लैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिकालैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिका

सामान्य लोक हि भावनिक दृष्ट्या साक्षर नसतात, कमजोर असतात. त्यांना भावनिक आणि शारीरिक गरजा ह्यामधील फरक ओळखता येत नाही. अश्या वेळेस काही लोक हि चुकीच्या नातेसंबंधात फसतात व त्यामधून त्यांना बाहेर पडणे हे जमतच नाही. हे तुरुंग भावनिक आणि शारीरिक असते त्यामुळे आपल्याला बाहेरून बोलणे सोपे आहे पण जी व्यक्ती त्यामध्ये अडकलेली असते तिला समजून घेवू शकत नाही.

लैंगिक गरज नैसर्गिक आहे पण वासना अनैसर्गिक आहे. लैंगिक गरज हि पूर्ण झाली कि व्यक्ती शांत होते व सर्वसामान्य पणे आयुष्य जगू लागते. लैंगिक गरज आयुष्याचा एक भाग आहे त्यामुळे आपण सर्वकाळ लैंगिक गरज पूर्ण करत राहू शकत नाही. त्यानंतर व्यक्ती हि आयुष्याचा बाकीच्या भागावर लक्ष्य केंद्रित करते.

वासना अनैसर्गिक असल्यामुळे तिचा त्रास सहन करावा लागतो आणि अनेकदा कुटुंबातील, चार भिंतींच्या आतील गोष्ट असल्यामुळे ती सहसा बाहेर येत नाही तरीही काही माहिती हि बाहेर येतेच. एक मर्यादा पार झाल्यावर देखील सर्वकाही सहन करत बसतात. हे एका उच्च शिक्षित आणि उच्च पदावर असलेल्या व्यक्तीबरोबर देखील घडलेले आहे. इथे श्रीमंती आणि गरिबीचा भेद नाही, मध्यम वर्गात त्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणत वासनेचे बळी आढळून येतात.

जेव्हा मुल हि वयात येतात तेव्हा आपल्याकडे पद्धत नाही कि त्यांना लैंगिक शिक्षण द्यावे म्हणून. काही घरात दिले देखील जाते पण अनेक घरात तसे शिक्षण भेटत नाही आणि ह्या वयात अनेकदा वासनेचे शिकार होतात, काही तात्पुरते आणि काही कायमस्वरूपी. अनेकदा सामुहिक वासनेचे शिकार देखील होतात, सर्वच गुन्हे काही नोंदवले जात नाही. पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मुलं हि धक्क्यातून सावरली आहेत कशी ते माहिती नाही आणि त्यांनी नव्याने आयुष्य देखील जगायला सुरवात केलेली आहे.

घरात कोणी लक्ष्य देत नाही, कोणी समजून घेत नाही, हळवे आणि भावनिक दृष्ट्या कमजोर आणि भावनिक अशिक्षित लोक बाहेर सहारा शोधतात. जर बाहेर सहारा नीट भेटला तर ठीक नाहीतर आयुष्य पूर्ण नर्क बनून जाते.

हि लोक अश्या वासनेने भरलेल्या नातेसंबंधामधून बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही. अगदी शाळा कॉलेज मधील जोडीदारासोबत लग्न करतात आणि त्याच नकारात्मक आयुष्यात अडकून जातात.

शारीरिक गरज भागवण्यासाठी अनेकदा भावनिकदृष्ट्या फसवले जाते. लग्नाचे आमिष दाखवून मुलींचे अनेकदा शारीरिक शोषण होते. जी जी लोक भावनिकदृष्ट्या दुसर्यांच्या जाळ्यात फसली गेली आहेत त्यांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक छळ झालेला आहे.

लैंगिक गरज हि संपूर्णपणे मनोशारीरिक आहे. ह्या गरजेचे मुख्य उद्देश अपत्य जन्माला घालणे जेणे करून मनुष्य प्रजाती हि टिकून राहील ह्याकरिता आहे. ह्यामध्ये मन आणि शरीर खूप वेगळ्या पद्धतीने काम करते. तुम्ही काही क्रिया ह्या थांबवू शकत नाही. जे बोलत आहे कि अध्यात्मिक गुरुंनी मात केली आहे हे साफ चुकीचे आहे, मग त्यांचा जन्म झाला कसा? आतल्या गोष्टी ह्या फक्त त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती असतात, सामान्य भक्तांना नाही.

निसर्गासाठी मनुष्य प्रजाती टिकवणे गरजेचे आहे ना कि कुठलेही खोटे अनैसर्गिक विश्वास जे मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले आहे.

वासनेचे शिकार जास्ती करून लहान मुले ह्यामध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही आले, स्त्रिया ह्या होतात. घरात जास्त छळ होतात म्हणजे ओळखीच्या लोकांकडून आणि खूप कमी बाहेरच्या अनोळखी लोकांकडून छळ होतात. त्यामुळे अनोळखी लोकांना दोष देवून फायदा नाही.

वेळ असे पर्यंत तुम्ही कुठे अडकला आहात हे ओळखा, सर्वांना दुसरी संधी भेटत नाही, हे वास्तव आयुष्य आहे. लैंगिक गरज पूर्ण करणे काही वाईट नाही, काळ बदलला तुम्ही उघडपणे बोलू शकता आणि जो विरोध करत असेल त्यांचे किंवा त्यांच्या घरच्यांचे आयुष्य एखाद्या गुप्तहेरासारखे खोडून काढले तर तुम्हाला अनेक वासनेचे बळी दिसून येतील. आता पुरावा गोळा करणे सोपे आहे.

परत बोलतो कि समाजातील खूप कमी लोक तुमच्या कमी येतील, बकिंच्यांना समजले तर समाजात बदनामी करण्याची धमकी देवून तुमचे अजून लैंगिक शोषण करतील, सर्वच तुम्हाला मदत नाही करणार तर अनेक तुमचा गैर फायदा उचलतील. जेव्हा लैंगिक गरज पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा सर्व जाती धर्म एक होवून जातात मग जबरदस्ती करणे का असेना, तुम्हाला अधिक माहिती तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये भेटेल.

जर तुम्ही अश्या कुठल्या समस्येमधून जात असाल तर बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याने शक्य होत नसेल तर तुम्ही तज्ञांची मदत घेवू शकता.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1
Previous
Next Post »
0 आपले विचार