काही लोक दिवसाला 50 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 500 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 5000 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 50000 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 500000 रुपये कमावतात.
काही लोक दिवसाला 500 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 5000 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 50000 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 500000 रुपये कमावतात.
हे झाले वास्तव, आता मी डोळे बंद करतो आणि विचार करतो की अंबानी, टाटा, बिर्ला आणि इतर गर्भ, अति श्रीमंत अस्तित्वात नाही आहे, त्यांच्या बातम्या बघणे बंद करतो, जे माझे ऐकणारे आहेत त्यानां सांगतो की दिवसाला 5 लाख रुपये कमावणे शक्यच नाही. ह्याने वास्तव बदलणार आहे का? अजून ह्यामध्ये मी बेकायदेशीर रित्या पैसे कमावणाऱ्यांचे जोडले नाही, त्यांचा दिवसाचा "खर्च" मधल्या 3 लोकांमधला असतो.
आता फक्त माझाच विश्वास नाही म्हणून वास्तव बदलणार आहे का? फक्त मी डोळे बंद केले म्हणून जगामध्ये सगळेच आंधळे होणार आहेत का? मी जर मर्यादेत पैसे कमवत असेल किंवा माझा मर्यादित दृष्टिकोन असेल तर संपूर्ण जग पण तसेच वागेल का?
माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? फक्त घरचे (मजबुरीने), मित्र मंडळी किंवा समविचारी नकारात्मक लोक, ह्यापलीकडे जग नाही आहे का?
तुम्ही ह्यावर विचार करा किंवा नका करू कारण जे वास्तव आहे ते कधीच बदलणार नाही.
आता फक्त माझाच विश्वास नाही म्हणून वास्तव बदलणार आहे का? फक्त मी डोळे बंद केले म्हणून जगामध्ये सगळेच आंधळे होणार आहेत का? मी जर मर्यादेत पैसे कमवत असेल किंवा माझा मर्यादित दृष्टिकोन असेल तर संपूर्ण जग पण तसेच वागेल का?
माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? फक्त घरचे (मजबुरीने), मित्र मंडळी किंवा समविचारी नकारात्मक लोक, ह्यापलीकडे जग नाही आहे का?
तुम्ही ह्यावर विचार करा किंवा नका करू कारण जे वास्तव आहे ते कधीच बदलणार नाही.
धन्यवाद
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
श्रीमंतांच्या सवयी आणि गरिबांच्या सवयी ह्यामधील फरक
5 वर्षांच्या 223 श्रीमंत आणि 128 गरीब अश्या 2 गटांच्या रोजच्या सवयीनवर अभ्यास केल्यावर ह्या दोघांमधील मोठे फरक आणि एक लक्षणीय समानता निष्पन्न आढळून आली.
श्रीमंत आणि गरीब हे दोन गट काही चांगल्या आणि काही हानिकारक अश्या 200 दैनंदिन कृती करताना आढळून आले, त्यामधील काही त्यांच्या सवयी होत्या.
तुमचे श्रीमंत, गरीब किंवा मध्यमवर्गीय राहण्याचे कारण ह्या श्रीमंत सवयी किंवा गरीब सवयी आहेत हे मी ह्या संशोधनातून शिकलो. तुमच्या जीवनाचा आराखडा आणि तुमच्या मुलांचे आयुष्य हे रोजच्या सवयी निर्धारित करतात.
तुमच्या रोजच्या सवयी अजाणतेपणाने तुमचे वागणे, विचार करणे, विश्वास आणि तुम्ही तुमची निवड ताब्यात ठेवतात. तुम्ही ज्या प्रकारच्या घरात राहत आहात, कुठच्या प्रकारचे शिक्षण तुमच्या मुलांना भेटत आहे, तुमच्या स्वातंत्र्याची मर्यादा, तुमची जीवनशैली, वापरणाऱ्या वस्तू आणि आयुष्यामधील सुख आणि समाधान तुमच्या सवयी निर्धारित करतात. म्हणून तुमच्या सवयी ह्या खूप महत्वाच्या आहेत.
सवयीचा हेतू असतो. मेंदूच्या मध्यभागेमध्ये असलेल्या अतिसुष्म भाग ज्याला बेसल गांगलीया म्हणतात त्यामधील ठराविक पुनरावृत्ती करण्याचे कार्य वगळले तर आपला मेंदू हा उच्च स्तरीय कार्य करायला मुक्त होऊन जातो. ड्यूक युनिव्हर्सिटीने 2006 साली केलेल्या अभ्यासात असे आढळून आले कि 40 टक्के (किंवा त्यापेक्षा जास्त) सगळ्या दररोजच्या क्रिया ह्या सवयी असतात.
शरीर क्रिया विज्ञानानुसार सवयी म्हणजे बेसल गांगलीया मधील परस्परांशी जुळलेले न्यूरल पाथवे मध्यभागी असलेले निओ कॉर्टेक्सचे न्यूरल प्रथिन यांचे केंद्र. ज्या क्षणी न्यूरल पाथवे हे बेसल गांगलीया शी जोडले जाते तेव्हा आपला मेंदू चमत्कारिक रित्या एक कायमस्वरूपी सवय बनवून टाकतो.
