सवा कोटी मुंबई च्या लोकसंख्येत एकटेपणा का जाणवतो?



मुंबई ची लोकसंख्या सवा कोटी. उच्च पदावर कामाला. दररोज लोकांच्या संपर्कात. सर्व व्यवसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी तरीही एकटेपणा का जाणवतो? कोणीच आपल्याला समजून घेवू शकत नाही हि भावना का उत्पन्न होते? अशी कसली मानसिक अवस्था निर्माण होते ज्यामुळे एकटेपणा जाणवतो? हा एकटेपणा फक्त त्या व्यक्तीलाच का जाणवतो? इतर समजून घेण्यात कमी पडतात का?

असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. चला मानले कि इथे बाह्य स्वरूप म्हणजे सुंदरता महत्वाची असेल पण जे सुंदर आहेत जे देखणे आहेत त्यांना देखील एकटेपणा का जाणवतो?

मितभाषी असणे, कमी बोलणे, लोकांमध्ये न मिसळणे हा स्वभाव असेल आणि ती व्यक्ती स्वतःची कंपनी इंजोय करू शकत असेल तर काही समस्या नाही. हा स्वभावाचा भाग झाला पण चार चौघात मिसळून, राहून एकटेपणा जाणवणे, कोणी आपलेसे न वाटणे हा मानसिक आजार तर नाही पण त्या व्यक्तीला भावना व्यक्त करता आली नाही किंवा तिला जसे जगायचे आहे तसे जगता आले नाही किंवा भूतकाळात अशी काही घटना झाली असेल ज्यामुळे तिला अजून त्रास होत असेल हे जेव्हा समुपदेशन होईल तेव्हाच मी सांगू शकेन.

आताची जीवनशैली देखील अशी केली गेली आहे कि एकटेपणा शिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही. कारण जिथे काम करतो तिथे जर जवळीक निर्माण केली तर गैरफायदा उचलला जातो जसे एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोक भीतीने कुणाच्याही अंगावरून पळून जाण्यास पाठी पुढे बघत नाही तशी स्पर्धा विनाकारण निर्माण केली गेली आहे. ह्यामुळे देखील एकटेपणा जाणवतो.

काहींचे संगोपनच असे गेले असते कि खूप कमी लोक त्यांच्या संपर्कात आलेले असतात, त्यांना चार चौघात किंवा जगात कसे वावरायचे ह्याबद्दल संस्कार भेटलेले नसतात त्यामुळे त्यांना एकटेपणा येतो.

ह्यापैकी काही लोकांचे असे असते कि चुकून कोणीही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांना वाटते कि जग असेच आहे. मग हळू ती ती व्यक्ती त्यांचे शोषण करायला लागते, त्यांना वाटते कि हे प्रेमात असे चालते, विश्वासात मैत्रीच्या नात्यात असे चालते, मग शोषण हळू हळू वाढत जाते आणि जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ती लोक जागे होतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशी लोक नवीन नातेसंबंध नाकारतात.

मी वर स्पष्ट केल्याप्रमाणे स्वभाव असेल आणि त्याचा मानसिक शारीरिक आरोग्यावर काही परिणाम होत नसेल तर ठीक आहे कारण अशी लोक त्यांच्या स्वभावानुसार आयुष्य इंजोय करतात, त्यांना ते एकटेपणात जे काही करतात त्याच्यात आनंद वाटतो, किंवा नुसते झोपले तरी काही समस्या नाही.

पण जिथे अंतर्मनात मानसिक शांती नसते ती लोक काय करत असतील? ती लोक काही ना काही मनोशारीरिक आजार निर्माण करतात ज्यामुळे कारण मिळते व डॉक्टर कडे जावून आपले मन मोकळे करण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांना देखील त्यांच्या मानसिकतेची कल्पना नसते, ते उपचार करतात, थोडे बोलतात व विषय तिथे संपून जातो मग परत आजारपणाचे चक्र सुरु होवून जाते.

जर त्यांना वाटले कि डॉक्टर देखील लक्ष्य देत नाही, आपण सतत जात असतो म्हणून डॉक्टर देखील आपल्याला महत्व देत नाही असे त्यांना वाटते आणि हे स्वाभाविकच असेल कारण शारीरिक रोगांवर इलाज करणारे डॉक्टर असतात त्यामुळे त्याचे लक्ष्य हे शारीरिक आजार बरे करण्यावरच असते. मानसिक आजारांचे डॉक्टर वेगळे असतात आणि तिथे उपचार पद्धती हि वेगळी असते. मग ह्या गैरसमजेतून ते मनोशारीरिक आजाराचे शारीरिक आजारात रुपांतर करतात आणि आजारपण वाढवतात.

