मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील एका घटनेने अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारे स्टॉकिंग (सतत पाठलाग करणे), सायबर छळ आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर धोके पुन्हा एकदा समोर आणले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा तिच्याच १७ वर्षीय अल्पवयीन
शेजाऱ्याने वर्षभर पाठलाग करून छळ केला. खाजगी फोटो आणि
चॅटच्या स्क्रीनशॉटचा वापर करून आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी क्लासला जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवले, फोटो व्हायरल
करण्याची धमकी दिली आणि एका फ्लॅटवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
घरी परतल्यानंतर पीडितेने संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. कुटुंबाने
तात्काळ पोलिसांत धाव घेतल्यानंतर पॉक्सो (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय
संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि बाल न्याय मंडळासमोर (Juvenile
Justice Board) हजर करून सुधारगृहात पाठवले.
विविध शहरांमध्ये वाढणारी चिंताजनक प्रवृत्ती
ही एकमेव घटना नाही. आजकाल सोशल मीडिया चॅट्स,
खाजगी फोटो आणि
डिजिटल माहितीचा गैरवापर करून अल्पवयीन मुलींना घाबरवण्याचे प्रकार अनेक शहरांत
वाढताना दिसत आहेत. अनेकदा सामाजिक भीतीपोटी मुली लगेच वाच्यता करत
नाहीत, ज्यामुळे आरोपींचे मनोबल वाढते.
डिजिटल सुरक्षितता आणि मोकळा संवाद
विद्यार्थी अभ्यासासाठी आणि संवादासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करत असताना,
ऑनलाइन
सुरक्षिततेला शारीरिक सुरक्षिततेइतकेच महत्त्व देणे गरजेचे आहे. जर पालकांनी
मुलांशी मोकळा संवाद ठेवला, तर मुले अशा ब्लॅकमेलिंगला न घाबरता वेळेत मदत मागू शकतात.
कोणत्याही धमकीला बळी न पडता तात्काळ पोलिसांकडे तक्रार करणे हाच अशा गुन्ह्यांना
आळा घालण्याचा मार्ग आहे.
ब्लेकमेल करणाऱ्यांना घाबरू नका, त्यांना उघड
पाडा कारण जितक्या लवकर तुम्ही कारवाई कराल तितक्या लवकर तुम्ही सुरक्षित रहाल व
तुमचा डाटा देखील नाहीतर उधीर झाला तर व्हिडीओ अपलोड झाल्यावर तुम्ही काढून टाकू
शकत नाही, फक्त गर्भ श्रीमंत लोकांना हे शक्य होते सामान्य लोकांना नाही. पेड
कन्सल्ट साठी संपर्क करू शकता.
अश्विनीकुमार
0 आपले विचार