स्थानिक स्वदेश उद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार तयार करा.


 गुंतवणूक स्थानिक उद्योजक व्यवसायात करा.


शेअर बाजारपेक्षा जास्त नफा स्थानिक उद्योजक व्यवसायिक निर्माण करू देतील.


ज्ञान जागतिक ठेवा व त्याचा वापर स्थानिक पातळीवर करा.


विदेशी प्रोस्ताहनला बळी पडू नका.


हजारो कोटी उलाढाल करणारा उद्योजक व्यवसायिक निर्माण करण्यापेक्षा लाखोंची उलाढाल करणारे हजारो उद्योजक व्यवसायिक निर्माण करा.


धन्यवाद

अश्विनीकुमार


सर्व आदर लोक जेव्हा सांगतात कि ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा कार्यालयात काम करतात तेव्हा देतात. पण एक मुख्य मुद्दा विसरलात कि जग नोकरीच्या पलीकडे खूप मोठे आहे त्यामुळे तुम्ही देखील तुम्ही करत असलेला उद्योग व्यवसाय अभिमानाने सांगा.


"मी रिक्षाचालक आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी वडापाव विक्रेता आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी दुकानदार आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी खानावळ चालवतो आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."


तुमचा जो काही व्यवसाय आहे तो कमेंट टाकून अभिमान व्यक्त करा. कळू दया लोकांना कि नोकरी सोडून देखील असे अनेक क्षेत्र आहेत जिथे प्रचंड संधी उपलब्ध आहेत. किती दिवस संकुचित मर्यादेत रहायचे? अशी अनेक लोक संपर्कात आली ज्यांनी छोट्यापासून सुरुवात केली मग ते रिक्षावाले ते रस्त्यावर विक्री करणारे आज श्रीमंत झाले आहेत.


इथे मुद्दा कोण किती श्रीमंत झाला हा नाही तर इथे मुद्दा आहे कि नोकरी सोडून असे अनेक क्षेत्र आहेत जिथे स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आणि हे शाळेत शिकवले पाहिजे ना कि पदवी देवून नंतर बेरोजगारांची फौज तयार केली पाहिजे. जर शिक्षण चांगला रिक्षावाला, वडापाव वाला, दुकानदार, खानावळ चालवणारा, गेरेज वाला नसेल बनवत तर असे शिक्षण काय कामाचे? म्हणजे शिक्षण भेदभाव करते.


तुम्ही तुमचे जीवन जगण्यासाठी, आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी जे जे काम करत आहात त्याचा आदर आहे.


धन्यवाद
अश्विनीकुमार

 


 “उद्योग व्यवसायात उतरण्याची काहींचे वय हे ८ वर्षे, १२ वर्षे, १५ वर्षे, १८ वर्षे ते ७० वर्षे आहे. उद्योग व्यवसायात कुठेही आडकाठी नाही, ज्याला जे करायचे तो ते करू शकतो. तुम्हाला स्पर्धा अश्या सर्वांसोबत करायची आहे प्रत्येकाचा अनुभव हा दांडगा आहे, काहींनी ४, ५ उद्योग व्यवसायात प्रयत्न करून ६ व्यात यश मिळवले तर काहींनी सपशेल अपयश तर काहींनी साहिंच्या साही मध्ये यश. इतके विविध अनुभव घेतले आहे कि तोडच नाही. हे सर्व दिसायला सामान्य वाटतात पण ह्यांच्याकडे असलेले ज्ञान हे तुम्हाला जगातील कितीही मोठ्या विद्यापीठात मिळणार नाही. म्हणून सांगतो स्वतःला कमी समजू नका, तुमच्यात देखील क्षमता आहे आणि बाजारपेठेत ती तुम्ही आरामात दाखवू शकता, आम्हाला पण एका उद्योजक व्यवसायिकाची गरज आहे. बाजारपेठेत मागणी हि सतत सुरूच असते.”

अश्विनीकुमार

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने Byju वर विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे क्रमांक घेवून धमकी वजा सूचना देत त्यांचे कोर्सेस विकतात हा आरोप केला आहे.




Byju's ऑनलाईन शैक्षणिक सेवा पुरवणारी कंपनी आहे. मी मध्यंतरी अश्या सर्वांवर किंवा अश्या लोकांवर किंवा अश्या लोकांचे सुविचार टाकणे बंद केले कारण मला माहिती होते कि ह्यांची माझ्याकडून नकळत मार्केटिंग होईल, माझे फेसबुक पेज वाढत जाईल, कोणीतरी पालक Byju's चे महागडे कोर्सेस घेईल व व स्वतःच्या मुलांवर दबाव टाकेन.


Byju's चा मालक त्याच्या जीवनावर देखील मी एक लेख लिहिणार होतो पण जेव्हा शिक्षण शैक्षणिक क्षेत्राची काळी बाजू समजले तेव्हापासून हात जोडले. जे जे प्रोस्ताहन देणारे आहेत, अब्जो कमावलेले आहेत, त्या सर्व पैसे देवून मार्केटिंग करण्यात आले आहे नाहीतर आमच्या काळापासून ते आता पर्यंत का नाही चांगले शिक्षक यशस्वी झालेत? ज्यांना मार्केटिंग जमले आणि ज्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा जास्त चिंता हि त्यांच्या पालकांकडे असलेल्या पैश्यांवर होते तेच कसे पुढे गेले?


