श्रीमंतीकडे व यशाकडे खेचून नेणारी उत्तेजना


फार पूर्वीच्या काळी,एका महान योध्यासमोर अशी एक परिस्थिती उदभवली कि रणांगणावर विजय निश्चित करण्यासाठी त्याला खात्रीलायक निर्णय घ्यायला हवा होता. तो एका शक्तिशाली शत्रूशी सामना देण्यासाठी आपली सेना पाठवणार होता, पण शत्रूच सैन्यबळ संख्येन अधिक होत. त्यान आपले सैनिक जहाजांवर चढवले, शत्रूच्या प्रदेशाकडे कूच केल,तिथ आपले सैनिक आणि शस्त्रसामुग्री उतरवली आणि आपली सगळी जहाज पेटवून जाळून टाकण्याची आज्ञा दिली. युध्द सुरु होण्यापूर्वी आल्या सैनिकांना तो म्हणाला, 'आपली जहाज भस्मसात झालेली तुम्ही बघतच आहात. आता आपण युद्धात जिंकल्याशिवाय परतू शकणार नाही. आता पर्याय म्हणजे आपण जिंकू अथवा मरू !'
आणि ते जिंकले
यश मिळवण्यासाठी, मग ते कुठल्याही क्षेत्रात असो, प्रत्येकाला आपले मागील पूल जाळावेच लागतात, परतीचे सगळे दोर कापून टाकावे लागतात, फक्त अस करण्यानेच कुणीही, ज्याला ज्वलंत मानसिक शक्ती म्हणतात, जी यशासाठी अत्यावश्यक असते, ती मिळवू शकतो.
थिंक बिग ग्रो रिच
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार