तुमची निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे?दिवसभरात तुम्ही जे निर्णय घेतात त्यापैकी विनाकारण वेळ वाया घालवणारे निर्णय किती घेता?

तुमचा वेळ आज कुठले कपडे घालू ह्याचा विचार करण्यात तर नाही जात आहे ना?

उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार ह्यांना वेळेचे फार बंधन असते. उद्योजकांना कधीही कुठेही जावे लागते त्यासाठी त्यांना तश्या प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक असते आणि महत्वाचे म्हणजे आज कुठले कपडे घालू ह्या नको त्या तोट्याच्या विचारात वेळ घालवू शकत नाही.

फक्त उद्योजकच नाही तर तुम्ही कोणीही असा फक्त एक लक्ष्यात ठेवा कि तुम्ही विनाकारण तुमचा बहुमुल्य वेळ विविध डिझाईन चे कपडे खरेदी करण्यात तर घालवत नाही ना?

वेळ हि न भरून निघणारी संपत्ती आहे. आज तुम्ही शाळेत किंवा कॉलेज मध्ये आहात पण बघता बघता हे दिवस निघून जातील व तुम्ही अश्या ठिकाणी पोहचाल जिथे तुम्हाला वेळेचे महत्व समजून येईल.

जर तुम्हाला यशस्वी बनायचे असेल तर तुम्ही डिझाईन आणि स्टाईल ह्यावर लक्ष्य केंद्रित न करता तुम्हाला गणवेशासारखे कपडे घालावे लागतील ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ कुठले कपडे घालु ह्या मध्ये न घालवता तुम्ही तुमच्या ध्येयावर वर्तमानातील कामावर लक्ष्य केंद्रित करू शकता.

आता आपण यशस्वी उद्योजकांचे उदाहरण घेवू ज्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ वाचवता येईल व त्याचा वापर करून तुम्ही तो वाचलेला वेळ हा आत्मविकासासाठी वापराल.

स्टीव्ह जॉब : काळ्या रंगाचा टरटल नेक टी शर्ट आणि निळी जीन्स.

मार्क झुकसबर्ग : राखाडी टी शर्ट आणि निळी जीन्स.

मतील्डा काह्ल (आर्ट डायरेक्टर सोनी कंपनी) : सफेद ब्लाउज आणि काळी पेंट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा : राखाडी किंवा निळ्या रंगाचे सूट.

हा लेख फक्त उद्योजकांसाठी नाही तर ज्यांना ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे, ज्यांना विनाकारण वेळ वाया न घालवता ध्येय साध्य करण्यासाठी आपले आवडीचे काम करण्यासाठी ज्यांना वेळ हवा आहे त्यांना त्या सर्वांसाठी आहे. वेळ हि कधीही न भरून निघणारी संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर करा, आज जिवंत आहोत पण उद्या किंवा पुढच्या क्षणी नसू म्हणून जे कामाचे आहेत त्यावरच लक्ष्य केंद्रित करा आणि ते निर्णय घेण्याची सवय लावून घ्या.

यशावर कुणाची मक्तेदारी नाही आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. यशाचे नियम सर्वांना एकसारखेच आहे. जो ते नियम वापरेल तो यशस्वी बनेल जसे भौतिक शास्त्राचा गुरुत्वाकर्षणाचा नियम.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

https://www.flickr.com/photos/scobleizer/5179395448/in/photostream/
https://www.flickr.com/photos/acaben/541326656
Previous
Next Post »
0 आपले विचार