शिक्षण किती मुलांसाठी घातक होत गेले हे आपण आता समजून घेवू


"NCPCR" हि सरकारी संस्था "National Commission for Protection of Child Rights" मराठीत "राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग" हा तिचा फुलफोर्म, ह्या संस्थेचे काम काय आहे माहिती आहे काय? ह्यावरून तुम्हाला समजले पाहिजे कि हे प्रकरण किती गंभीर आहे ते. हि संस्न्था लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करते. म्हणजे विचार करा कि ह्या संस्थेला मध्यस्थी करावी लागली ते.


राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग Byju's ला हजर राहण्याचा हुकून बजावला. Byju's वर आरोप काय करण्यात आले? काहीतरी असेल म्हणून तर हुकुम बजावण्यात आला. त्यांच्यावर आरोप malpractice म्हणजे व्यावसायिक सेवेतील निष्काळजी, गैर किंवा बेकायदेशीर वर्तन; गैरव्यवहार, दुराचार चा करण्यात आला. विचार करा शैक्षणिक संस्था आणि तिच्यावर असले आरोप.


आरोप काय आहे तर कोर्स, क्लास म्हणजे शिकवणी विकत घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जातो, चुकीची माहिती दिली जाते, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे फोन क्रमांक विकत घेतले जातात, जर त्यांचे कोर्सेस क्लासेस म्हणजे शिकवण्या नाही घेतल्या तर मुलांचे भविष्य उध्वस्त होईल अशी भीती घातली जाते. भारतातील सामाजिक व्यवस्था अशी होती कि काहींना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण तेच इंग्रजांनी निर्माण केलेल्या शिक्षण व्यवस्थेत होता मग अशे पालक जसे कि कमी शिकलेले, किंवा ज्यांची पहिली किंवा दुसरी पिढी १० वी, १२ वी , १५ वी किंवा उच्च शिक्षण पूर्ण नाही करू शकले अश्यांना टार्गेट केले जाते.


आयोगाला जेव्हा काही वृत्तपत्रातील बातम्या अश्या दिसून आल्या कि ज्यामध्ये पालक सांगत होते कि मुलांच्या उज्वल भविष्याचे आमिष दाखवून त्यांचे कोर्स विकत घेण्यात भाग पाडत होते, काही पालकांनी आर्थिक शोषणाची तक्रार केली तर काहींना फसवण्यात आले आणि ह्याप्रकारे पालकांची कठीण परिश्रमाने मिळवलेले, बचतीचे पैसे देखील कोर्स क्लास च्या नावाखाली उकळण्यात आले. ह्यामध्ये असे आढळून आले कि फी परत करण्याचे सांगून पालकांना फी परत केली जात नव्हती.


शिक्षण चांगले आहे कि वाईट हा भाग आणि वाद वेगळा झाला, मी तर आपली इंग्रजांनी दिलेली शिक्षण व्यवस्था मानतच नाही, गुरुकुल पद्धत जिथे प्रात्यक्षिक देखील करून घेतले जायचे आणि त्यासोबत आधुनिक वैज्ञानिक पद्धत जिथे सर्वांगीण विकासाभर भर देण्यात येईल अश्या शिक्षण पद्धती आवडतात. पण इथ मुद्दा येतो तो पालक आपल्या मुलांवर टाकत असलेल्या दबावाचा आणि 


ह्या अगोदर सुद्धा Byju संस्थेचा मालक रविंद्रन ह्याला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग संस्थेने हजर राहण्याची नोटीस बजावली होती. आणि Byju चा मालक रविंद्रन ह्याचे अनेक प्रोस्ताहित करणारे व्हिडीओ नेट वर उपलब्ध आहेत. त्याची महती सांगत आहेत ते सर्व पेड मार्केटिंग आहे असे समजा.


६० पैकी पहिल्या ५ मध्ये काही मुले सतत वर्गात पहिली येतील उच्च शिक्षण पर्यंत पहिली येतील मग बाकींच्या मुलांचे काय? त्यामुळे अश्या जंजाळात अडकू नका, ह्या जगात संस्कार आणि अनुभवापेक्षा दुसरे शिक्षण कुठलेही नाही, बाकी निर्णय तुमचा.


धन्यवाद

अश्विनीकुमार

 

“आपण आरामात स्थानिक लघु उद्योग व्यवसाय वाचवू शकता ते देखील विना बँकेची मदत घेता. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ १३ कोटी पकडू, जरी एक एक रुपया काढला तरी एखाद्या स्थानिक उद्योजक व्यवसायिकाला आपण कर्जातून बाहेर काढू शकतो, नवीन लघु उद्योजक व्यवसायिक निर्माण करू शकतो, शेतकऱ्यांची आत्महत्या पूर्णपणे थांबवू शकतो. हे स्थानिक पातळीवर जरी सुरु केले तरी आपण मदत योग्य आणि गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवू शकतो जेणेकरून आपल्या पैश्यांचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. मी फक्त १ रुपया बोललो पण असे नेक आहेत जे १० ते जास्तीत जास्त आपण १००० रुपये मर्यादा जरी ठरवली तरी अनेक लघू उद्योजक व्यवसायिक आपला उद्योग व्यवसाय हा वाचवून परत भरारी घेवून आपले पैसे परत ते परत करतील.”


अश्विनीकुमार