प्रत्येक श्रीमंत सवय जी तुम्ही लावून घेता ती तुमचे संपूर्ण जीवनमान बदलून टाकते. श्रीमंत सवयी ह्या यशासाठी केलेली गुंतवणुकीसारख्या आहे. कालांतराने ह्या श्रीमंत सवयी तुम्हाला तुमचे यश,स्वप्न साध्य करण्याच्या जवळ घेऊन जात असतात. कालांतराने जेवढ्या श्रीमंत सवयी लावून घ्याल तेवढ्या जवळ तुम्हाला यश जाणवत जाईल.
सल्ला व प्रशिक्षण साठी आजच संपर्क कराल.
धन्यवाद.
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
जोपर्यंत तुमचा मेंदू तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध होऊ शकतात हे स्वीकारत नाही तो पर्यंत तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध होणार नाही. एकदा का मेंदूने स्वीकारले त्यानंतर कठीण परिश्रम, हुशारी आणि कौशल्य हे सगळे मागे पडून चमत्कारिक रित्या आयुष्य बदलून जाते. ह्यालाच आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात जो श्रीमंती आणि समृद्धी आकर्षित करतो.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
मानसिक प्रवाह व माणसाचे खाजगी, व्यावसायिक जीवन
आपल्या मनात अनेकदा असा प्रश्न पडत असेल कि "अरे हि विचारांची शृंखला कुठून चालू झाली?" "का नकारात्मक विचारांना मी माहित असून सुद्धा उर्जा देत आहे?" "मी दररोज एकसारखे आयुच्य का जगत आहेत?" "का खूप कमी लोक हि नव नवीन अनुभव घेत प्रगतीशील आयुष्य जगत आहेत?" "का त्यांच्या आयुष्यात सर्व काही छान चालू आहे?" "ज्यांची लायकी नाही का ते सर्वांगीण सुखी आयुष्य जगत आहेत?" "मी चांगले वाईट, सुख दुख ह्या विचार चक्रात अडकलो आहे का?" "मला जे विचार नाही करायचे आहेत त्यांना मी भावनांची उर्जा देत का सतत करत असतो?" "मला माहित आहे कि नकारात्मक विचार केल्याबरोबर मला काही शारीरिक आजार होतात तरी पण मी तेच विचार का करत असतो?"
जर आपल्याला असे प्रश्न सतत पडत असतील आणि जर तुम्ही त्याच्यावर समाधान शोधायचा नाही प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यात सतत प्रश्नच उभे राहत जात असतील, आणि तुम्ही नाकारले तरी हेच वास्तव आहे. हे असे का घडते? ह्याचे उत्तम विश्लेषण डेनियल गोलमन ह्या जग प्रसिद्ध मानस शास्त्रज्ञाने त्याच्या इमोशनल इंटेलीजंन्स ह्या पुस्तकात त्यांचे अनेक वर्षांचे प्रयोग व त्यातून निघालेले निष्कर्ष अतिशय उत्तम प्रकार मांडले आहे. माझा वाचन हा छंद असल्यामुळे मी सांगतो कि हे पुस्तक खूप किचकट व शास्त्रीय भाषेने भरलेले आहे, त्या मुळे सामान्य वाचकांना ते आवडण्याची सुतराम शक्यता नाही.
इमोशनल इंटेलीजंन्स म्हणजे काय? तर आपल्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करा, आपण याला भावनिक प्रगल्भता, साक्षरता, सक्षमता असे म्हणू. जगामध्ये कुठेही जा तिथे माणसाच्या नैसर्गिक, शारीरिक आणि भावनिक गरजा एकसारख्या असतात, पाश्चात्य लोक हे मुक्त मनाने आपले म्हणणे मांडत असतात जेणे करून शास्त्रज्ञांना समस्येचे समाधान भेटणे सोपे जाते, त्यांचे मानसिक समाधान झाल्यामुळे त्यांना त्यांच्या परिवार, समाज, राज्य आणि देश ह्यांच्या प्रगतीसाठी मानसिक आणि शारीरिक वेळ देत येतो, यामुळे तिथे सतत नवीन संशोधन हि होत असते.
भारतामध्ये मानसिकतेने आपण एकाच वेळी १६०० काळातही असतो १९०० काळातही असतो आणि नवीन उपकरणांनी, कपड्यांच्या फॅशननि आपण २०१६ च्या काळात असतो. मला एकच समजत नाही कि २०० वर्ष जुने जेवण मी खाऊ शकत नाही, जे सडून कुजून माती झालेले असेल मग तीच लोक इतके जुने विचार आता पर्यंत कसे काय घेवून जगत असतात?
