केफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० करोड संपत्ती चे मालक व्ही. जी. सिद्धार्था ह्यांनी कर्जबाजरी झाल्यामुळे आत्महत्येचे पाउल उचलत नदीत उडी टाकून आपले आयुष्य संपवले.



केफे कोफी डे चे मालक, संस्थापक आणि अध्यक्ष, ८००० करोड संपत्ती चे मालक व्ही. जी. सिद्धार्था ह्यांनी कर्जबाजरी झाल्यामुळे आत्महत्येचे पाउल उचलत नदीत उडी टाकून आपले आयुष्य संपवले.

लक्ष्यात ठेवा कि आर्थिक फसवणूक करणे आणि आणि आर्थिक अपयशी होणे ह्यामध्ये फरक आहे.

अजून एक फरक लक्ष्यात ठेवा कि ज्याची जितकी सहन करण्याची मानसिक क्षमता असते तितकी तो सहन करू शकतो. जर सहन करण्याच्या पलीकडे गेले तर ती व्यक्ती नैराश्येत जाउन आत्महत्या करते.

आता इंटरनेट, सोशल मिडिया ची अजून एक काळी बाजू अशी आहे कि ज्यामध्ये काहीही माहिती नसताना तिखट मीठ लावून बातमी ट्रोल केली जाते ज्याचे प्रचंड मोठे नुकसान हे कंपनीच्या ब्रांड आणि मालकाला उचलावे लागते.

ट्रोल हा एक प्रकारे मानसिक रोग, विकृती आहे. अश्या मानसिक रोगी आणि विकृतांपासून लांब रहा. मग ते वाईट बोलणारे असो किंवा चांगले कारण त्या दोघांनी त्या वेळेस तुम्हाला संपर्क केला असतो जेव्हा तुमची एक चुकी बघितली जाते.

महाराष्ट्रात देखील अशी उदाहरणे बघितली आहे जिथे महापुरुष, राजे महाराजे, देव देवता आणि संतांचे फोटो लावून ट्रोल करत बसतात. ते जिथे जीव जातो तिथे देखील जे झाले ते योग्यच झाले हे सांगण्याचा प्रयत्न करतात, इतक्या खालच्या पातळीपर्यंत ट्रोल करणारे जातात.

ज्याची ८००० करोड ची संपत्ती आहे जरुरी नाही कि तो प्रत्येक समस्येला तोंड देवू शकतो. आयुष्यात असे दिवस येतातच जिथे आपण हतबल होवून जातो व शेवटी आपण आपले आयुष्य संपवतो. असे अनेकदा मानसिक दृष्ट्या सक्षम असलेल्यांसोबत देखील घडते.

मानसिक आजारांचे कृपया घरगुती उपाय करत जावू नका, तज्ञांची मदत घ्या. सतत आत्मविकास करत रहा ज्यामुळे तुम्ही कुठल्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार रहाल. यशाची हवा डोक्यात शिरून आत्मविकास बंद करू नका नाहीतर आयुष्य खूप जोरदार तुम्हाला जमिनीवर आपटेल, इतक्या जोरात आपटेल कि परत तुम्ही उभे राहू शकणार नाही. नेहमी स्वतःला शिष्याच्या स्वरुपात ठेवा. गर्वाच्या जागी स्वाभिमान ठेवा.

जो ८००० करोड संपत्ती कमवू शकतो, जो ४००० करोड ची उलाढाल करू शकतो आणि जो ६००० करोड च्या कर्जत बुडू शकतो किंवा नुकसान करू शकतो त्याची पात्रता, लायकी आणि क्षमता हि १८००० करोडची आहे. मी इथे ६००० करोड चे कर्ज, नुकसान बोलत आहे ते उद्योग व्यवसायात झालेले आहे ना कि घोटाळा केलेला आहे, इथे दोघांची तुलना करू नका.

यशस्वी उद्योजकांपेक्षा अयशस्वी, कर्जात बुडालेले उद्योजक व्यवसायिक जास्त आहे मग काय ते यशस्वी नाही? हो ते देखील यशस्वी आहेत, जो प्रयत्न करतो तो तो यशस्वी आहे आणी जो नाही करत तो अयशस्वी. पण बोलबाला फक्त आणि फक्त यशस्वी लोकांचा केला जातो, सत्कार देखील त्यांचाच केला जातो, हि समाजाची काळी बाजू आहे. म्हणून मी बोलत असतो कि गर्दीपासून लांब रहा आणि समविचारी, समकृतीशील, वेळेला धावून येणार्यांसोबत रहा.

लोकांचा, समाजाचा विचार करू नका. तुम्ही जेल मध्ये गेला तरी चालेल पण आत्महत्या करू नका. तुम्ही जिवंत रहाल तर तुमच्यापासून लोकांना शिकायला भेटेल. तुम्ही लोकांना जेल मध्ये राहून देखील मदत करू शकता. तुमची क्षमता आणि लायकी जी करोडो आणि अब्जोंची आहे तीच राहील ना कि कमी होईल. जे कधी तुमचे नव्हते ते तुम्हाला नाव ठेवणारच, मग ते कोणीही असो.

सांगायचे तात्पर्य इतकेच कि तुम्ही अपयशी होत असाल तर अपयशाच्या खोल दरीत पडताना घाबरू नका, बिनधास्त तळ गाठा, हात पाय गेले तरी चालतील फक्त काहीही करून डोके वाचवा कारण ह्याच डोक्यातील मेंदू चमत्कार करतो आणि हे मी अनुभवातून बघितले आहे. नंतर त्या खोल दरीतून तुम्ही जी झेप घेता ती तुम्हाला यशाच्या अमर्याद अंतराळात घेवून जाते.

एका व्यक्तीचा जीव गेला आहे त्यामुळे हा लेख कुठलाही तज्ञ म्हणून नाही तर निर्सगाने निर्माण केलेला एक मनुष्य प्राणी ह्या नात्याने लिहित आहे.

व्यवसायिक अपयशामुळे आत्महत्येचे विचार येत आहेत तर आजच संपर्क करा.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार