परप्रांतीय कमी खर्चात करत असलेला इडली चा कौटुंबिक व्यवसाय व त्यामधून मिळणारा नफा


धारावीत दिवसाला ३ लाख इडली वडे बनवले जातात व मुंबई च्या रस्त्यावर दुपारी २ वाजेपर्यंत सर्व च्या सर्व माल विकला जातो.

वेळ रात्री २ वाजून ४५ मिनिटे. ३५ वर्षाचा नवरा आणि २९ वर्षाची बायको हे दोघे मिळून १० बाय १० च्या खोलीत  इडली वडे बनवत होते. ती खोली भले जुनाट वाटत असली तरी बऱ्याच प्रमाणात स्वच्छ होती. पैश्याचे सोंग घेवू शकत नाही.

बायको इडली वडे बनवते आणि नवरा ते विकतो.

एका मोठ्या पातेल्यात इडली वडे ठेवतात व वर दोन स्टील च्या डब्यात सांबार आणि चटणी भरलेली असते.

तामिळनाडू मधील दुष्काळी भागातून स्थलांतरित झालेली हि कुटुंबे आहेत जी जगण्यासाठी जो पैसा लागतो ते कमावण्यासाठी धडपड करत आहेत.

जिथे काही तमिळ लोक हि दुष्काळामुळे आपली शेती सोडू इथे आले होते तर काही लोक हि जेव्हा सरकार ने जेव्हा मुंबई मध्ये दारू बंदी जाहीर केली होती तेव्हा धारावीतील एक कृप्रसिध्द गुंड दारूची तस्करी करत होता तेव्हा त्याने अनेक तमिळ लोकांना तस्करीसाठी कामाला ठेवले होते. ह्या कामासाठी देखील अनेक लोक तमिळ मधून स्थलांतरित होऊन मुंबई मध्ये पैसे कमावण्यासाठी आले होते.

इडली आणि वडे हे बनवण्यासाठी सोपे आहेत आणि सोबत त्यांची चव हि जवळपास सर्वांना आवडते. जवळपास २५० च्या घरात काहींचे दररोजचे ठरलेले ग्राहक आहेत. अधिकतर इडली विकणारे फेरीवाले हे दिवसाला ५०० ते १००० रुपये हे घरी घेवून जातात. पावसाळ्यात त्यांना मंदी चा सामना करावा लागतो.

इडली फक्त ग्राहकांना विकत नाही तर काही सरळ होलसेल मध्ये हॉटेल, केटरिंग सर्व्हिस, पार्टी आणि लग्नात देखील सप्लाय करतात. जर एका परिसरात २ ३ इडली वाले असतील तरी त्यांच्यात वाद होत नाही, कारण प्रत्येक जन ठराविक प्रमाणात इडली वडे घेवून येत असतो व जवळपास सर्वांचा माल हा संपून जातो. इथे स्पर्धा नाही, प्रत्येक इडलीवाला आपला माल संपवून घरी जातो.

नवरा बायको दोघे मिळून हा व्यवसाय चालवतात. जे उद्योजक व्यवसायिक आहेत त्यांनी लग्नासाठी जोडीदार निवडताना हि अट ठेवा.

नाही बोलले तरी ह्या व्यवसायात ३० % नफा आहे आणि माझे जे हॉटेल व्यवसायिक विद्यार्थी आणि मोटर आहे त्यांच्यानुसार ५० % पर्यंत नफा जातो. हा कौटुंबिक व्यवसाय जर २५०० रुपयांचे चे इडली वडे विकले गेले तर ७५० रुपये तरी निव्वळ नफा देतो.

आठवड्याचे ६ किंवा ७ दररोज न चुकता ते तुम्हाला व्यवसायाच्या जागी दिसतील. ह्यामुळे जे कामाला जाणारे आहेत ते कधीही उपाशी पोटी कामाला जात नाही. ह्याला बोलतात विश्वास जो गरज आणि कृतीतून निर्माण होतो.

व्यवसायाची वेळ रात्री ३ ते दुपारी २. सर्वच व्यवसाय काय सकाळी ९ ते रात्री १० च्या वेळापत्रकानुसार चालत नाहीत.

मुंबई मध्ये भाषेवरून कट्टरता नाही आहे म्हणून त्यांचा व्यवसाय हा तेजीत चालायला लागला. एक वास्तव हे आहे कि मी जेव्हा इडली चे पार्सल घ्याला जायची तेव्हा मी मराठीत बोलायचो तर समोरील विकणारी व्यक्ती हि तुटके फुटके हिंदी बोलायची पण मराठी नाही. आम्ही जर इतकी माणुसकी दाखवतो तर त्या बदल्यात परतफेड मराठी भाषा शिकणे काहीच नाही.

माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना मला काय सांगायचे आहे ते समजले असेल. अजून भर म्हणून मी हे सांगतो कि असे कुठले मराठी पारंपारिक पदार्थ आहे जे इडली वड्याची जागा घेतील? असे कुठले मराठी पारंपारिक पदार्थ आहे जे इतक्या सोप्या पद्धतीने बनवता येतील? असा कुठला पारंपारिक मराठी पदार्थ आसे ज्याची चव हि सर्वांना आवडेल अशी असेल? ह्याबद्दल संशोधन कराल. थोडे बदल करावे लागले तर ते देखील कराल.

अनेक मराठी लोक हे गरीब वस्तीत राहतात ते देखील असे प्रयोग करू शकतात. सुरवातीला सर्व अपयशी होतात तसे तुम्ही देखील व्हाल, हार माणू नका, प्रयत्न करत रहा, यशाचे शिखर तुम्ही गाठलाच हि अपेक्षा नाही तर खात्री आहे माझी.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
Previous
Next Post »
0 आपले विचार