वाचा आणि विचार करा “५ लाखात शहरात घर”, “५०० रुपयात मोबाईल”, “घर बसल्या लाखो कमवा”


फुकट आणि स्वस्त च्या मागे पळणे म्हणजे आपली पैसे न कमवण्याची, कमी आत्म विश्वासाची मानसिकता दर्शवते.
१) एक जाहिरात पुन्यासारख्या शहरात काही लाखात स्वस्तात घर, बुकिंग रक्कम फक्त १००० + सेवाकर १४५, जाहिरातीवर विश्वास बसण्यासाठी वापर केला गेला सरकारी योजनेचा, मुख्यमंत्री आणि एका मोठ्या मंत्र्याचा फोटो वापरण्यात आला, त्यावर कमावलेली रक्कम "१०,००,००,००० (१० करोड)" पेक्षा जास्त, हे पैसे कमवायला लागलेला कालावधी फक्त २ ते ३ दिवस.
२) ५०० रुपयात मोबाईल, जाहिरातीवर विश्वास बसण्यासाठी हि कल्पना मेक इन इंडिया ह्या कार्यक्रमात साकार करण्यात आली, कमी खर्चाचे व्यासपीठ सरकारचे, काही मोठ्या मंत्र्यांचे चेहरे. मोबाईल ची किंमत २५१ आणि ५०० रुपये, पहिल्या दिवशी ३०००० लोकांनी बुक केले व बुकिंग ची आत होती कि पूर्ण पैसे भरणे, पहिल्याच दिवशी कमावलेली रक्कम ७५,00,000 (७५ लाख).लोकांचे नशीब चांगले म्हणून पाह्लीयाच दिवशी वेबसाईट क्रेश झाली नाहीतर हि पण रक्कम करोडोंच्या घरात गेली असती.
३) घर बसल्या संगणकावर पैसे कमवा, ४ तासात १० किंवा १५ हजार कमवा दररोज, फक्त सुरवातीला १००, २००, ५०० किंवा १००० रुपये भरा, जाहिरात बनवायला खर्च वेबसाईट कमीत कमी एक पेज ५०० रुपये वर्षाचे, पेपर जाहिरात २०० ते ३०० अंदाजे, छोटे पत्रक स्थानकाबाहेर वाटण्यासाठी १००० रुपयात २००० ते ३००० साईझ नुसार, कमाई दिवसाला लाखो रुपये.
४) उद्योग व्यवसाय भरभराटीला आणा, एक दिवसाचा कोर्स ते ८ दिवसाचा कोर्स सर्व समस्यांचे समाधान फी हजार पासून ते लाखांपर्यंत, विश्वास बसण्यासाठी मोफत व्याख्यान, शब्दांनी संमोहित करायचे (फक्त कमजोर मानसिकतेची लोक किंवा समस्यांनी ग्रासलेली लोक लगेच आकर्षित होतात), १०० तून एखाद दुसरा ज्याच्या वर सकारात्मक परिणाम झाला आहे तो उठून उभा राहून आपला अनुभव सांगणार, तात्पुरते प्रोस्ताहन देणारे भाषण. गुंतवणूक सभागृह किंवा शाळेचा वर्ग ३ तासांसाठी भाड्याने घेणे, फी कमीत कमी १००००, १०० तयार झालेली लोक २० * फी १०००० = २०००००.
५) मानसिक विकारांपासून मुक्ती मिळवा, निराशा, भीती, कमी आत्मविश्वास, तोतरेपणा, न्यूनगंड, स्मरण शक्ती वाढवा, १ ते ८ दिवसांचा कोर्स करा आणि आयुष्य सुख समाधानाने जगा. ४ क्र्मांकासाराखेच इथे पण कमावून जातात.
उदाहरण तर खूप आहेत आणि त्याचे भयंकर वास्तव हि बघितले आहे, पैसा आणि ताकद खूप काही करू शकते, एकदा का पोलिस स्टेशन शी तुमचा संपर्क झाला कि चांगलेच अनुभवास येईल.
वास्तवात या, तुमच्याकडे आज पैसे आहेत तर सगळे तुम्हाला विचारतील, विविध प्रकारचे लोभ दाखवून तुमच्या जवळचा एक एक पैसा काढण्याचे काम करतील, अन्न, वस्त्र, निवारा, सरकार, वीज वितरक, पाणी वितरक ह्या सर्वांना आपणा पैसा पुरवतो, ते काही आपल्याला फुकट नाही देत, तुमच्याकडून एक एक रुपयाचा हिशोब घेतला जातो, सरकारला कर नाही भरला तर लगेच तुमच्यावर फौजदारी कारवाई करतील, पैसे नसतील तर किराणावाला अन्न नाही देणार, घरभाडे नाही भरले तर सोसायटी कारवाई करते, वीज वितरक वीज मित्र चे कनेक्शन कापून टाकतो, पाणी वितरक पाणी देत नाही, ह्याला खालील पर्याय आहेत,
१) मानसिक दृष्ट्या सक्षम बना
२) आर्थिक दृष्ट्या सक्षम बना
३) नुसते शिक्षित नका बनू तर अनुभव घेवून हुशार बना
४) मुलांना मुलभूत गरजा पूर्ण कश्या करायच्या ह्याच्याबद्दल प्रत्यक्ष प्रशिक्षण द्या, त्यानंतर त्यांच्या शिक्षणाकडे बघा.
काही शंका असल्यास संपर्क करा.

धन्यवाद,

अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार