय अगदी कमी पैश्यात चालायला लागतो.

नवीन मराठी पिढी परत सेम चुका करत मोठे दुकान भाड्याने घेवून चकाचक करते आणि ते देखील बंद होवून जाते.

परप्रांतियाचा व्यवसाय असाच दीर्घ कालावधीसाठी सुरु राहतो आणि समोर दुकान भाड्याने जाताना बघतो, पैसे खर्च होताना बघतो, बंद होताना बघतो.

मराठी नवनवीन दुकानाचा भाडेकरू येत जातो, तो समोर चालू असलेला परप्रांतीयाचा व्यवसाय बघतो आणि काही महिन्यानी तोट्यात त्याचा व्यवसाय बंद करतो.

परप्रांतीय आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा गावावरून नातेवाईक तरुणांना संधी देतो, आपल्याकडे काम करायला लावतो व तसेच एखादा उद्योग व्यवसाय सुरु करून देतो. म्हणजे अजून एक परप्रांतीय कुटुंब सेट होते.

मराठी स्वतःच इतकी धडपड करत असतो कि त्याच्या चुकीच्या निर्णयांना तो मानत नाही आणि बोलतो कि उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, हजारो लाखो आणि करोडो रुपयांची उलाढाल करणे हि मराठी समाजाचे काम नाही, तो फक्त नोकरी करू शकतो. तो स्वतः चुकांपासून शिकत नाही आणि इतर मराठी लोकांना देखील प्रोस्ताहित करत नाही. उलट तो त्यांना उद्योग व्यवसाय करण्यापासून रोखतो.

परप्रांतीयाचे दुकान म्हणजे कौटुंबिक व्यवसाय झाला ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब मदत करते.

मराठी दुकान म्हणजे जी व्यक्ती बसणारच तिचीच जबाबदारी असणार, बाकी मदत करणार नाही किंवा घेणार नाही.

परप्रांतीय भल्या पहाटे ते रात्री उशिरापर्यंत दुकान सुरु ठेवतो, धंद्यात जम बसला तरी तो कुठे जात नाही कारण तो व्यवसाय ग्राहकांसाठी करोत ना कि स्वतःसाठी ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास बसतो आणि त्याला कायमस्वरूपी ग्राहक आपोआप भेटत जातात.

मराठी उशिरा दुकान उघडतो आणि लवकर बंद ठेवतो, सर्व सन वर, लग्न कार्य वगैरे वगैरे करत जातो आणि हजारदा दुकान बंद ठेवून ग्राहक तोडून टाकतो. मग ग्राहक त्याच्याकडे जाने बंद करतात.

जास्तीत जास्त परप्रांतीय हे समजूतदार, आणि गोड बोलणारे असतात. अति झाल्याशिवाय भांडत नाही. म्हणून ह्यांचा नकली माल देखील विकला जातो ते देखील विना तक्रारी.

जास्तीत जास्त मराठी हे उद्धट बोलणारे रागावणारे आणि नीट न समजावणारे असतात. ह्यामुळे ह्यांचा उच्च दर्जाचा माल विकलाच जात नाही आणि ग्राहक देखिल येत नाही.

परप्रांतीय मुल जर शिकत असतील तर शिक्षण पूर्ण झाल्यावर वडील जो पर्यंत दुकान सांभाळत आहे तो पर्यंत कुठेतरी नोकरी करतात किंवा पार्ट टाइम दुकान सांभाळून वडिलांना मदत करतात. आणि जेव्हा वडील बोलतात कि दुकान पूर्ण वेळ सांभाळ तेव्हा ते नोकरी सोडून पूर्ण वेळ दुकान सांभाळतात व नोकरी पेक्षा जास्त पैसा कमावतात. हि लोक कामाला नाव ठेवत नाही.

मराठी मुल शिक्षण पूर्ण झाल्यावर दुकान बंद करायला लावतात, त्यांना दुकान हे कमी दर्जाचे काम वाटते. मग आपोआप तिथे परप्रांतीय संधी उचलतो किंवा त्याला दुकान भाड्याने दिले जाते आणि परप्रांतीय सेट होवून जातो. शेवटी भाडे घ्यायचा देखील कंटाळा येतो किंवा परप्रांतीयाच्या गोड बोलण्यात अडकून दुकान त्याला विकून टाकतो.

परप्रांतीय एकदा का दुकान भाड्याने घेतले कि परत दुसऱ्या परप्रांतीयालाच देतील पण मराठी माणसाला देणार नाही. तसेच राहतील, वाट बघतील आणि मराठी आला कि त्याला काहीतरी कारण सांगून किंवा मालकाला खास करून ते दुकान मराठी माणसाला देणारच नाही. मग परप्रांतीय भेटेल व त्याला तिथे व्यवसायाची संधी भेटेल जिथे अगोरच दुकान सुरु होते व ग्राहक देखील जमले होते.

मराठी कुणालाही दुकान भाड्याने देईल आणि जास्त विचार करणार नाही त्यामुळे आज परप्रांतीय उद्योग व्यवसायात तुम्हाला दिसत आहे आणि मराठी नाही.

लिहायचे खूप आहे पण काही महत्वाचे मुद्दे मांडले आहे. इथे कुठलाही भेदभाव करायची किंवा मराठी समजला कमी दाखवायचा प्रयत्न करत नाही तर जे वास्तव आहे ते सांगत आहे.

आमचा विक्रोळी परिसर हा मराठी समाजाची लोकवस्ती आहे पण परप्रांतीय उद्योग व्यवसायात आहे. मारवाडी मध्ये तुम्हाला एकही मराठी वाणी दिसणार नाही हि परिस्थिती आहे. ते आज वाघ आहे आणि आपण बकरे. एकच मराठी होता तो देखील सोडून गेला आणि लाईन मध्ये मारवाडी दुकानदार आहे आणि एकमेकांना सांभाळून घेतात.

मराठी परप्रांतीयांसारखे नाही काय?

आहेत. बोटावर मोजण्याइतके आहेत. मी फक्त त्यांच्याकडेच जातो. वागण्या बोलण्यात आणि कामामध्ये सरस. अश्याच मराठी लोकांसोबत रहा आणि जर नसतील तर परप्रांतीय लोकांसोबत रहा, तुम्ही १०० % उद्योजक व्यवसायिक बनालच.

अशीच परप्रांतीयासारखी प्रगती केलेले अनेक मराठी आहेत, ते तुमच्या आमच्या परिसरात देखील आहे म्हणजे ह्याचा अर्थ आपल्यात देखील गुण आहेत ज्यामुळे आपण उद्योग व्यवसायात मराठी लॉबी तयार करून उद्योग व्यवसाय सुरु करू शकतो.

जास्तीत जास्त परप्रांतीय ह्यांनी शिक्षण फक्त पदवीच्या कागदासाठी घेतले आहे आणि ते पैसे कमावण्याचे सर्व मार्ग ओपन ठेवतात. जास्तीत जास्त मराठी ज्याच्यात शिक्षण घेतले आहे तोच मार्ग काहीही झाले तरी निवडतात, पगार कमी भेटला तरी निवडतात.

म्हणून मी पहिले तपासून बघतो कि समोरच्या व्यक्तीची आर्थिक मानसिकता आहे कि नाही. जर आर्थिक मानसिकता असेल तर तो आरामात म्हणजे अगदी आरामात उद्योग व्यवसाय करू शकत आणि नसेल तर त्याने नोकरी केलेली बरी. पण असे अनेक मराठी भेटले जे लाखो रुपये द्यायला तयार आहेत फक्त त्यांना उद्योग व्यवसायात पैसे टाकायचे आहे ना कि आर्थिक मानसिकता घडवायची आहे. मग शेवट काय? पैसा गेलाच. मी जरी त्यांना अटेंड नाही केले तरी दुसरा कोणी तरी त्यांना अटेंड करतो, स्वप्न दाखवतो आणि त्यांना डबघाईला आणतो. मग शेवटी ते मला फोन करून मदत मागतात आणि मी अश्यांना मदत नाकारतो. पैसा असताना माझी आठवन नाही येत आणि गेल्यावर येते ह्याला काहीही अर्थच नाही. आयुष्यात परत संधी भेटत नाही. ती लोक शिकार झाली.

माझ्यासमोर अगदी ६ महिने ते जास्तीत जास्त २ महिन्यात अनेक मराठी लोकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेक चेहरा ओळख किंवा परिसरात राहतात म्हणून ओळखतो. त्यांचे कमीत कमी २ लाख ते जास्तीत जास्त ५० लाख हे दुकानात घुसले आणि शेवटी ते दुकान बंद करावे लागले. नुकसान मान्य आहे पण हा शुद्ध मुर्खपणा आहे, ह्याला मी आर्थिक आत्महत्या बोलतो.

आज माझे विद्यार्थी जे कोणी आहेत ते आर्थिक भावनिक साक्षर आणि सक्षम आहेत. ते परप्रांतीय देखील आहेत आणि मराठी देखील. आणि हे सर्व दीर्घकालीन आहेत ना कि वरील सांगितल्याप्रमाणे अल्प कालावधीसाठी.

मी देखील लोकांना लोकांना स्वप्न दाखवून त्यांना लुटू शकतो पण माझा मूळ उद्देश मराठी समाज श्रीमंत आणि समृद्ध बनवणे हा आहे. पिढीजात तो श्रीमंत आणि समृद्ध राहिला पाहिजे हा आहे. भले पैसे कमावण्याचा कुठलाही मार्ग का असेना मग तिथे मराठीच असला पाहिजे हा उद्देश आहे त्यामुळे मी कुणालाही प्रशिक्षणासाठी घेत नाही आणि ह्यामुळे दर्जा उंचावून आहे आणि दीर्घकालीन विद्यार्थी माझ्या सेवेचा लाभ घेतात व स्वतहून अनेकदा फी स्वरुपात जास्त पैसे किंवा इतर भेटवस्तू देवून जातात.

माझ्याकडे पैसे कमावण्याचे २ ३ मार्ग आहेत तर माझ्या विद्यार्थ्यांमुळे माझ्याकडे माझे दोन मार्ग पकडून १०२ मार्ग आहेत आणि ह्य सर्व मार्गातून आम्हाला पैसे येत जातात, फायदा होत जातो. म्हणून मी सांगत असतो कि समविचारी कृतीशील लोकांसोबतच रहा तरच फायद्यात रहाल.

आयुष्यात सर्वांना दुसरी संधी भेटत नाही.

श्रीमंत बनणे सोपे आहे. जर तुम्हाला देखील श्रीमंतीच्या आयुष्यात झेप घायची असेल तर आजच संपर्क कराल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

सकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात



सकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात

उद्योग व्यवसायात सपशेल अपयशी. विश्वास जागृत केला, पुढील क्षणी शक्तिशाली कंपने निर्माण झाली आणि सर्व अडथळे पार करत तोट्यात गेलेल्याला, कर्जात आकांठ बुडालेल्याला बाहेर काढले व काही महिन्यातच यशाच्या, श्रीमंती आणि सर्वांगीण समृद्धीच्या उंच शिखरावर पोहचवले.

असाध्य रोग झाला आहे? एलर्जी आहे? अपघाताने कमी किंवा जास्त अपंगत्व आल्यामुळे नैराश्याने ग्रस्त झाला आहात? जसा विश्वास जागृत होतो तसे तो सर्व आजार, न बरे होणारे आजार आणि लहान मोठे मानसिक किंवा मनोशारीरिक आजारपणामुळे निर्माण झालेले अपंगत्व बरे करतो. जर बरे न होणारे अपंगत्व असेल तर त्या व्यक्तीला इतके सक्षम करतो कि जे धडधाकट असणारी व्यक्ती नाही करू शकत ते अपंग व्यक्ती करून जाते.

सुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरत होता / होती. विश्वास जागृत झाला. उत्तम नोकरी मिळाली, बढती मिळाली आणि जग देखील फिरून झाले. आता उच्च पदावर आहे. सरकारी नोकरी, सतत परीक्षा, काय करावे ते समजत नव्हते, खाजगी नोकरी करत नव्हती, विश्वास जागृत झाला आणि आज सरकारी नोकरी करत आहे.

करोडो रुपयांची कंपनी, उलाढाल, गुंतवणूक, चांगल्या वाईट मार्गाने जमवलेला पैसा आणि संपत्ती हि सांभाळायची कशी? एक कंपनी बंद पडली तर मालक तर जावू द्या पण किती तरी कंपनीत काम करणारे कामगार, कंपनीमुळे चालणारे इतर लघु उद्योग व्यवसाय आणि त्यामधील कामगार ह्या सर्वांना फटका बसतो. मालक विविध उपाय करतो, लाखो रुपये ह्यासाठी टाकतो ज्यामुळे शेकडो करोडो अब्जो रुपये वाचले जावे आणि सर्व कामगारांची नोकरी वाचावी, कंपनीची प्रगती व्हावी ज्यामुळे अजून कामगार रुजू होतील व त्यांचे कुटुंब देखील चालेल.

म्हणून मालक सतत धार्मिक व अलौकिक विधींवर लाखो रुपये खर्च करत असतो आणि त्याचा त्यांना फायदा देखील होतो. नुसती त्यांना समस्या दूर होण्यासाठी दिलेली एक अंगठी त्यांच्यातील विश्वास जागृत करते आणि तो विश्वास चमत्कार घडवत त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या दूर करून टाकतो.

मला मार्गांशी काहीही घेणे देणे नाही, फक्त ध्येय एकच कि समोरच्या व्यक्तीची समस्या हि दूर झालीच पाहिजे आणि हाच माझ्यातील विश्वास सोबत समोरच्या व्यक्तीने माझ्यावर दाखवलेला विश्वास ह्यामुळे कितीही मोठी समस्या किंवा संकटे का असेना ते दूर होतातच.

तुम्हाला माझी काय कुणाचीच गरज नाही आहे इतकी प्रचंड क्षमता तुमच्यात आहे, जी क्षमता देवात आहे तीच तुमच्यात आहे, जी क्षमता निसर्गात आहे तीच तुमच्यात आहे, जी क्षमता ब्रम्हांडात आहे तीच तुमच्यात आहे. बस तीच क्षमता, तोच तुमच्यातील विश्वास जागृत करा आणी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवा. जर ३ महिन्यात समस्या दूर होत नसेल तर लगेच तज्ञांची मदत घ्या, वेळ घालवला तर समस्या आक्राळ विक्राळ स्वरूप घेवू शकते. आयुष्याशी मस्करी करू नका, सर्वांना परत संधी मिळत नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

शुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या



शुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या

आपल्या आयुष्यात शुद्धीकरणाचे खूप महत्व आहे. जर आपण ठराविक वेळेस शुद्धीकरण करत राहिलो तर जी उर्जा आणि भावना साठून काळी झालेली असते व तिचे गाळात रुपांतर होवून ती तुमच्या आयुष्यात नवीन चांगले काही घेऊन येवू देत नाही आणि आले तरी साठू देत नाही, सर्वकाही वाहून नेले जाते.

मग कधीतरी वैतागून तुम्ही तुमच्या अंतर्मनातील अथांग खोल तलाव ढवळता आणि जे नकारात्मक होते ते भूतकाळाच्या गाळात साठून त्यांनी एक स्वरूप प्राप्त केले जे त्या व्यक्तीला वास्तवात दिसायला लागते, तशी परिस्थिती परत निर्माण होते पण काळी, लोक आयुष्यात येतात पण जे वाईट झाले आहेत तेच, आणि काही तर अश्यात लग्न करून आपले आयुष्य हे नर्क करून घेतात, स्त्रिया तर पती परमेश्वर मानतात म्हणजे नकारात्मक जोडीदारासोबतच ते आयुष्य व्यतीत करतात व बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही.

