मुंबई मध्ये लक्षणीय रित्या मराठी दुकानदारांची संख्या कमी का होत आहे?मुंबई मध्ये लक्षणीय रित्या मराठी दुकानदारांची संख्या कमी झाली आहे. एक काळ होता जेव्हा गुजराती, मारवाडी आणि इतर परप्रांतीय समुहांची दुकाने कमी प्रमाणात होती आणि मराठी माणसांची दुकाने हि जास्त प्रमाणात होती. नंतर मराठी माणूस हा स्वतः दुकान चालवायचे सोडून भाड्याने द्यायला लागला, घरी मुलांना नीट संस्कार न भेटल्यामुळे मुलांनी देखील दुकानाकडे दुर्लक्ष्य केले आणि शेवटी ते दुकान मारवाडी ह्याने विकत घेतले.

एकदा का दुकान मारवाड्याकडे गेले मग ते त्यांच्याच समाजात फिरत बसते आणि मराठी दुकान गेले, घर गेले व मुंबई च्या बाहेर ठाणे कल्याण दहिसर आणि वाशीच्या पुढे रहायला गेला. आज परिस्थिती अशी आहे कि लाईनीत मारवाड्यांची किराणामालाची, स्टेशनरी ची, मेडिकल ची महत्वाची दुकाने आहेत जिथे काही ग्राहकांना दिवसातून एकदा हे जावेच लागते आणि हे न संपणारे नफ्याचे चक्र आहे. म्हणून मारवाडी आज श्रीमंत आहेत. त्यांनी आपल्यावर मात नाही केली तर आपण मागे हटलो. इतरांना दोष देवून काहीही फायदा नाही.

पुढचा ठेच, मागचा शहाणा.

भावनिक मुद्द्यांपासून, लोकांपासून लांब रहा आणि सर्व लक्ष्य हे आर्थिक प्रगतीकडे केंद्रित करा. हि मी जिथे सुशिक्षित मराठी राहतात तिथली परिस्थिती मांडली आहे, ज्या गावच्या जमिनी परप्रांतीयांनी घेतल्या आहेत त्याचे काय? त्याची तर माहिती आम्हाला भेटत नाही. जी माहिती भेटते ती फक्त वादविवादाच्या मुद्द्यांची.

गुजराती आणि मारवाड्यांना मारामारी करता ये नव्हती आणि नाही तरीही ते मुंबई सारख्या ठिकाणी जिथे कधी काळी गुंड आणि स्मगलर्स ह्यांचे वास्तव्य होते अश्या वेळ पासून आपले दुकान चालवत आहेत. त्या वेळेस मराठी लोकांचा दबदबा देखील होता पण शेवटी आज परिस्थिती अशी आहे कि जिथे मराठी लोकांनी जागा काबीज केल्या होत्या त्या कालांतराने त्या परप्रांतीयांच्या घश्यात गेल्या.

काही सत्य उदाहरणे अशी आहेत जिथे झोपडपट्टी होती ती जागा एका युपी च्या व्यक्तीने काबीज करून ठेवली होती, अनेक वर्षे गेली आणि आज तिथे मोठी इमारत उभी राहिली कारण जवळपास तिथली सर्व जागा हि त्याच्या नावे होती. आज तो २० ३० वर्षांनी करोडपती झाला. अशी उदाहरणे मुंबई मध्ये खूप आहेत.

ते कुणाच्या ना अध्यात ना मध्यात, काही झाले तरी दुसऱ्यांना हाताशी धरून आपले काम काढून घेतात. जे शहराचे कायदा व सुव्यवस्था सांभाळतात, जे शहराचे व्यवस्थापण बघतात त्यांच्या कर्मचार्यांना आणि अधिकार्यांना सतत चिरीमिरी देवून आपले खास बनवून घेतात.

जिथे मारवाड्यांचे दुकान असते त्या समोरच्या नाक्यावर स्वतः ची रूम असलेली मराठी तरून मुल उभे असतात, त्यांचे विषय हे संपूर्ण पणे वेगळे असतात. दारू, मुली, सन, उस्तव, जयंती ह्यापुरते त्यांचे अस्तित्व असते आणि शेवटी जस जसे वय वाढत जाते तस तसे ते मुंबई बाहेर फेकले जातात.