आपला मेंदू खूप काही करू शकतो त्यापैकी एक आजारपण देखील निर्माण करू शकतो. तुम्ही एकलेच असेल कि किती चांगला आनंदी व्यक्ती होता पण अचानक सोडून गेला? त्याचे मुख्य कारण मानसिकच होते, जर ह्या मानसिकतेवर वेळेवर उपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचवता आला असता.

आता इथे देखील स्त्री पुरुष भेदभाव वाढला आहे. जो तो येतो तो स्त्रियांकडे लक्ष्य देतो आणि पुरुषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष्य केले जाते. अनेक अध्यात्मिक गुरु देखील स्त्रियांना महत्व देतात आणि पुरुषांकडे दुर्लक्ष्य करतात. हे भांडवलशाही युगात प्रमाण वाढले आहे. जर भर रस्त्यात स्त्री रडली कि सगळे तिचे अश्रू पुसायला जातात आणि पुरुष रडला कि हसतात, हो हा आपला सुसंकृत समाज आहे. स्त्रियांची सांत्वना करण्यास अनेक पुरुष आणि स्त्रिया पुढे सरसावतील पण पुरुषांची सांत्वना करण्यात कोणीही पुढे येणार नाही आणि आले तरी खूप कमी स्त्री पुरुष पुढे येतील.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखी मानसिक समस्या अनेकांना आहे फक्त ते तुम्हाला समजून येणार नाही. जेव्हा व्यक्ती माझ्याकडे येते आणि स्वतःला व्यक्त करते तेव्हा समजते कि ती किती मोठ्या मानसिक आणि शारीरिक समस्येने ग्रस्त आहे म्हणून नाहीतर त्यांचे बाह्य स्वरूप हे सामान्यच दिसून येते. असेच काही गुन्हेगारांचे देखील आहे,ते आपल्या आजूबाजूला असतात पण आपण ओळखू शकत नाही, जेव्हा ते आपली शिकार करतात तेव्हा आपल्याला त्यांचे खरे स्वरूप समजून येते.

मी हे नाही बोलत कि सतत चारचौघात रहा किंवा सर्व कार्यक्रम समारंभ अटेंड करा, माझे म्हणणे इतके आहे कि जो एकटेपणा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत आहे त्यामधून बाहेर पडा आणि नंतर तुम्हाला पाहिजे तसे आयुष्य जगा. जर तुम्ही समस्येत आहात तर हाच एकटेपणा जीवघेणा ठरू शकतो त्यापेक्षा नेहमी तज्ञांची मदत घेतलेली बरी. जरी कोणी नसले तरी तज्ञ तुम्हाला मदत करू शकतात.

जर आपण कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्येतून जात असाल, किंवा तुमचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण झाले असेल तर बिनधास्त व्यक्त व्हा, मी जज करत नाही कारण मला वास्तव माहिती आहे आणि तुम्ही ज्या समस्येतून गेला आहात त्या समस्येतून अनेक लोक गेली आहेत किंवा जात आहेत. आणि अनेकांनी अश्या समस्यांमुळे निर्माण झालेल्या मानसिक आणि शारीरिक आजारांवर मात करत आयुष्यात नवीन सुरवात केलेली आहे.

कृपया hi hello किंवा good morning चे मेसेज पाठवू नका, सरळ विषयावर या.

लेख कृपया नावासकट शेअर करण्यात यावा. मी मनोरंजन आणि ग्राहक मिळवण्यासाठी लेख नाही लिहित आहे तर लोकांचे जीव वाचावे ह्यासाठी लिहित आहे, ह्याच लेखांमुळे अनेक आत्महत्या करणार्यांपैकी एक आत्महत्येचा विचार सोडून परत आपले आयुष्य पुनर्जीवित करत आहे. पैसा देखील महत्वाचा आहे पण जेव्हा व्यक्तीचा जीव वाचला जातो तेव्हा मिळणारे समाधान शब्दात नाही सांगू शकत. अनुभवला पर्याय नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1
Previous
Next Post »
0 आपले विचार