मुंबईत महाराष्ट्रात, भारतात आणि जगात विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत. सर्वांचे ज्ञान मला नाही आणि असे अनेक उद्योग व्यवसायाचे मार्ग आहे जे मला माहितच नव्हते. प्रत्येक दिवशी नवीन शिकायला मिळते. थोडक्यात पैसे कमावण्याचे मार्ग अनेक आहेत आणि तुम्हाला जो नवीन मार्ग वाटत आहे तो तुमच्या माहितीत नवीन असेल पण बाजारपेठेत उपलब्ध असेल. प्रत्येक गोष्ट विकताना बघितली आहे आणि प्रत्येक सेवा पुरवताना बघितले आहे. तुमच्याकडे पर्याय अनेक आहेत त्यापैकी पारंपारिक, अपारंपरिक किंवा काळानुसार चे पर्याय तुम्ही निवडू शकता. विनाकारण तुम्ही कल्पना हि अडगळीत टाकू नका तर तिच्यावर काम करा. कल्पना शक्तीला मुक्त जरा व मर्यादेची चौकट ओलांडा.

#अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
Previous
Next Post »
0 आपले विचार