जर कुठल्या मारवाड्याची बायको किंवा मुलगी सुंदर असेल तर त्या ग्रुप मधील काही मुल तिला पटवण्याचा प्रयत्न करत बसणार आणि नाही जमले तर तिची बदनामी करणार. शेवटी हातात काही लागत नाही.

इथे नाक्यावर मराठी मुल तर समोर मारवाड्याचा मुलगा हा दुकान सांभाळत असेल, जेव्हा दुपारचा खाली वेळ भेटेल तेव्हा मारवाड्याचा मुलगा हा त्या मुलांसोबत थोडा वेळ घालवेल आणि जेव्हा गिऱ्हाईकांची गर्दी वाढेल तेव्हा तो परत जावून दुकान सांभाळेल.

नवीन जोडपे येते तेव्हा ते दुकान घेतात, तिथेच दिवसरात्र राहतात, तिथेच नवरा बायकोचा शरीर संबंध प्रस्थापित होतो, तिथेच मुल जन्माला येते, मुल मोठे होवून शाळेत जायला लागते, दुकानातील गिर्हाईक वाढत जातात, प्रगती होते, जवळच एक खोली भाड्याने किंवा विकत घेतात व आपल्या कौटुंबिक यशाचा आनंद घेतात.

मराठी दुकानदारांसाठी इतकेही नैराश्याचे क्षण नाही कारण मला असे मराठी दुकानदार भेटले जे गुजराती, मारवाड्यांच्या तोडीस तोड आहेत पण त्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी आहे. जास्तीत जास्त मराठी दुकानदारांचे अनुभव हे वाईट आले.

गुजराती आणि मारवाड्यांच्या मुलांकडे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात तर मराठी मुलांकडे फक्त नोकरी. गुजराती आणि मारवाड्याची मुल लहानपणापासून व्यवहार शिकतात तर मराठी मुल हि खेळ. गुजराती आणि मारवाड्याची मुल हि भावनेला ताब्यात ठेवतात तर मराठी मुल हि वाहून जातात.

शेवटी लक्ष्यात ठेवा कि पैसाच कामी येतो. ज्याचे कोणी आयसीयु मध्ये भरती आहे आणि त्याच्याकडे पैसा नाही अश्यांची काय अवस्था होत असेल तो विचार करा. अनेकांकडे साधे दररोज चे पोट भरण्यासाठी देखील पैसे नाही आहेत ते कसे दिवस काढत असतील, नुकत्याच जन्म झालेल्या आईला अन्न भेटत नसल्यामुळे दुध येत नसेल तर ती कशी करत असेल?

मुलभूत गरजांकडे लक्ष्य ठेवा आणि ते पूर्ण करा, फक्त तुमच्या कुटुंबापुरते तुम्ही बघितले तरी चालेल कारण एक तरी मराठी कुटुंब हे पैश्यांअभावी गरीबित खितपत तर नाही पडले हीच माझ्यासाठी आनंदाची बाब झाली.

आपण प्रत्येकाला बदलू नाही शकत पण आपण बदललो कि आपले बघून इतर देखील बदलतील, वेळ प्रसंगी आपण त्यांना थोडी मदत देखील करू शकतो.

लिहायचे खूप आहे पण इथेच थांबवतो. अजून इतर समाजाची काळी बाजू हि मी मांडली नाही ती तुम्हाला अनुभवाने शिकायची आहे. इथे लोक भावनिक आहे आणि कल्पनेत रमतात त्यामुळे त्यांना आपला आयुष्यातील काळी बाजू बघण्यात काहीही रस नसतो कारण त्यांना जागे व्हायचे नसते अश्यांना झोपून राहू द्या, तुम्ही फक्त जे प्रगती करत आहेत जे कृतीशील आहे अश्यांसोबातच रहा.

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
Previous
Next Post »
0 आपले विचार