उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक किंवा प्रत्येक माणसाचे स्वतःचे आयुष्य किंवा स्वप्न ह्या शिकून घेण्याच्या नाही तर समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जो उद्योग, व्यवसाय, व गुंतवणूक समजून घेतो तो प्रगती करत जातो, येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना आरामत तोंड देतो, संधीचा फायदा उचलतो, स्वतः संधी निर्माण करतो, भाग्यशाली असतो किंवा स्वतःचे भाग्य निर्माण करतो, तो योग्य वेळी योग्य ठिकाणी असतो, योग्य ठिकाणी योग्य संवाद करतो. ह्याची सुरवात घरापासून होते जो घरच्या मंडळींना समजून घेतो त्याची किंवा तिचे अनुकरण त्यांची लहान मुले करतात. जेव्हा आपल्या विचारांत आणि कृतीत विरोधाभास नसतो तेव्हा आपल्या घरच्या मंडळींसोबत, मित्र परिवार, नातेवाईक आणि समाज ह्यांच्यासोबतहि विरोधाभास नसतो. जिथे विरोधाभास नाही तिथे आकर्षणाचा सिद्धांत काम करायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी फक्त समजून घेण्यामुळे होतात. विचार तुमचा, आयुष्य तुमचे आणि जबाबदार पण तुम्हीच.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार