नकारात्मक आई वडील आणि नकारात्मक वातावरणात वाढणाऱ्या मुलांना कश्या प्रकारे त्रास सहन करावा लागतो?आपल्या भारतात आई वडिलांना देवाची उपमा दिलेली आहे आहे देवाचा दर्जा देखील पण लोक हे विसरतात कि ते देखील मनुष्यच आहे.

जी मुलं लहानपणापासून आई वडिलांचे सकाळ दुपार आणि संध्याकाळ भांडणे बघत असतात त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

काही घरात जोडपे आपल्या लहान मुलांसमोर मारामारी करतात, एकमेकांना शिव्या देतात तेव्हा मुलांवर काय प्रभाव होत असेल?

घरी मुल किंवा मुले असून देखील ते दुर्लक्षित राहतात त्यांच्यावर काय प्रभाव होत असेल?

मानसिक आणि शारीरिक छळ तर सामान्य आहे पण काही घरात लैंगिक छळ देखील केला जातो तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

स्वतःच्या मुलांना टाकून बोलले जाते आणि नातेवाइकांच्या, शेजाऱ्यांच्या मुलांना डोक्यावर घेतले जात असेल तर त्यांच्यावर काय परिणाम होत असेल?

काही घरात तर असे आढळून आले कि आई वडील दोन्ही किंवा दोन्हीपैकी एकाला मुलं नको असते तेव्हा अनेकदा त्यांना बोलून दाखवले जाते आणि ते देखील कोवळ्या वयात, अश्या वेळेस मुलांवर किती खोल आघात होत असेल?

काही आई वडील तर न एकूण घेता रागवायला सुरवात करतात. ह्यामुळे न्युनगंड निर्माण होतो, भीती निर्माण होते, तणाव नैराश्यात जातात, नवीन काही करायला घाबरता. अशी मुल त्या घरात कशी वाढली असतील?

जर मानसिक रुग्ण असतील तर त्यांनी आपल्या मुलांना कसे वाढवले असेल?

अति राग, अति काळजी किंवा कुठल्याही भावनांचा अतिरेक हा मानसिक आजारच आहे आणि ह्या सर्व नकारात्मक रुपात आपल्या मुलांवर काढल्या जातात तेव्हा विचार करा कि त्या घरात मुलं कशी वाढत असतील?

मुलांसमोर विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवले जातात, मुलं बाहेर गेल्यावर सभ्यतेचा बुरखा पांघरलेला समाज हा त्यांना चिडवत असतात, टोमणे मारतात, अश्लीश शब्द वापरतात तेव्हा त्या मुलांवर कसा परिणाम होत असेल?

मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ होत असून देखील त्यांना शेजाऱ्यांच्या घरी, नातेवाइकांकडे किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे सोडून जातात व आल्यावर मुलांची विचारपूस देखील करत नाही अश्या मुलांची मानसिकता कशी झाली असेल?

लहान किंवा मोठ्या भावंडांमध्ये घरी राजकारण चालत असेल आणि ज्याची चूक नसेल तरीही त्यालाच शिक्षा दिली जात असेल तर त्याच्या मानसिकतेवर किती मोठा आघात होत असेल?

घरचे सोडून जात, धर्म, इतिहास आणि राजकारण करत बसत मुलांकडे दुर्लक्ष्य करतात आणि सर्व दोष इतर जात, धर्म आणि राजकीय पार्टीला देत बसतात. त्यांना इतिहास माहिती असतो पण मुलांना काय पाहिजे हे माहिती नसते.

दुसऱ्या जातीधर्माचे कधी घरी आले नाही आणि वाईट केले नाही, स्वतःच्या चुकीच्या निर्णयांचे खापर त्यांच्यावर फोडले जाते आणि घरी मुलांना देखील लक्ष्य केले जाते मग त्या मुलांना कसे वाटत असेल?

मुलांना जन्म द्यायचा कि नाही हे सर्वस्वी आई वडिलांवर अवलंबून असते. कारण ते मोठे असतात अनुभव आलेला असतो. नंतर जन्माला आलेले बाळ हे सर्वस्वी आई वडील व कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून असते.

स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे अनेक प्रकार आहेत आणि काही परिस्थिती नुसार लवकर देखील पायावर उभे राहण्याचा पर्यंत करतात म्हणून तुम्हाला अनेकदा गरीब लहान मुले काम करताना दिसून येतात. पण मध्यम वर्गात शिक्षण पूर्ण होवून पायावर उभे राहता येते. तोपर्यंत मुलं हि आई वडिलांवर अवलंबून असतात.

पायावर उभे राहण्यासाठी फक्त पैसा आणि नोकरी नाही तर मानसिकता देखील तशी घडवावी लागते आणि हे सर्व संस्काररूपाने आपल्याला मिळते. त्यामुळे आपण मुलांना दोष देवू शकत नाही.

साधे उदाहरण ज्या घरात सर्वकाही उत्तम चालू आहे अश्यांचे घ्या. इंटरनेट च्या काळात आता घरगुती हिंसाचार हे लपून राहणार नाही. खूप कमी मुलं हि सुख समाधानाने आयुष्य जगतात आणि बाकी विविध प्रकारचे मानसिक आजार जसे तणाव, नैराश्य, चिंता, भीती आणि इतर नकारात्मक भावना घेवून आयुष्य जगतात व तशी परिस्थिती निर्माण करतात.

आयुष्य म्हणजे मस्करी नाही आणि मुलांना जन्माला घालणे देखील मस्करी नाही. मुलं जन्माला घालण्यासाठी फक्त सेक्स करावा आणि आणि कुठलाही लैंगिक दोष नसावा लागतो पण नंतर दिले जाणारे संस्कार ह्याबद्दल काय? मुलं आई वडिलांचे बघून शिकत असतात व कायमस्वरूपी अंतर्मनात रुजवत असतात.

अनुभव अमर्यादित आहे. ते सर्व लेखांच्या स्वरुपात मांडू शकत नाही. तुमचे जर बालपण हे नकारात्मक वातावरणात गेले असेल तर तुम्हाला उपचाराची सक्त गरज आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे भविष्य हे अंधकारमय होण्यापासून वाचवू शकता व आयुष्य पुनर्निर्मित करू शकता.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

धन्यवाद
अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध
Previous
Next Post »
0 आपले विचार