मानसिक आजार २ डिप्रेशन



मानसिक आजार २

डिप्रेशन

डिप्रेशन हे तणाव, नैराश्य, उदासीनता, नकारात्मक विचार, भावना आणि शोषित भूत किंवा वर्तमान काळ ह्याचे मिश्रण आहे. तपासल्याशिवाय डिप्रेशन चे मूळ कारण समजणार नाही. आपल्या भावना ह्या गुंतलेल्या असतात म्हणून जे काही पुस्तकात देतात त्यावरून अंदाजा लावू शकत नाही. निसर्गाने मनुष्य बनवला आहे आणि मनुष्याने शास्त्र. त्यामुळे फक्त नैसर्गिक शास्त्रच डिप्रेशन वर प्रभावी उपाय कार्य शकते ना कि इतर शास्त्र.

डिप्रेशन ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची लक्षणे कशी ओळखायची?

सहसा व्यक्ती डिप्रेशन ने ग्रस्त आहे हे तिच्या वागण्या, बोलण्या आणि चेहऱ्यावरून सांगू शकत नाही. ह्या सर्व थेअरी फेल गेलेल्या बघितल्या आहेत. हसत खेळत प्रगती करणारी लग्न करून घर बसवलेली व्यक्ती सुद्धा डिप्रेशन ने ग्रस्त असू शकते. त्यामुळे डिप्रेशन चे कारण शोधणे खूप आवश्यक आहे नाहीतर किंमत संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागते.

डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि नेहमी खिन्न आणि उदास चेहऱ्याने आयुष्य जगत असते?

नाही. ती सतत स्वतःला ती आनंदी आहे हे भासवत असते. ती सर्वांना मदत करत असते. ती तत्वज्ञान देखील सांगत असते. ती जोडीदारासोबत सामान्य आयुष्य जगत असते. ती लहान मुलांसोबत सामान्यपणे खेळत असते.

डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती सतत एकटे राहणे पसंद करते?

नाही. डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि मित्रांच्या समुहात देखील असू शकते. पार्टी आणि मौज मजा देखील करताना दिसेल. पण हे सर्व वागणे वरवरचे आहे ना कि अंतर्मनातील वागणे आहे.

विभक्त कुटुंबात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते का?

नाही. सयुंक्त कुटुंबात जास्त प्रमाणात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते.

डिप्रेशन फक्त तरून, वयस्कर लोकांना होते का?

नाही. आजकाल लहान मुलांना देखील डिप्रेशन होते. मी माझ्याच मित्राच्या मुलीचे उपचार केले होते आणि ती त्यावेळेस चौथीला शिकत होती. बदललेली जीवनशैली मुळे कोणीही डिप्रेशन ने ग्रस्त होऊ शकते.

डिप्रेशन फक्त नास्तिक विश्वास असलेल्या लोकांना होते का?

नाही. ह्याचा जास्त परिणाम हा आस्तिक लोकांमध्ये दिसून आला. पण इथे उपचाराला उत्तम प्रतिसाद नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांकडून जास्त आला.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, अध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ह्यांना डिप्रेशन होते का?

हो. माझ्याकडे सर्व क्षेत्रातील डॉक्टर, अध्यात्मिक गुरु कारण जेव्हा भय्यूजी महाराज ह्यांनी आत्महत्या केली तेव्हापासून मी अध्यात्मिक गुरूंना देखील अटेंड करायला लागलो. प्रशिक्षक, सर्व प्रकारचे वक्ते हे सर्व माझ्याकडे उपचारासाठी येतात. ज्योतिष, हीलर, रेकी मास्टर आणि इतर सलंग्न क्षेत्रातील व्यक्ती देखील येतात. काही क्षेत्रातील व्यक्तींना मी ह्यासाठी अटेंड नव्हतो करत कारण प्रसिद्धी पासून दूर राहून जास्तीत जास्त लोकांना मानसिक आजारापासून मुक्त करायचे होते पण जर भय्यूजी महाराज सारखी एक व्यक्ती गेली कि खूप मोठी पोकळी निर्माण होते व नकळत लोड हा येतोच. काही कडक नियम बनवून प्रसिद्ध व्यक्तींना अटेंड केले जाते.

डिप्रेशन म्हणजे वेड लागले आहे असे आहे का?

नाही. डिप्रेशन हा मानसिक आजार आहे आणि सर्वच मानसिक आजार म्हणजे वेड लागणे नाही. वेड्या व्यक्तीचा मेंदू आणि शरीरावर ताबा नसतो आणि डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्तीचा मन मेंदू आणि आयुष्यावर ताबा असतो.

डिप्रेशन वर उपचार होतात का?

हो. डिप्रेशन वर उपचार होतात फक्त योग्य तज्ञ व्यक्ती भेटली पाहिजे.

डिप्रेशन कायमचे बरे मारू शकतो का?

जर सुरवातीपासून डिप्रेशन चे मूळ सापडले कि डिप्रेशन कायमचे बरे करू शकतो.

डिप्रेशन बरा व्हायला किती कालवधी लागतो?

जितका जुना आजार तितका कालवधी जास्त. जर तज्ञ योग्य भेटला तर लवकर बरे करू शकतो. काही लगेच बरे होतात तर काहींना वेळ लागतो. कालावधी बघण्यापेक्षा उपचारावर लक्ष्य केंद्रित करावे.

डिप्रेशन वर वयक्तिक उपचार चांगला कि सामुहिक?

डिप्रेशन वर वयक्तिक उपचार नेहमी चांगला. सामुहिक उपचार होणे शक्य नाही कारण प्रत्येक व्यक्तीची समस्या हि वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. अति खाजगी किंवा लैंगिक समस्या ह्या समूहात बोलू शकत नाही. माझ्या मते तरी वयक्तिक उपचार केल्यास उपचार उत्तम होतो आणि रिझल्ट देखील जाणवतो.


महत्वाचे मुद्दे

वेळ आणि पैसा असल्यास आपण डिप्रेशन वर आरामात मात करू शकतो.

आता ऑनलाईन मार्गाने लगेच अटेंड केले जाते व भविष्यात होणारे नुकसान टाळले जाते.

काही वेळेस डिप्रेशनवर चौकटीबाहेर जावून उपचार करावे लागतात.

समोरच्या व्यक्तीचा जो विश्वास आहे त्यानुसार उपचार करावे लागतात.

व्यक्तीचा स्वभाव देखील उपचारा अगोदर बघावे लागते.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारख्या समस्या अनेक लोकांना असतात फक्त ते आपल्याला माहिती नसतात. अंतर्मुखी स्वभाव असणे हा गुन्हा नाही. माझ्याकडे अंतर्मुखी स्वभावाची लोक व्यक्त होतात, त्यांना विनाकारण बडबड आवडत नाही किंवा जबरदस्तीने बोललेले आवडत नाही.

जिथे भावना जुळतात तिथे एकटेपण जाणवत नाही पण जिथे भावना नाही जुळत तिथे एकटेपण जाणवते. जर तुम्ही सयुंक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहत असाल तरी तुम्हाला एकटेपणा जाणवेन.

कोणीही तुमच्यासोबत नसले तरी मी तुमच्या सोबत आहे. बिनधास्त आपले आयुष्य जसे पाहिजे जगा. बाकी पुढच्या पुढे बघून घेवू. आयुष्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

Image by Free-Photos from Pixabay
Previous
Next Post »
0 आपले विचार