मनुष्य प्राणी हा हुशार आहे, जिथे जगण्याचे असते तिथे त्याला ताजे जेवण लागते, कारण त्याला माहित असते कि आपण जर ताजे जेवण नाही खाल्ले तर आजारी पडून मरून जावू, पण विचारांचे असे नसते, ते विचार त्या पिढीला आणि त्याच्या पुढील पिढीला अनुवांशिक आजार व नकारात्मक मानसिकता देवून जातात.
हा तयार केलेला एक विचारांचा प्रवाह आहे, जो पिढ्यानपिढ्या न विचार करता ९० % लोक पुढच्या पिढीला देत जातात. हा प्रवाह गर्भ संस्काराने (आताच्या वैज्ञानिक पद्धतीने), कुटुंब संस्काराने, समाजातील संस्काराने आपण मोडू शकतो. आपली प्रवाहाला एक सामाजिक विचारांचा उतार भेटतो ज्यामुळे आपला प्रवाह अजून वेगाने वाहत जायला लागतो व त्या बरोबर आपली कृतीही होत जाते.
विचारांच्या प्रवाहांचे दोन भाग करा, एक सकारात्मक उर्जा देणारा आणि दुसरा नकारात्मक उर्जा देणारा. जेव्हा तुम्हाला उस्ताह वाटत असेल, तेव्हा तुमची सकारात्मक उर्जा काम करते असे समजा, आणि जेव्हा नैराश्य वाटत असेल तेव्हा नकारात्मक उर्जा काम करते असे समजा. सकारात्मक विचारांची एक साखळी असते तशीच नकारात्मक विचारांची देखील असते, एक सुरु झाला कि त्या पाठोपाठ त्याला पूरक विचारांची शृंखलाच चालू होवून जाते.
सकारात्मक आणि नकारात्मक ह्याचे विश्लेषण तुम्ही तुमच्या पद्धतीने कराल कारण माणसाच्या नैसर्गिक गरजा जरी एक सारख्या असल्या तरी त्यांचे प्रमाण प्रत्येक माणसांनुसार कमी जास्त असते. जास्त मेहनत करणाऱ्या माणसाला मी गाढव नाही बोलू शकत आणि कमी मेहनत करणाऱ्या माणसाला मी हुशार नाही बोलू शकत. प्रत्येक मनुष्य हा त्याच्या स्वभावानुसार जगत असतो. विजेचा वापर करून तुम्ही घर पण प्रकाशाने उजाळु शकता आणि त्याच विजेच्या झटक्याने कुणाचा जीवही घेऊ शकता.
एक असतो नैसर्गिक मानसिक प्रवाह आणि दुसरा असतो कृत्रिम मानसिक प्रवाह. नैसर्गिक प्रवाह हा मुळातच श्रीमंत आणि समृद्ध असतो आणि कृत्रिम प्रवाह जो जो संस्कारांच्या रूपाने आपल्या आई वडील, कुटुंब, समाज आणि परिस्थितीतून येतो. नैसर्गिक प्रवाह हा आपल्याला चमत्कारी रित्या समृद्ध आणि श्रीमंत बनवतो आणि कृत्रिम प्रवाह हा आपल्याला खडतर मेहनत करायला लावतो.
जे आई वडील त्यांच्या मुलांचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवता ते लवकर आयुष्यात जम बसवतात. त्यांचे सर्वांगीण आयुष्य जसे उद्योग, व्यवसाय, नोकरी, बढती, प्रेम संबंध, वैवाहिक आयुष्य उत्तम जगत असतात. ह्या सर्वांची सुरवात तुम्ही जेव्हा आईच्या गर्भात असता तेव्हा झालेली असते ते तुम्ही ५ ते ७ वर्षांचे होईपर्यंत तुमची विचारसरणी, स्वभाव, अंतर्मन किंवा विचारांचा प्रवाह विकसित झालेला असतो जो नंतर बदलत नाही, फक्त त्याला ताब्यात ठेवू शकतो.
जो आपल्या भावनांशी किंवा शारीरिक गरजांशी निष्ठावंत असतो त्याच्यामधील भावनिक अडथळा दूर होऊन त्याचे आयुष्य बदलू लागते कधी कधी चमत्कारासारखे बदलून जाते. त्यासाठी विचार आणि भावना यामधील फरक ओळखायला हवा कारण आपण मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हजारो वर्ष मागे आहोत, आपण फक्त तंत्रज्ञानाने ह्या काळात आहोत पण विचारांच्या बाबतीत मागासलेले आहोत.
ह्या विषयाचे अनेक पण श्रीमंत ते गरीब किंवा जगभरातील लोकांच्या स्वभावानुसार अनेक पण समान पैलू आहेत ते जसे तुमचे प्रतिसाद येतील त्यानुसार मी उलगडत जाणार.
काही शंका असल्यास संपर्क करा. खाजगी असतील त्या फक्त आणि फक्त इमेल, व्हास्टऐप किंवा फोन कराल.
सल्ला व प्रशिक्षण साठी आजच संपर्क करा.
धन्यवाद,
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)