गाळ हा काढून बाहेर टाकायचा असतो, त्याचा वापर खतासारखा केला जातो, तो गाळ अंतर्मनाचा तलाव स्वतः वापरू शकत नाही, आणि जर अध्यात्मिक लोक असतील विविध प्रकारच्या बाधा होण्याची दाट शक्यता असते.

तुम्ही आयुष्य जगत आहात, उर्जा, भावना प्रवाहित होत आहेत, त्यापैकी काही साठून राहत आहे, तुमचे शरीर वजनदार बनत आहे पण तुम्हाला समजून येत नाही कारण हे उर्जा आणि भावनेचे वजन असते. आणि बस एकदा तलाव धवळला कि सर्व संपले. इथून भाग्याची जागा दुर्भाग्य घेते.

शुद्धीकरणाचे प्रकार

आत्मा शुद्धी : खूप महत्वाचा टप्पा ज्यामुळे आपण अनेक विधी करतो, खासकरून व्यक्ती मृत्यू मुखी पडल्यावर, वारल्यावर. हे आपल्या भारतीय शास्त्राचे महत्व आहे. इथे तज्ञांची मदत ह्यासाठी घ्यावी लागते कारण जिवंत असताना देखील शुद्धीकरण करण्याची गरज लागते. जर तुमचा अध्यात्मावर विश्वास आहे आणि त्यानुसार आयुष्य जगत असाल तर तुम्हाला कालांतराने तुम्ही उर्जा शुद्ध करून घ्यावी लागते जेणे करून अलौकिक संकटे हि टाळली जातात.

शरीर शुद्धीकरण : ह्यामध्ये काही प्रकार आहेत. जसे उर्जा, कंपने, भावना, विचार, स्वभाव आणि सवयी.

नंतरचा भाग येतो तो आयुष्य शुद्धीकरणाचा. त्या संदर्भात फक्त महत्वाचे मुद्दे देण्यात येतील.

खाजगी आयुष्य शुद्धीकरण, आर्थिक आयुष्य शुद्धीकरण (सर्व प्रकारचे आर्थिक आयुष्य), वास्तू शुद्धीकरण (सर्व प्रकारच्या वास्तू खाजगी, व्यवसायिक ते सार्वजनिक), पुरुष, स्त्रिया, लहान मुले, आणि ज्येष्ठ शुद्धीकरण, शैक्षणिक शुद्धीकरण, वैवाहिक शुद्धीकरण, लैंगिक शुद्धीकरण.

ह्या शुद्धीकरणामध्ये नकारात्मक साठलेले, न वापरलेले गाळ काढून परत तुमचे आयुष्य सुख, समाधान, समृद्धी, संपत्ती आणि पैश्याने प्रवाहित केले जाते. नवीन नद्यारूपी मार्ग हि पुनरजीवित केले जातात. खूप बरे वाटते, हलके वाटते, परमोच्च आनंद गाठल्यासारखे वाटते, भाग्यशाली चमत्कारिक आयुष्य जगायला सुरवात होते, जे हवे ते मिळते आणि ते देखील अमर्याद मिळत जाते.

मी जे सांगत आहे ते अनुभवण्याचा भाग आहे आणि अनुभव हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे ठराविक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, बाकी तुम्ही इनबॉक्स, किंवा व्हास्टएप मेसेज ह्याद्वारे विचारू शकता, तेव्हा फक्त माहिती दिली जाईल ना कि प्रक्रिया केली जाईल, ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी फक्त.

धन्यवाद
अश्विनीकुमार

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

Image by Sabine Zierer from Pixabay

पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?


पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?

पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग

संपत्ती किंवा पैसे कमावण्याचे मार्ग

वारसाहक्क

धार्मिक, सामाजिक नियमानुसार.

उद्योग पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.

व्यवसाय पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.

नोकरी

धोक्याची सूचना : नोकरी आता पारंपारिक पिढीजात राहिली नाही. कंपनीचा मालक त्याची कंपनी हि त्याच्या वारसांना किंवा सामाजिक संघटना असेल तर त्यांना देईल पण नोकरी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देवू शकत नाही. कितीही मोठे पद का असेना ह्यासाठी देखील अनेक कुटुंबे रांगेत असतात. हा थोडी हुशारी वापरून, धूर्तपणा, कपट आणि वाम मार्गांनी तुम्ही हि नोकरी पिढीजात करू शकता पण धोके हे राहणारच.

