उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठी आणि परप्रांतीय मधील फरक. मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही?



उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव
मराठी आणि परप्रांतीय मधील फरक
मराठी उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार यशस्वी का होत नाही?

एक परप्रांतीय मुंबई मध्ये येतो. त्याच्याकडे काहीही नसते. पोट भरायला आणि आपले कुटुंब चालवायला काहीतरी करणे गरजेचेच आहे.

एक मराठी मुंबई मध्येच राहतो, सर्व सुखसुविधा आहेत. पोट भरण्यासाठी तर बोलू शकत नाही पण नोकरी सोडून पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो.

परप्रांतीय धंद्यासाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न करतो. जास्त व्याजावर पैसे घेतो. धाडस दाखवतो. जास्तीत जास्त काही हजारांसाठी त्याला जास्त व्याज द्यावे लागते.

मराठी धंद्यासाठी घरातून पैसे घेतो. काहीही व्याज द्यायची गरज नाही. घरचे मुलगा आयुष्यात जम बसवेल ह्याचे स्वप्न बघत बसतात.

परप्रांतीय गरीब आणि दिसायला बारीक पण (पण चे उत्तर खाली भेटत जाईल)

मराठी दिसायल सुखवस्तू कुटुंबातील धडधाकट पण (उत्तर खाली भेटत जाईल)

एक व्यवसायाच्या उदाहरणाने सांगतो

परप्रांतीय पाणीपुरीची घाऊक विक्रीसाठी असलेली गोनी विकत घेतो, टेबल कोणीतरी देतो, एक केटरिंग चा व्यवसायिक त्याला पाणीपुरी साठी लागणारा माल बनवून देतो. ह्यासाठी त्याने सुरवातीला थोडे पैसे दिलेले असतात कारण त्यालाच तितके पैसे व्याजाने भेटलेले असतात. दुकान भाड्याने घेवू शकत नाही म्हणून तो रस्त्यावर एका चार रस्त्याच्या कडेला जागा शोधून ठेवतो.

मराठी जास्त भाडे असलेली जागा विकत घेतो. पूर्ण चकाचक दुकान करतो. फर्निचर वर पैसे खर्च करतो. माल जास्त पैसे घेऊन विकत घेतो. सगळीकडे फक्त पैसा ओतत जातो.

आता खरी सुरवात होते.

परप्रांतीय पाणीपुरी १० रुपये प्लेट ने विकायला सुरवात करतो. बघता बघता माल संपतो. त्याच्याकडे पैसे येतात.

मराठी दुकानाचे उद्घाटन समारंभ करतो. लोकांना बोलावतो. लवाजमा गोळा करतो. गिर्हाईक तर नाही पण कुटुंबातील आणि परिचयातील लोक असतात. ह्यावरच जास्त पैसे खर्च होवून जातात. त्या दिवशी एकही गिर्हाईक येत नाही तर समारंभाला जास्त पैसे खर्च होतात. तिथे पाणीपुरी तो ३० रुपयांना ठेवतो. सगळीकडे फक्त शो असतो व्यवसाय दिसत नाही.

परप्रांतीय पाणीपुरी च्या जास्तीत जास्त प्लेट विकतो. बघता बघता नफा वाढू लागतो ते देखील काही दिवसातच. नेहमीचे गिर्हाईक देखील इतक्या कमी वेळात तयार होतात.

मराठी फक्त ग्राहकांची वाट बघत असतो. फक्त नवीन दुकान आहे म्हणून काही म्हणजे बोटावर मोजता येईल इतके ग्राहक येतात. पाणीपुरी च्या प्लेटी विकल्याच जात नाही. बघता बघता तोटा वाढत जातो, परत त्यामध्ये पैसे टाकले जातात, पण तोटा वाढण्याचे थांबत नाही. नेहमीचे ग्राहक तयारच होत नाही आणि असले तरी खूप कमी किंवा जे काही स्वस्तात भेटेल त्यासाठी किंवा जास्त वेळ बसायला भेटते म्हणून येतात.

परप्रांतीय व्यवसायिकामुळे अनेकांचे व्यवसाय चालतात. म्हणजे पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारे सामान व जे काही गरजेचे आहे ते सर्व व्यवसाय चालतात, त्यांचा माल खपायला लागतो, पैश्यांची देवाण घेवाण होते. त्याच्यासोबत सर्व उद्योग व्यवसायाची शृंखला सुरु होते. हफ्ते किंवा लाच देखील जायला लागते ज्यामुळे त्यांना देखील आर्थिक फायदा होत जातो.

मराठी मुळे फक्त एकदा सुरवातीला दुकान चकाचक करायला इतर व्यवसायिकांना फायदा होतो पण जो महत्वाचा खाद्य पदार्थाचा व्यवसाय आहे त्या शृंखलेला काहीही फायदा होत नाही. म्हणजे एकप्रकारे फक्त लघु कालावधी साठी फायदा होतो.

परप्रांतीय व्यवसाय करायला जितकी जागा लागते तशीच जागा शोधतो आणि तिथे कायमस्वरूपी आपले बस्तान बसवतो. मग ती जागा एखाद्या दुकानासमोरची का असेना. नफ्या तोट्याचे गणित तो योग्य मांडतो आणि नफा घेवूनच जातो.

मराठी फक्त मोठ मोठी जागा शोधण्यात गुंग असतो आणि पैसे असल्यामुळे तो बिनधास्त असतो पण हाच पैसा सतत भाडे भरून दुकान चकाचक करण्यात कधी निघून जातो तेच समजत नाही. म्हणजे व्यवसाय तर उभा राहतच नाही आणि फक्त पैसे जात असतात. त्यापेक्षा फिक्स डीपोझीट मध्ये टाकलेले किंवा स्वतःवर उडवलेले बरे.

नवीन परप्रांतीय जुन्या परप्रांतीयाचे बघून दुसऱ्या खाद्यपदार्थाचे तसेच टेबल रुपी दुकान मांडतो आणि त्याचा देखील व्यवसाय अगदी कमी पैश्यात चालायला लागतो.

नवीन मराठी पिढी परत सेम चुका करत मोठे दुकान भाड्याने घेवून चकाचक करते आणि ते देखील बंद होवून जाते.

परप्रांतियाचा व्यवसाय असाच दीर्घ कालावधीसाठी सुरु राहतो आणि समोर दुकान भाड्याने जाताना बघतो, पैसे खर्च होताना बघतो, बंद होताना बघतो.

मराठी नवनवीन दुकानाचा भाडेकरू येत जातो, तो समोर चालू असलेला परप्रांतीयाचा व्यवसाय बघतो आणि काही महिन्यानी तोट्यात त्याचा व्यवसाय बंद करतो.

परप्रांतीय आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा गावावरून नातेवाईक तरुणांना संधी देतो, आपल्याकडे काम करायला लावतो व तसेच एखादा उद्योग व्यवसाय सुरु करून देतो. म्हणजे अजून एक परप्रांतीय कुटुंब सेट होते.

मराठी स्वतःच इतकी धडपड करत असतो कि त्याच्या चुकीच्या निर्णयांना तो मानत नाही आणि बोलतो कि उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, हजारो लाखो आणि करोडो रुपयांची उलाढाल करणे हि मराठी समाजाचे काम नाही, तो फक्त नोकरी करू शकतो. तो स्वतः चुकांपासून शिकत नाही आणि इतर मराठी लोकांना देखील प्रोस्ताहित करत नाही. उलट तो त्यांना उद्योग व्यवसाय करण्यापासून रोखतो.

परप्रांतीयाचे दुकान म्हणजे कौटुंबिक व्यवसाय झाला ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब मदत करते.

मराठी दुकान म्हणजे जी व्यक्ती बसणारच तिचीच जबाबदारी असणार, बाकी मदत करणार नाही किंवा घेणार नाही.

परप्रांतीय भल्या पहाटे ते रात्री उशिरापर्यंत दुकान सुरु ठेवतो, धंद्यात जम बसला तरी तो कुठे जात नाही कारण तो व्यवसाय ग्राहकांसाठी करोत ना कि स्वतःसाठी ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास बसतो आणि त्याला कायमस्वरूपी ग्राहक आपोआप भेटत जातात.

मराठी उशिरा दुकान उघडतो आणि लवकर बंद ठेवतो, सर्व सन वर, लग्न कार्य वगैरे वगैरे करत जातो आणि हजारदा दुकान बंद ठेवून ग्राहक तोडून टाकतो. मग ग्राहक त्याच्याकडे जाने बंद करतात.

जास्तीत जास्त परप्रांतीय हे समजूतदार, आणि गोड बोलणारे असतात. अति झाल्याशिवाय भांडत नाही. म्हणून ह्यांचा नकली माल देखील विकला जातो ते देखील विना तक्रारी.

जास्तीत जास्त मराठी हे उद्धट बोलणारे रागावणारे आणि नीट न समजावणारे असतात. ह्यामुळे ह्यांचा उच्च दर्जाचा माल विकलाच जात नाही आणि ग्राहक देखिल येत नाही.

परप्रांतीय मुल जर शिकत असतील तर शिक्षण पूर्ण झाल्यावर वडील जो पर्यंत दुकान सांभाळत आहे तो पर्यंत कुठेतरी नोकरी करतात किंवा पार्ट टाइम दुकान सांभाळून वडिलांना मदत करतात. आणि जेव्हा वडील बोलतात कि दुकान पूर्ण वेळ सांभाळ तेव्हा ते नोकरी सोडून पूर्ण वेळ दुकान सांभाळतात व नोकरी पेक्षा जास्त पैसा कमावतात. हि लोक कामाला नाव ठेवत नाही.

मराठी मुल शिक्षण पूर्ण झाल्यावर दुकान बंद करायला लावतात, त्यांना दुकान हे कमी दर्जाचे काम वाटते. मग आपोआप तिथे परप्रांतीय संधी उचलतो किंवा त्याला दुकान भाड्याने दिले जाते आणि परप्रांतीय सेट होवून जातो. शेवटी भाडे घ्यायचा देखील कंटाळा येतो किंवा परप्रांतीयाच्या गोड बोलण्यात अडकून दुकान त्याला विकून टाकतो.

परप्रांतीय एकदा का दुकान भाड्याने घेतले कि परत दुसऱ्या परप्रांतीयालाच देतील पण मराठी माणसाला देणार नाही. तसेच राहतील, वाट बघतील आणि मराठी आला कि त्याला काहीतरी कारण सांगून किंवा मालकाला खास करून ते दुकान मराठी माणसाला देणारच नाही. मग परप्रांतीय भेटेल व त्याला तिथे व्यवसायाची संधी भेटेल जिथे अगोरच दुकान सुरु होते व ग्राहक देखील जमले होते.

मराठी कुणालाही दुकान भाड्याने देईल आणि जास्त विचार करणार नाही त्यामुळे आज परप्रांतीय उद्योग व्यवसायात तुम्हाला दिसत आहे आणि मराठी नाही.

लिहायचे खूप आहे पण काही महत्वाचे मुद्दे मांडले आहे. इथे कुठलाही भेदभाव करायची किंवा मराठी समजला कमी दाखवायचा प्रयत्न करत नाही तर जे वास्तव आहे ते सांगत आहे.

आमचा विक्रोळी परिसर हा मराठी समाजाची लोकवस्ती आहे पण परप्रांतीय उद्योग व्यवसायात आहे. मारवाडी मध्ये तुम्हाला एकही मराठी वाणी दिसणार नाही हि परिस्थिती आहे. ते आज वाघ आहे आणि आपण बकरे. एकच मराठी होता तो देखील सोडून गेला आणि लाईन मध्ये मारवाडी दुकानदार आहे आणि एकमेकांना सांभाळून घेतात.

मराठी परप्रांतीयांसारखे नाही काय?

आहेत. बोटावर मोजण्याइतके आहेत. मी फक्त त्यांच्याकडेच जातो. वागण्या बोलण्यात आणि कामामध्ये सरस. अश्याच मराठी लोकांसोबत रहा आणि जर नसतील तर परप्रांतीय लोकांसोबत रहा, तुम्ही १०० % उद्योजक व्यवसायिक बनालच.

अशीच परप्रांतीयासारखी प्रगती केलेले अनेक मराठी आहेत, ते तुमच्या आमच्या परिसरात देखील आहे म्हणजे ह्याचा अर्थ आपल्यात देखील गुण आहेत ज्यामुळे आपण उद्योग व्यवसायात मराठी लॉबी तयार करून उद्योग व्यवसाय सुरु करू शकतो.

जास्तीत जास्त परप्रांतीय ह्यांनी शिक्षण फक्त पदवीच्या कागदासाठी घेतले आहे आणि ते पैसे कमावण्याचे सर्व मार्ग ओपन ठेवतात. जास्तीत जास्त मराठी ज्याच्यात शिक्षण घेतले आहे तोच मार्ग काहीही झाले तरी निवडतात, पगार कमी भेटला तरी निवडतात.

म्हणून मी पहिले तपासून बघतो कि समोरच्या व्यक्तीची आर्थिक मानसिकता आहे कि नाही. जर आर्थिक मानसिकता असेल तर तो आरामात म्हणजे अगदी आरामात उद्योग व्यवसाय करू शकत आणि नसेल तर त्याने नोकरी केलेली बरी. पण असे अनेक मराठी भेटले जे लाखो रुपये द्यायला तयार आहेत फक्त त्यांना उद्योग व्यवसायात पैसे टाकायचे आहे ना कि आर्थिक मानसिकता घडवायची आहे. मग शेवट काय? पैसा गेलाच. मी जरी त्यांना अटेंड नाही केले तरी दुसरा कोणी तरी त्यांना अटेंड करतो, स्वप्न दाखवतो आणि त्यांना डबघाईला आणतो. मग शेवटी ते मला फोन करून मदत मागतात आणि मी अश्यांना मदत नाकारतो. पैसा असताना माझी आठवन नाही येत आणि गेल्यावर येते ह्याला काहीही अर्थच नाही. आयुष्यात परत संधी भेटत नाही. ती लोक शिकार झाली.

माझ्यासमोर अगदी ६ महिने ते जास्तीत जास्त २ महिन्यात अनेक मराठी लोकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेक चेहरा ओळख किंवा परिसरात राहतात म्हणून ओळखतो. त्यांचे कमीत कमी २ लाख ते जास्तीत जास्त ५० लाख हे दुकानात घुसले आणि शेवटी ते दुकान बंद करावे लागले. नुकसान मान्य आहे पण हा शुद्ध मुर्खपणा आहे, ह्याला मी आर्थिक आत्महत्या बोलतो.

आज माझे विद्यार्थी जे कोणी आहेत ते आर्थिक भावनिक साक्षर आणि सक्षम आहेत. ते परप्रांतीय देखील आहेत आणि मराठी देखील. आणि हे सर्व दीर्घकालीन आहेत ना कि वरील सांगितल्याप्रमाणे अल्प कालावधीसाठी.

मी देखील लोकांना लोकांना स्वप्न दाखवून त्यांना लुटू शकतो पण माझा मूळ उद्देश मराठी समाज श्रीमंत आणि समृद्ध बनवणे हा आहे. पिढीजात तो श्रीमंत आणि समृद्ध राहिला पाहिजे हा आहे. भले पैसे कमावण्याचा कुठलाही मार्ग का असेना मग तिथे मराठीच असला पाहिजे हा उद्देश आहे त्यामुळे मी कुणालाही प्रशिक्षणासाठी घेत नाही आणि ह्यामुळे दर्जा उंचावून आहे आणि दीर्घकालीन विद्यार्थी माझ्या सेवेचा लाभ घेतात व स्वतहून अनेकदा फी स्वरुपात जास्त पैसे किंवा इतर भेटवस्तू देवून जातात.

माझ्याकडे पैसे कमावण्याचे २ ३ मार्ग आहेत तर माझ्या विद्यार्थ्यांमुळे माझ्याकडे माझे दोन मार्ग पकडून १०२ मार्ग आहेत आणि ह्य सर्व मार्गातून आम्हाला पैसे येत जातात, फायदा होत जातो. म्हणून मी सांगत असतो कि समविचारी कृतीशील लोकांसोबतच रहा तरच फायद्यात रहाल.

आयुष्यात सर्वांना दुसरी संधी भेटत नाही.

श्रीमंत बनणे सोपे आहे. जर तुम्हाला देखील श्रीमंतीच्या आयुष्यात झेप घायची असेल तर आजच संपर्क कराल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf
Previous
Next Post »
0 आपले विचार