तुमचा प्रवास आता ह्या क्षणापासून सुरू होतो


 अनेक लोक “योग्य वेळेची” वाट पाहत राहतात, त्यांना वाटते की त्यांची भीती नाहीशी होईल आणि गोष्टी आपोआप सोप्या होतील. पण खरं तर, असं होत नाही. तुम्ही जितकी जास्त वाट पाहाल, तितकी तुमची भीती वाढते आणि शंका अधिकच पक्क्या होतात. चांगल्या संधी हातातून निसटून जातात. एकच गोष्ट बदलते, ती म्हणजे तुम्हाला वाट पाहण्याची सवय लागते आणि तुम्ही तुमची स्वप्ने पुढे ढकलत राहता.


ती पहिली धडधड किंवा अस्वस्थ भावनाच तुम्हाला सतर्क करते आणि खरा बदल घडवून आणते. एकदा तुम्ही त्या परिस्थितीत उडी मारली की, तुमचे मन आणि शरीर स्वतःला त्यानुसार जुळवून घेतात आणि विकसित होतात. म्हणून, वाट पाहत बसू नका. तुम्ही घाबरलेले असलात तरी पहिले पाऊल उचला. प्रगती आणि बदल खऱ्या अर्थाने तेव्हाच सुरू होतात.


अश्विनीकुमार


 "उद्योग व्यवसायात जेव्हा क्लाइंट मिटिंग असते तेव्हा तुम्ही एकटे नसता, तुमचा प्रतिस्पर्धी देखील असतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा इथे तुमच्या ज्ञानासोबत तुम्हाला सतत मनातल्या मनात बोलायचे आहे कि "मी करू शकतो." "परिस्थितीवर माझा ताबा आहे." "आरामात शक्य आहे." तेव्हा कुठे जावून तुम्ही मिटिंग यशस्वी कराल. वॉश बेसिन किंवा बाथरूम मध्ये आरसा असतो तिथे आरश्यात बघन केले तर अजून चांगला फायदा होईल किंवा जिथे एकांत असेल तिथे जावून करा. फक्त यश आणि पैसा बहु नका त्यापाठी खूप मेहनत असते, चित्र विचित्र प्रयोग स्वतःला प्रोस्ताहित करण्यासाठी करावा लागतो कारण लाखो करोडोंचा व्यवहार आहे."


अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया


 "उद्योग, व्यवसाय आणि शेअर बाजार म्हणजे आर्थिक आयुष्यात फक्त नफा कमावणारा यशस्वी नाही होत तर कमी तोटा करणारा देखील यशस्वी होतो. जसे दिवस आणि रात्र असते, जसे सुख आणि दुख असते तसेच नफा तोटा हे आर्थिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, अमर्याद नफा आणि मर्यादित तोटा असे तुम्हाला सतत करत रहावे लागते."


अश्विनीकुमार


 "उद्योजक व्यवसायिक हे त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी टिम वर्क शिकायला येतात पण त्यांच्या कुटुंबासाठी देखील हे टिम वर्क असते हे ते विसरतात. जे उद्योग व्यवसायासाठी शिकतात ते आपल्या आयुष्यात देखील चांगले कामाला येतात आणि त्यांच्या घरी कुटुंब एक टिम सारखे काम करत सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगते, फक्त उद्योग व्यवसायात नाही तर कौटुंबिक यश देखील मिळते. आणि जे हा नियम पळत नाही त्यांच्या कुटुंबात अनेक समस्या दिसून येतात व अनेकांना घटस्फोट, विवाह बाह्य संबंध मूल मुली बिघडणे ह्यांचा सामना करावा लागतो."


अश्विनीकुमार


"जे लोक आज पोट भरण्यासाठी, नोकरी गेली म्हणून किंवा जे काही कारण असेल ज्याने डिलिव्हरी चे काम करणे सुरु केले त्यांनी लक्ष्यात ठेवा, कि एक काळ असा होता जिथे लोकांना कुरिअर डिलिव्हरी चे काम करावे लागत होते आणि तिथून सुरुर्वात करून प्रगती करत नवीन संधी शोधत लोकांनी आयुष्य बदलले, त्या काळातील अनेक उद्योजक व्यवसायिकांच्या भूतकाळाच्या आयुष्यातील एक भाग हे कुरिअर चे काम होते. कामाचे स्वरूप बदलले पण यशाचा मार्ग सर्वांसाठी एकच आहे. तुमचे भविष्य उज्वल आहे, हार मानू नका. तुमची वर्तमान परिस्थिती तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तुमचे पूर्ण आयुष्य नाही."


अश्विनीकुमार


# # # # #