आपल्या सवयींना, अंतर्मनातील विचारांना, कृतीला आपल्या आयुष्यावर हवे होऊ देवू नकाउच्च पदावर असलेले किंवा जास्त कमावणारे अशी लोक त्यांची स्वतःची जीवनशैली बनवतात. अर्थात तो शिस्तीचा भाग असतो, एकप्रकारे रिच्युअल्स सारखे ते त्यांचे दररोजचे आयुष्य जगत असतात. हि जर सवय त्यांना उच्च पदावर घेवून जात असेल आणि पैश्यांचा प्रवाह त्यांच्या आयुष्यात आणत असेल तर हीच सवय त्यांचा कधी कधी प्रचंड घात करू शकते.
उदाहरणार्थ
एकदा एका कोर्टात गुन्हेगारी खटला चालू होता. अ वकील होता तो ब वकीलापेक्षा जास्त निष्णात होता तर ब वकील हा नुकताच वकील झाला होता. पहिल्याच सुनावणीत ब वकिलाला समजते कि त्याचा टिकाव अ वकीलासमोर लागू शकणार नाही, अ वकिलाने खूप चांगल्या प्रकारे पुरावे, साक्षीदार आणि जबाबी गोळा केलेल्या असतात.
मध्यंतरानंतर परत कोर्ट सुरु होते. ब वकिलाला करण्यासारखे काहीच नसते, तो फक्त अ वकिलाचे निरीक्षण करायला लागतो, अगदी सूक्ष्म मधली सूक्ष्म हालचाल देखील टिपू लागतो जसे कि अ वकिलाचे बोलणे, हालचाली, देहबोली आणि इतर कामाची गोष्ट (ह्याला बोलतात चौकटीबाहेर विचार करणे, कौशल्याने परिपूर्ण असलेला, सर्वगुण संपन्न व्यक्ती देखील खाजगी व व्यवसायिक आयुष्यात कसा हरतो ह्याचे उत्तम उदाहरण आहे. नीट लक्ष्य देवून वाचा.).
जे उच्च पदावर असतात किंवा श्रीमंत असतात ते महत्वाच्या कामाच्या वेळेस ठरलेले कपडे घालणार, तीच गाडी घेणार, तोच रस्ता पकडणार, त्याच वेळेवर निघणार हे ठरलेलेच असते.
थोड्या निरीक्षणाने ब वकिलाचे लक्ष्य अ वकिलाच्या एका हालचालीवर वर जाते, अ वकील सतत आपल्या कोटाच्या बटनाला नकळत, सवयीचा भाग म्हणून किंवा अंतर्मनातील सवयीनुसार हात लावत असतो. कोर्टाची आजची सुनावणी संपते व कोर्ट पुढची सुनावणीची तारीख देते. ह्या मधल्या वेळेत ब वकिलाला देखील प्रतिवाद सक्षम रीतीने मांडण्यासाठी पुरावे आणि जबाबी दिसून आल्या.
आता पुढच्या सुनावणी साठी ब वकिलाचे ध्येय होते कि अ वकिलाचे लक्ष्य विचलित करायचे. (ज्यांचे अंतर्मन ध्येयाच्या दिशेने प्रचंड एकाग्र असते तेच अंतर्मन तितक्याच प्रचंड शक्तीने विरुद्ध दिशेने देखील काम करते.). ब वकिलाने अ वकील जिथे कपडे धुवायला टाकतो त्या धोब्याला संपर्क केला. तिथे जावून ब वकिलाने धोब्याचे लक्ष्य दुसरीकडे वेधून अ वकिलाच्या कोटाचे ते बटन काढले जिथे अ वकील अजाणतेपणे हात लावत होता.
दुसर्या दिवशी ब वकिलाने त्याचे कमजोर पुरावे आणि जबानी सोबत प्रतिवाद सुरु केला तेव्हा अ वकिलाला त्याच्या प्रतिवादाला उत्तर देता नाही आले. अ वकिलाचा सारखा हात त्याच्या कोटाच्या बटनाकडे जात होता आणि ते बटन ब वकिलाने कालच काढून टाकले होते, त्यामुळे अ वकिलाचे अंतर्मन नीट काम करत नव्हते, गोंधळले होते. जेव्हा पण अ वकील वाद करायला सुरवात करत होता तेव्हा त्याचा हात बटन नसलेल्या जागेवर जात होते ज्यामुळे अ वकील गोंधळून जात होता.
अंतर्मनाचे लक्ष्य विचलित होणे हि खूप मोठी गोष्ट आहे. जर काही लोक एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला अंतर्मनापासून जोडले गेले असतील किंवा एकरूप झाले असतील आणि जर ती वस्त किंवा गोष्ट आपल्याकडे नसेल तर आपले अंतर्मन पूर्णपणे गोंधळून जाते. ह्याचा फायदा अनेकदा विविध प्रकारचे व्यवसायिक जसे कि वकील, सर्जन, अधिकारी आणि राजकारणी सारख्या व्यक्ती घेत असतात.
आपण अनेकदा अजाणतेपणे काही विशिष्ठ कृती करत असतो, कोणीही दुसरा व्यक्ती किंवा संस्था ह्याचा वापर किंवा गैरवापर करून घेवू शकते, कदाचित तुमच्या आयुष्याचा ताबा देखील घेउ शकते.
कटू आहे पण सत्य आहे.
म्हणून मी सतत सांगत असतो कि कधीही कुठल्याही वस्तूवर किंवा व्यक्तीवर जीव लावू नका, अगदी स्वतःवर सुद्धा नाहीतर ह्या छोट्याश्या कृतीमुळे तुम्ही तुमचे आयुष्य संपूर्णपणे भरकटवून टाकाल. प्रत्येक कृती मर्यादेतच चांगली असते आणि अतिरेक होतो तिथे सर्वकाही संपून जाते.
आता निर्णय तुमचा आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.
Previous
Next Post »
0 आपले विचार