सर्वकाही बोलून सिध्द होत नाही.
धाडस – दाखवावे लागते
आत्मविश्वास – जागृत करावा लागतो.
प्रेम – व्यक्त करावे लागते
पैसा – कमवावा लागतो
समजूतदार पणा – दाखवावा लागतो
सांभाळ – करावा लागतो
संस्कार – द्यावे लागतात
जीवन – जगावे लागते
स्वप्न – पूर्ण करावी लागतात
अडथळे – पार करावी लागतात
संकटांना – तोंड द्यावे लागते
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

दंगल ह्या सिनेमासाठी आमीर खान ह्या बॉलीवूड कलाकाराने आपले वाढलेले वजन कमी करून आपले शरीर हे उत्तम आकारात आणले आहे.


हा व्हिडीओ शेअर करण्याचा उद्देश कुठल्याही सिनेमाची जाहिरात करण्याचा नाही. दंगल ह्या सिनेमासाठी आमीर खान ह्या बॉलीवूड कलाकाराने आपले वाढलेले वजन कमी करून आपले शरीर हे उत्तम आकारात आणले आहे.
आमीर खानचे वय हे ५१ वर्षे आहे, तसे वय मी मानत नाही. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत तो तरून आहे. आमीर खानने अतिशय व्यस्त आणि महत्वाचे म्हणजे प्रचंड दबावाखाली कारण हे त्याचे जगण्यासाठी पैसे कमावण्याचे साधन आहे तिथे तो सतत नवनवीन प्रयोग व स्वतःमध्ये बदल घडवत असतो.
सिने श्रुष्टी अशी आहे कि तिथे मनुष्याच्या भावनेचा प्रचंड प्रमाणात वापर करून घेतला जातो. इथे सामान्य मनुष्य एक छोट्याश्या समस्येने संपूर्ण मानसिक दृष्ट्या कोलमडून जातो तिथे हे कलाकार कसे काम करत असतील तो विचार करा.
सिनेमामध्ये पहिले गरज होती ती लठ्ठ कलाकाराच्या भूमिकेची. तिथे लठ्ठ होण्यासाठी जास्त मेहनत नाही करावी लागली असे आमीर खान बोलत होता. इथे मुद्दाम मी नमूद करतो कि नकारात्मक (लठ्ठ असणे नव्हे) परिस्थिती निर्माण करणे खूप सोपे असते.
त्याचा जेव्हा लठ्ठ पणाचा अभिनय साकारून झाला त्यानंतर त्याला बॉडी बिल्डर व्हायला म्हणजे परत शरीर हे आकार रुपास आणायला खूप त्रास झाला. त्याचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता कि परत बॉडी बिल्डर सारखे शरीर होऊ शकते कि नाही म्हणून.
हिमालयाच्या शिखरासारखे हे आवाहन वाटत होते, सतत शंका घर करत होत्या, हो असे विचार यशस्वी लोकांच्याही मनात येतात. आवाहन खूप दूर आहे असे वाटत होते हे नकारात्मक विचार यशस्वी लोक मी करू शकतो हे बोलून परत ध्येयाच्या दिशेने कृती करायला लागतात.
एकदा का ध्येय निश्चित झाले तर फक्त लक्ष्य आज आता ह्या क्षणावर होते. आज दिलेले १०० टक्के हे भविष्य घडवते. असे केल्यावरच आपल्याला बदल दिसू लागतो. व्हिडीओ मध्ये बघू शकता. मनुष्याचे प्रयत्न आणि मेहनत हि लपून राहत नाही. ती चेहऱ्यावर दिसून पडते.
इथे आमीर खानने एक शब्द वापरला ट्रान्सफोर्मेशन म्हणजे परिवर्तन. सांगायचा उद्देश हा कि आमीर खानने ६ महिन्यात बदल घडवून आणला तसेच तुम्हीही तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता.
तुम्हाला कसे आयुष्य पाहिजे, काय काय आयुष्यात पाहिजे ते सगळे तुम्हाला भेटू शकते. आमीर खान चा ट्रेनर हा स्वतः कबूल करतो कि प्रचंड एकाग्रता आणि इच्छा शक्तीने स्वतःला झोकून देतो, म्हणून आज आमीर खान हा अयशस्वी लोकांमध्ये बसलेला आहे.
गुरु, प्रशिक्षक हे कधीच सामान्य विद्यार्थ्याला दिसत नाही, जो उत्तम शिष्य असतो त्याला अनेक गुरु असतात. आज जो कोणी यशस्वी आहे तो त्याला भेटलेल्या गुरूमुळे नाही तर त्याच्यामधील नवनवीन शिकण्याची आणि अनुभव घेण्याच्या ज्वलंत आगीमुळे तो आज यशस्वी आहे.
अयशस्वी माणसांकडे अनेक गुरु, प्रशिक्षक आणि समुपदेशक आयुष्यभर असतात. अयशस्वी माणसाकडे एकही नसतो किंवा एखादा असतो तोही ठराविक वेळेसाठी.
हे आताचे वर्तमान काळातील उदाहरण ह्यासाठी दिले आहे कि तुम्ही तुमचे स्वप्नांचे आयुष्य ह्या मार्गाने आरामत आणि कमी वेळेत जगायला सुरवात करू शकता.
मग विचार काय करत आहात, लागा कामाला, ध्येय निश्चित करून वर्तमानात १०० टक्के द्या आणि जगा आपल्या स्वप्नांचे आयुष्य.
धन्यवाद,
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७


तुम्ही उद्योजक बनू शकता कि नाही किंवा तुम्हाला उद्योजक बनायचे असेल तर एक सोपी चाचणी तुम्हाला द्यावी लागेल. तुम्हाला कुठचा उद्योजक बनायचे आहे? स्थानिक, तालुका स्तरीय, जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय. त्यानुसार तुम्हाला त्या स्तरावरील बाजारपेठ किंवा प्रसिध्द असलेली बाजारपेठेमध्ये उत्पादन किंवा सेवा विकावी लागेल. तुम्ही आयुष्यभर विचार करू शकता पण शहाणपण आणि अनुभव यांचे शिक्षण तुम्हाला कृतीनेच भेटू शकते. मी अनेक प्रोस्ताहन देणारी मुल ८ - १० वर्षे ते अगदी ७० - ८० वर्षांच्या प्रौढ उद्योगपती पर्यंत दिवसाला रोड वर किंवा रेल्वे मध्ये लिंबू मिरची विकून रात्री पर्यंत ८०० ते १००० रुपये घरी घेवून जाताना बघितले आहेत, आणि काहींनी औद्योगिक वसाहती उभ्या केल्या आहेत, त्यामुळे आयुष्यामध्ये कधीच कुठच्या गोष्टीला मर्यादा कोणीच लावू शकत नाही, तुम्ही मर्यादा फक्त तुमच्याच स्वप्नाना लावू शकता. इकडे तुम्ही तुमच्या स्वप्नांवर काम नाही केले तर दुसरा तुम्हाला कामाला ठेवून त्यांचे स्वप्न पूर्ण करून घेईल.
निर्णय तुमचा आहे.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


ज्या स्त्रियांना, तरुणींना आणि महिलांना जर आताच्या बातम्या आणि मालिकांमध्ये मध्ये जे लाचारीचे, अत्याचार झालेल्याचे चित्र सतत दाखवत असल्यामुळे जर ह्या प्रतिमेवर विश्वास असेल आणि ज्यांना स्त्री प्रजाती हि कमजोर आहे असे वाटत असेल त्यांनी आज वृत्त वाहिन्या बघा. जय ललिता, प्रेमाने अम्मा. एक स्त्री आणि तिच्यासाठी आलेला जनसागर.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



पिंजर्यात जन्माला आलेल्या पक्ष्याला स्वतंत्र पणे उंच आकाशाला गवसणी घालत उडणे हे एका शारीरिक आणि मानसिक आजारासारखे वाटते.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

अकबर बिरबल आणि धन्नासेठ


जरूर वाचा फार वर्षांपूर्वी लहान असताना शाळेत ऐकलेली गोष्ट :
एकदा अकबर बादशहाच्या सैन्याची फार दिवस लढाई चालू होती.युद्धामुळे शाही खजाना संपत आला होता.
राजाने बिरबलला विचारलं, "खजाना कसा काय भरायचा ?."
बिरबल: तुम्हाला धन्ना सेठ (व्यापारी) कडून खजाना मिळू शकतो.
अकबराला आश्चर्य वाटले की एखाद्या व्यापाऱ्याकडे एवढे धन कसे असू शकते,तरी तो धन्ना सेठकडे गेला.
धन्ना सेठ: बादशहा ! माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे,तुम्हाला हवं एवढं धन तुम्ही घेऊन जा.
अकबर: सेठ ! मी तुम्हाला शिक्षा करणार नाही,फक्त मला सांगा कि तुम्ही एवढी संपत्ती कशी जमविली ?
धन्ना: मी धान्यात आणि मसाल्यात भेसळ करून ही माया जमविली.
अकबराला राग आला,त्याने धन्नाची सर्व संपत्ती जप्त केली आणि त्याला शाही घोड्यांच्या तबेल्यात घोड्याची लीद उचलायची शिक्षा दिली.धन्नाने ती मान्य केली.
बरीच वर्षे निघून गेली.बादशहा अकबराला परत अशा दीर्घ युद्धाला तोंड द्यावे लागले आणि खजाना लवकर रिता झाला.बिरबलाने परत धन्ना सेठ कडे मदत मागायचा सल्ला दिला.
अकबराला आश्चर्य वाटले : बिरबल अरे मी त्याला घोड्याची लीद उचलायचे काम दिलं आहे,त्याच्याकडे कसली आलीय संपत्ती ?
बिरबल: बादशहा ! तुम्ही त्याला विचारा तर खरं.तोच तुम्हाला मदत करू शकतो.
अकबर धन्नाकडे गेला. धन्नाने अकबराला भरपूर धन दिले.
अकबर: धन्ना सेठ ! मी तर तुझी सर्व संपत्ती जप्त केली होती मग तु ती परत कशी मिळवली ?
धन्ना: तबेल्याचा प्रमुख व देखभाल करणारे सेवक यांच्याकडून. ते घोड्याला पोटभर खाऊ घालत नव्हते. मी त्यांना धमकावले कि तुम्ही लोक घोड्याला भरपेट खाऊ घालत नाहीत,त्यामुळे त्याची लीद चांगली येत नाही ही गोष्ट मी बादशहाला सांगेन. मला चूप राहण्यासाठी ते मला लाच देत होते.
अकबर परत रागावला आणि धन्नाला समुद्राच्या लाटा मोजायची शिक्षा देऊन त्याची सगळी संपत्ती घेऊन महालावर परतला.
नशीब पहा,असंच दुसऱ्या एका दिर्घकालीन युद्धामुळे शाही खजाना रिकामा झाला आणि बिरबलाने अकबराला धन्नाकडे मदत मागायचा सल्ला दिला.
अकबराला विश्वास नव्हता कि समुद्राच्या लाटा मोजून धन्ना कशी काय संपत्ती गोळा करू शकतो ?
तरीही अकबराने धन्नाकडे मदत मागितली.
धन्ना: बादशहा ! तुम्हाला हवं तेवढं धन तुम्ही घेऊन जा पण यावेळेस मी माझा धंदा सोडणार नाही.
अकबर: ठिक आहे पण मला सांग तरी कि समुद्री लाटा मोजल्याने तुला एवढं धन कसे मिळाले ?
धन्ना: फार सोपं होतं, मी व्यापाऱ्यांची जहाजं आणि बोटी किनाऱ्यापासून दूरच उभी करायचो. त्यांना तुमचा आदेश दाखवायचो कि तुम्ही मला समुद्री लाटा मोजण्याचे काम दिले आहे आणि त्यांच्या जहाज आणि बोटींमुळे माझ्या कामात अडथळा येतो म्हणून त्यांनी दूरच थांबावं. बादशहा ! त्यांची जहाज आणि बोटी किनाऱ्यावर जाऊन माल उतरविण्यासाठी ते मला लाच द्यायचे.
बादशहाला कळून चुकले कि हा धन्ना कोणत्याही धंद्यात किंवा व्यवसाय किंवा कामात लोकांना वेठीस धरून लाचखोरी करू शकतो आणि माया जमा करू शकतो.
काळ कुठलाही असो, आपल्या समाजातील धन्ना सेठ माया जमा करण्याचा काही ना काही मार्ग शोधून काढतीलच आणि काळा पैसा जमा करतील.जनता पण आपली कामे करून घेण्यासाठी अशा लोकांना लाच देत राहतील आणि काळी माया जमा करण्यास हातभार लावतील.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७