व्यवसायात साधे लहान दुकान आणि त्यासोबत सुरु असलेला व्यवसाय हा पुढच्या पिढीला देवू शकतो पण नोकरी नाही.त्यानंतर तुमचे संस्कार आणि पुढच्या पिढीचा निर्णय आहे कि तो व्यवसाय करायचा कि नाही आणि त्याला कमी लेखून त्यापेक्षा कमी पगाराची नोकरी करायची.

मराठी समाजाने सोडले ते परप्रांतीय समाजाने पकडले. संधी जो तिचा फायदा घेतो तीचीची असते ना कि सोडणार्यांची. म्हणून मुंबई मध्ये उच्चभ्रू वस्तीत परप्रांतीय जास्त आहेत आणि मराठी कमी. आणि त्याच उच्चभ्रू वस्तीत अनेक परप्रांतीय लघु व्यवसाय करून लाखोंमध्ये फायदा उचलत आहेत.

आपला नेता असणे, तो श्रीमंत असणे, काही मराठी राजकारणी श्रीमंत असणे म्हणजे मराठी समाज नाही. मराठी समाज तोच जो समृद्ध असेल, ज्याच्याकडे सर्वकाही असेल ना कि अपवाद राजकारणी किंवा धर्मकारणी.

जात, धर्म, राजकारण, इतिहास असेच चालत राहणार फक्त तुमचे आयुष्य सरासरी ६० ते १०० वर्षांचे आहे. तुम्ही ठरवा कि तुम्हाला तुमचे कुटुंब बघायचे आहे कि भूतकाळात जावून डिप्रेशन ह्या मानसिक आजाराने ग्रस्त व्हायचे आहे.

जर मुंबईत राहून तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसे कमावता येत नसेल, किंवा श्रीमंत बनण्याच्या संधीचा फायदा घेता येत नसेल तर तुमच्यात आर्थिक मानसिकता नाही. हि मानसिकता निर्माण करावी लागते त्यानंतरच तुम्हाला संधी दिसायला लागतात.

तुमच्यात आर्थिक मानसिकता असेल, तुम्ही आर्थिक साक्षर असाल तर तर तुम्ही आज तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसा खेचत आहात आणि नाही तर तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचा प्रवाह हा नीट वाहत नाही. आयुष्य मस्करी नाही, हॉस्पिटल मध्ये जेव्हा घरची व्यक्ती एडमिट असते, जीवनमरणाचा प्रश्न असतो आणि लगेच पैसे उभे करायचे असतात तेव्हा महत्व समजते पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो.

भावनेला किंमत नाही. आर्थिक आयुष्य आणि इतर आयुष्य वेगवेगळे ठेवून जगावे लागते, जिथे जास्त वेळ द्यायची वेळ येईल तेव्हा पैश्यांना निवडा कारण आता जगण्यासाठी पैसा लागतो. पैसा असेल तेव्हा तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता आणि अजून जास्त पैसा असेल तेव्हा तुम्ही समाजसेवा करू शकता पण ह्यासाठी देखील पैसा पाहिजेच.

आर्थिक दृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनण्यासाठी मी २ कोर्स सुरु केले आहे, पहिला आहे मानसिकतेचा आणि दुसरा आहे पैसे सर्व मार्गांनी खेचून आणण्याचा.

जे फॉलोअर्स आहेत, जे समविचारी आहेत आणि ज्यांनी पैसे कमावण्याच्या आड येणारे सर्व मार्ग बंद केले असतील अश्यांचे स्वागत.

रिझल्ट येतो पण कोर्स कठीण आहे, त्यामुळे पूर्ण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असाल तरच पाउल उचला नाहीतर नाही. कमजोर लोक हि तोवर नैराश्य आणि हृदय विकार किंवा इतर तस्तम विकारांनी ग्रस्त होण्याची शक्यता असते.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf