मराठी तरून तरुणींना "कुठला व्यवसाय करू?" "कुठली नोकरी करू?" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर


मराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटेल तिथे ओळख काढून उद्योग व्यवसाय सुरु करतात किंवा नोकरीला सुरु करून दिवसाला किंवा महिन्याला पगार मिळवायला सुरवात करतात आणि आश्चर्याची गोष्ट हो असते कि त्यांच्याकडे रहायला घर देखील नसते म्हणजे विचार करा जर आपण मुंबई मध्ये राहून आपले घर असून आपण कमी का कमावतो? कमावण्याचे इथे मी फक्त कायदेशीर मार्गांबद्दल बोलत आहे ना कि बेकायदेशीर मार्गांबद्दल.

अनेकांना वाटते कि भ्रष्टाचार हा फक्त सरकारी नोकरी मध्ये होतो ना कि खाजगी. हा साफ खोटा गैरसमज आहे. माझ्या संपर्कात अशी लोक होती ज्यांचा पगार कमी पण कंपनीला आणि त्यांच्या ग्राहकांना फसवून त्यांनी प्रचंड पैसे कमावले व स्वतःचे घर देखील घेतले. इथे नियम एकच लागू होतो तो म्हणजे जो पकडला गेला तो चोर.

मी जेव्हा नोकरीला होतो तेव्हा मी एक एक पैश्यांचा हिशोब मालकाला द्यायचो आणि तुटपुंजा पगार घेवून घरी यायचो आणि त्याच कंपनीत माझा जो परप्रांतीय मित्र होता तो लेडीज बार मध्ये पैसे उडवत बसायचा. तरीही शेवटी थोड्याश्या अनबन मुळे मालकाने मला काढून टाकले आणि तो परप्रांतीय मुलगा अजून देखील त्याच कंपनीमध्ये कामाला आहे.

भ्रमात राहू नका. लोक कुठकुठच्या मार्गांनी पैसे कमावतात हे मला बिलकुल माहित नव्हते पण जस जसे परप्रांतीय संपर्कात आले, मराठी लोकांशी संपर्क थोडा कमी झाला तस तसे मला विवध मार्ग दिसू लागले आणि जेव्हा एक मार्ग वापरून बघितला त्यातील पैसे कमावणे किती सोपे असते हे बघितले तेव्हा समजले कि परप्रांतीय इतके पैसे कसे कमावता ते.

जर तुम्ही धाडसाचे बोलत असाल तर कोण बोलते कि मराठी तरुणांमध्ये धाडस नाही आहे म्हणून? पण त्यांना असे संस्कार दिले जातात कि ते फक्त आणि फक्त गुलाम म्हणून जगले पाहिजे. नोकरी केली तरी मालक जे शोषण करून पगार देत असतो त्यामध्ये समाधान मानायला सांगतात मग मालक काय शोषण करतच बसतो. मी जेव्हा काम करायचो तेव्हा मला वाटायचे कि मी इमानदारीने काम करतो आणि मालक देखील पण जेव्हा त्याने मला सी ए कडे त्याची फाईल घेवून पाठवले तेव्हा कळाले त्याची कमी किती आणि तो पगार किती देतो.

फक्त पैसे कमवत आहे म्हणून ती व्यक्ती चांगली असा अर्थ होत नाही. राजकारणी लोक सोडून जर कोणी मराठी पैसे कमवत असेल तर लोकांना ते बघवत नाही आणि तिथेच परप्रांतीय घोटाळे करून करोडोची संपत्ती जमवत असेल तर ते त्याची चर्चा करत बसतील. हे जे वास्तव सांगत आहे ते के बघितले आहे पुराव्यानिशी ते सांगत आहे. तरीही एक प्रश्न यायचा कि मग इन्कमटॅक्स आणि इडी ह्या खात्यातील कर्मचारी काम करतात तरी काय? नंतर ह्या प्रश्नाचे विचार करणे सोडून दिले.

महत्वाची बाब म्हणजे जे परप्रांतीय आहे त्यापैकी काही बिलकुल मारा मारी करत नाही, आणि ह्यामध्ये तर मराठी तरून पुढे होता. तरीही त्यांचे धाडस इतके असते कि ते ब्लेकमेल करायला पाठी पुढे पाहत नाही. ते प्रयत्न करतात जर हा घाबरला तर मला पैसे देईल आणि नाही तर धमकी देवून सोडून देईल, जास्तीत जास्त मारेल पण मारून टाकणार नाही म्हणून १०० पैकी ५ तरी त्यांच्या जाळ्यात फसतातच.

वास्तव आयुष्यात जगायला शिका. सिनेमा वेगळा आणि त्या सिनेमामध्ये कोणा कोणाचे पैसे लागले तो देखील एक संशोधनाचा भाग आहे. वास्तव आयुष्यात जर तुम्ही संधी चा फायदा नाही उचलला तर दुसरा ती संधी घेवून जाईल. संधी प्रत्येक ठिकाणी असते तुम्हाला ती फक्त शोधायची आहे, नसेल तर निर्माण करायची आहे जसे माझ्या ऑफिस मधील मित्राने निर्माण केली तशी, पगार कमी वर कमाई जास्त.

तुम्ही आणि तुमचे पैसे कमावण्याचे मार्ग हे गुप्त ठेवा. खासकरून जर तुमचा जास्तीत जास्त संपर्क हा मराठी लोकांसोबत येत असेल तर, आणि सहसा परप्रांतीय लोकांसोबत चर्चा करताना देखील तुमचे पैसे कमावण्याचे मार्ग उघड करू नका हा पण ते कुठ कुठल्या मार्गाने पैसे कमावतात हे त्यांच्या काढून जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

फक्त आणि फक्त समविचार आणि सम कृतीशील लोकांसोबतच रहा. समविचारी लोकांसोबत राहिल्यामुळे तुम्हाला सतत विरोधाचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे तुम्ही नैराश्यात जाणार नाही. सम कृतीशील म्हणजे जिथे लोक भावनिक सणांच्या सुट्ट्या घेत असतील तिथे तुम्ही तुमच्या साथीदारासोबत नवीन संधी साधण्यासाठी कामावर जात असाल.

म्हणून मी माझ्या प्रत्यके लेखामध्ये बोलत असतो कि जर आर्थिक मानसिकता, साक्षरता आणि भावनिक दृष्ट्या सक्षम असाल तरच उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक किंवा मोठ मोठ्या आर्थिक व्यवहारात उतरा, धाडस दाखवा नाहीतर पहिले आर्थिक दृष्ट्या साक्षर व्हा, सक्षम व्हा, मानसिक दृष्ट्या समक्ष आणि साक्षर व्हा त्यानंतरच मोठ मोठ्ये आर्थिक व्यवहारांकडे वळा.

श्रीमंत बनण्याच्या वाटेवर भले तुमची गाडी कितीही मोठी असली तर तुम्हाला एकट्यानेच प्रवास करायचा आणि आणि अश्या अनेक गाड्या त्या मार्गाने जात असतात. प्रत्येक जन आपल्या कामात व्यस्त असतो कोणीही बाहेर बघत नाही.

जागृत झाला असाल तर बिनधास्त मोठी झेप घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.


धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया


संस्कृती मध्ये फक्त धर्म आणि अध्यात्म नाही तर आपली उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीची संस्कृती देखील येते. विदेशी औद्योगिक संस्कृती च्या नादाला लागल्यामुळे आपले स्थानिक शेती शेती निगडीत व सूक्ष्म, लघु, मध्यम हा धोक्यात आले व काही वर्षात तो संपूर्ण कुण्या एका मोठ्या कंपनीच्या हातात जाईल. आता देखील वाटचाल त्याच दिशेने चालली आहे. राजकारणी, धर्म कारणी आणि समाज कारणी ह्यांच्या नादि लागू नका कारण एकदा का कुण्या एका मोठ्या कंपनीने बाजारपेठ काबीज केली कि अनेक वर्षे ती शोषण करूनच सोडेल.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

ब्लॉग लिंक : http://www.udyojakghadwuya.com/2019/07/blog-post.html

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

तुमची निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे?



दिवसभरात तुम्ही जे निर्णय घेतात त्यापैकी विनाकारण वेळ वाया घालवणारे निर्णय किती घेता?

तुमचा वेळ आज कुठले कपडे घालू ह्याचा विचार करण्यात तर नाही जात आहे ना?

उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार ह्यांना वेळेचे फार बंधन असते. उद्योजकांना कधीही कुठेही जावे लागते त्यासाठी त्यांना तश्या प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक असते आणि महत्वाचे म्हणजे आज कुठले कपडे घालू ह्या नको त्या तोट्याच्या विचारात वेळ घालवू शकत नाही.

फक्त उद्योजकच नाही तर तुम्ही कोणीही असा फक्त एक लक्ष्यात ठेवा कि तुम्ही विनाकारण तुमचा बहुमुल्य वेळ विविध डिझाईन चे कपडे खरेदी करण्यात तर घालवत नाही ना?

वेळ हि न भरून निघणारी संपत्ती आहे. आज तुम्ही शाळेत किंवा कॉलेज मध्ये आहात पण बघता बघता हे दिवस निघून जातील व तुम्ही अश्या ठिकाणी पोहचाल जिथे तुम्हाला वेळेचे महत्व समजून येईल.

जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल तर तुम्ही डिझाईन आणि स्टाईल ह्यावर लक्ष्य केंद्रित न करता तुम्हाला गणवेशासारखे कपडे घालावे लागतील ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ कुठले कपडे घालु ह्या मध्ये न घालवता तुम्ही तुमच्या ध्येयावर वर्तमानातील कामावर लक्ष्य केंद्रित करू शकता.

आता आपण यशस्वी उद्योजकांचे उदाहरण घेवू ज्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ वाचवता येईल व त्याचा वापर करून तुम्ही तो वाचलेला वेळ हा आत्मविकासासाठी वापराल.

स्टीव्ह जॉब : काळ्या रंगाचा टरटल नेक टी शर्ट आणि निळी जीन्स.

मार्क झुकसबर्ग : राखाडी टी शर्ट आणि निळी जीन्स.

मतील्डा काह्ल (आर्ट डायरेक्टर सोनी कंपनी) : सफेद ब्लाउज आणि काळी पेंट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा : राखाडी किंवा निळ्या रंगाचे सूट.

हा लेख फक्त उद्योजकांसाठी नाही तर ज्यांना ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे, ज्यांना विनाकारण वेळ वाया न घालवता ध्येय साध्य करण्यासाठी आपले आवडीचे काम करण्यासाठी ज्यांना वेळ हवा आहे त्यांना त्या सर्वांसाठी आहे. वेळ हि कधीही न भरून निघणारी संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर करा, आज जिवंत आहोत पण उद्या किंवा पुढच्या क्षणी नसू म्हणून जे कामाचे आहेत त्यावरच लक्ष्य केंद्रित करा आणि ते निर्णय घेण्याची सवय लावून घ्या.

यशावर कुणाची मक्तेदारी नाही आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. यशाचे नियम सर्वांना एकसारखेच आहे. जो ते नियम वापरेल तो यशस्वी बनेल जसे भौतिक शास्त्राचा गुरुत्वाकर्षणाचा नियम.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

https://www.flickr.com/photos/scobleizer/5179395448/in/photostream/
https://www.flickr.com/photos/acaben/541326656

कोण बोलतो कि फिटनेस (शारीरिक आरोग्य) च्या क्षेत्रात पैसा नाही म्हणून?


तुम्हाला फिटनेस ट्रेनर व्हायचे आहे? बिनधास्त व्हा. फिटनेस क्षेत्रात खूप पैसा आहे. तुम्ही अगदी खोर्याने देखील पैसा काढू शकता. हो हे शक्य आहे. विश्वास नाही बसत मग पुढील लेखात दिलेली फिटनेस ट्रेनर आणि त्यांची फी बघा.

ट्रेनर नाव : समीर जौरा
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : फरहान अख्तर. भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, अभिनेता, प्लेबॅक गायक, निर्माता, आणि टीव्ही होस्ट.
फी : ३ ते ४ लाख रुपये महिना. पोषण आहारासकट.

ट्रेनर नाव : यास्मिन कराचीवाला
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : कॅटरिना कैफ. अभिनेत्री.
फी : १२ सत्रांचे १९,५०० (एकोणीस हजार पाचशे).

ट्रेनर नाव : सत्यजित चौरसिया
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : आमीर खान. भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि टीव्ही टॉक शो होस्ट
फी : १० हजार ते १ लाख. ग्राहक आवडल्यास विनामुल्य सेवा ट्रेनिंग द्यायला तयार.

ट्रेनर नाव :  समीरा आणि नम्रता पुरोहित
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : सारा आली खान, अभिनेती, सैफ अली खान आणि अम्रिता सिंग ह्यांची मुलगी. अभिनेते वरून धवन, आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर. २०११ पासून फेमिना मिस इंडीया पेजंट ह्यांना ट्रेन करत आहे.
फी : १२ सत्रांचे ३२ हजार. व्यक्तीक ट्रेनिंग.

ट्रेनर नाव :  मनिष अडविलकर
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : सलमान खान. भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता, (कधीकधी) गायक आणि टीव्ही व्यक्तित्व. मिस्टर इंडीया विजेते आणि आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डींग विजेते.
फी : घरी येवून शिकवायचे ४ हजार रुपये प्रती सत्र. स्वतःच्या व्यायामशाळेत शिकवायचे ३५ हजार रुपये महिना.

ट्रेनर नाव :  पायल गिडवानी तिवारी
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेत्री करीना कपूर, अभिनेता आणि नवाब सैफ अली खान.
फी : प्रती वर्ग ६ हजार रुपये.

ट्रेनर नाव :  डीयान पांडे
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेता बादशाह शाहरुख खान. अभिनेत्री बिपाशा बासू आणि लारा दत्ता.
फी : वार्षिक २२ हजार.

ट्रेनर नाव :  सिंडी जोर्डन
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेत्री आणि मोडेल जेकलीन फर्नांडीस.
फी : १२ वर्गाचे १२ हजार रुपये.

ट्रेनर नाव :  राधिका कार्ले
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेत्री सोनम कपूर.
फी : प्रती महिना ५० हजार रुपये.

ट्रेनर नाव :  क्रिस गेथीन
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेता हृतिक रोशन.
फी : २० लाख प्रती महिना.

हो तुम्ही हि जी फी बघत आहात ते वास्तव आहे. माझे जे प्रसिद्ध विद्यार्थी आहेत त्यांना मी ५ ते २५ हजार चार्ज करतो आणि माझ्यापेक्षा जास्त फी घेणारे सुद्धा आहेत. तुम्ही कुठल्या आर्थिक स्तरावर आयुष्य जगत आहात ह्यावर अवलंबून आहे. दृष्टीकोन बदलला तर सर्वकाही बदलते व श्रीमंत आणि समृद्ध अनुभव यायला लागतात. कौशल्यापलीकडे जावे लागते.

जर उंच इमारत बांधायची असेल तर अंतरमनापासून काम करायला घ्या. तुमचे जितके अंतरमन खोल व मजबूत असेल तितक्याच उंच इमारती तुम्ही बांधू शकता. हो आणि किंमत हि मोजावी लागते, नुसती आर्थिक नाही तर सर्वकाही. जो ध्येयाशी एकनिष्ठ असतो तो कुठलीही किंमत मोजायला तयार असतो आणि तोच पुढे जातो.

धाडस असेल तरच पुढे या नाही तर सर्वसामान्य आयुष्य जगा. निसर्गाचा नियम एकच आहे कि काहीही करून तुम्ही जिवंत राहण्यासाठी धडपड केली पाहिजे मग उंच शिखरावर जगा नाहीतर पर्वताच्या पायथ्याशी.

जर तुम्हालाही व्यवसायिक आयुष्यात आर्थिक प्रगती करायची असेल तर आजच संपर्क करा. हा नियम खाजगी आयुष्यात देखील लागू होतो, खाजगी आयुष्यात देखील प्रगती करायची असेल तर आजच संपर्क कराल.



धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया


अनेकांना जेव्हा एका दुकानात गर्दी बघून असे वाटते कि त्यांचा उद्योग व्यवसाय हा तेजीत चालू आहे पण त्यांना हे नाही माहिती कि अनेकदा त्यांना गिर्हाईक नसताना, एक रुपयाचा पण धंदा नसताना चे दिवस बघितलेले असतात. हेच वास्तव आहे आज धंदा आहे तर उद्या नाही पण परवा असेल, एकदम नुकसान देखील होईल तर एकदम नफा देखील होईल. त्यांना दिवसभर दुकानात राबावे लागते व खरेदी करायला फिरायला निघणारे हे रात्री कधीतरी निघतात तेव्हा त्यांची दुकानाच्या गर्दीवर नजर जाते. त्यामुळे कधी तरी तुम्ही बाहेर जाल आणि दुकानातील गर्दी बघून हा विचार नका करू तो किती कमवतो, त्याचे किती तरी दिवस हे विना गिर्हाईकाचे घालवले आहेत. अनुभवला पर्याय नाही.

#अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

#मानसशास्त्रआणिआकर्षणाचासिद्धांत #मानसशास्त्र #आकर्षणाचासिद्धांत #अंतरमन #अंतरमनाचीशक्ती #अध्यात्म #अध्यात्मिकशक्ती #प्रोत्साहन #प्रेरणा #आत्मविश्वास #आत्मविकास #चलाउद्योजकघडवूया #उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #तणाव #नैराश्य #नकारात्मकविचार #ग्राहक #श्रीमंती #समृद्धी #भाग्य #marathi #marathistatus #marathikavita #marathibana #marathimotivational #marathiinspirations


मुंबईत महाराष्ट्रात, भारतात आणि जगात विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत. सर्वांचे ज्ञान मला नाही आणि असे अनेक उद्योग व्यवसायाचे मार्ग आहे जे मला माहितच नव्हते. प्रत्येक दिवशी नवीन शिकायला मिळते. थोडक्यात पैसे कमावण्याचे मार्ग अनेक आहेत आणि तुम्हाला जो नवीन मार्ग वाटत आहे तो तुमच्या माहितीत नवीन असेल पण बाजारपेठेत उपलब्ध असेल. प्रत्येक गोष्ट विकताना बघितली आहे आणि प्रत्येक सेवा पुरवताना बघितले आहे. तुमच्याकडे पर्याय अनेक आहेत त्यापैकी पारंपारिक, अपारंपरिक किंवा काळानुसार चे पर्याय तुम्ही निवडू शकता. विनाकारण तुम्ही कल्पना हि अडगळीत टाकू नका तर तिच्यावर काम करा. कल्पना शक्तीला मुक्त जरा व मर्यादेची चौकट ओलांडा.

#अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.