“स्थानिक उद्योग व्यवसायांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असे अनेक उद्योजक व्यवसायिक दिसून येतील ज्यांना कर्जाची गरज आहे पण कोणीही कर्ज द्यायला तयार नाही पण त्यांच्यात क्षमता आहे कि त्यांना भांडवल भेटले कि ते परत उभे राहू शकतात तेव्हा अश्या कंपन्यांना जर तुम्ही एकट्याने किंवा समूहाने मिळून पैसे पुरवले योग्य व्याज दराने परतावा घेतला तर असे अनेक स्थानिक, छोटे उद्योजक व्यवसायिकांना तुम्ही नाव संजीवनी देवू शकतात.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “मित्रांचा एक समूह कुठेही उद्योग व्यवसायाची सुरुवात करू शकतो व तो वाढवत नेवू शकतो. एकदा का समविचारी मित्र एकत्र आले कि सर्व प्रगती करतात, एकमेकांना पुढे नेतात. उद्योग व्यवसाय वाढवतात नाहीतर एकपासून अनेक उद्योग व्यवसाय सुरु करतात.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “शेअर बाजारात पण गुंतवणूक करा पण आपल्या आजूबाजूला देखील बघा कुणाला गुंतवणुकीची गरज आहे कि नाही. तुमच्या एक गुंतवणुकीमुळे एक लहान उद्योग व्यवसाय परत सुरु होऊ शकतो आणि परतावा हा १०० % असतो. हि लोक पैसे घेवून पळून जात नाही तर जाणीव ठेवून परत करतात. १०० पैकी ५ पळून जातील, ३५ ह्या नाहीतर त्या कारणांनी अपयशी होतील पण ६० % यशस्वी होतील. इतका परतावा तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि हे छोटे उद्योजक व्यवसायिक अनेक स्थानिक उद्योग व्यवसायाला हातभार लावतात व स्थानिक ग्राहकांना उत्तम दर्ज्याच माल देतात किंवा सेवा पुरवतात.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “९ ते ५ नोकरी हा प्रकार उरला नाही, महागाई प्रचंड वाढली, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च वाढला ह्याचा फायदा घेवून काही लोक नोकरी सोडून उद्योग व्यवसाय सुरु करण्याच्या जाहिराती करतात व सामान्य नोकरदार वर्ग त्यामध्ये फसून पैसे वाया घालवतो. अश्या जाहिरातींच्या मायाजालात फसू नका, बचत आणि योग्य गुंतवणूक करा, मुलांना लहानपणापासून आर्थिक आयुष्याचे धडे द्या मग बघा कसे चमत्कारिक रित्या तुम्ही तुमच्या आर्थिक संकटातून बाहेर पडता व आर्थिक आयुष्यात झेप घेतात ते.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “चितळे व इतर उद्योजक व्यवसायिक हे गुगल येण्याच्या अगोदरपासून प्रसिद्ध होते व भले ते ऑनलाईन रजिस्टर जरी नसले तरी ग्राहकांना काही फरक पडत नाही कारण त्यांची जाहिरात हि प्रवासी लोक म्हणजे ग्राहकांपासून होते, आपल्याकडे येते ते पण पूर्ण अनुभव घेवून अनेकदा तेथून विकत घेवून घरी नेले जाते, नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांना दिले जाते, इथे कुठेही फुकट वितरण केले नाही तरीही जाहिरात उत्पादनासह झाली. हा नियम फक्त मोठ्या उद्योजक व्यवसायिकांना नाही तर लहान उद्योग व्यवसायिकांना देखील लागू होतो. प्रवासी ग्राहक त्यांची सुद्धा जाहिरात करत असतात. ऑनलाईन ला इतके महत्व देवू नका आणि उद्योग व्यवसाय सुरु करा, प्रचंड यशस्वी व्हाल.”


अश्विनीकुमार