गुंतवणूकदार बना व भविष्य उज्वल करा

गुंतवणूकदार बना व भविष्य उज्वल करा


गुंतवणूक करताना दीर्घ कालावधीचा विचार करावा, जर आज महागाई १५ % असेल तर २० वर्षांनी किती असेल ह्याचा अंदाज तुम्ही सरकारी आकड्यानुसार घेवू शकता, व ज्या गतीने किंवा पटीने महागाई वाढत असेल त्यानुसार आपली गुंतवणूक सुद्धा वाढली पाहिजे. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत, आणि सगळे समजायला सोपे आहे, ह्यासाठी प्रत्येक माणूस हा आर्थिक बाबतीत सुशिक्षित असला पाहिजे. त्या मध्ये जास्त खोलात जायचे नसते, फक्त जेव्हा आपली गुंतवणूक आपल्याला पाहिजे त्या टक्क्यापर्यंत किंवा सरासरी टक्क्यांपर्यंत निकाल देत नसेल तेव्हा थोडे फेरफार करून तो टक्का आपण वधारू शकतो.

गुंतवणूक करण्यासाठी ज्ञानापेक्षा भावनांवर ताबा हा खूप महत्वाचा असतो. अनेक लोक हे ज्ञान नसतानादेखील उत्तम गुंतवणूक करतात पण त्यांचा त्यांच्या भावनांवर ताबा नसतो त्यामुळे त्यांची गुंतवणूक चुकते आणि अश्या वेळेस आमच्यासारख्या तज्ञ लोकांची मदत घेतलेली नेहमी बरी कारण आम्ही वेळीच उपचार केले म्हणून एकतर तोटा जास्त होण्याचे प्रमाण कमी होते किंवा नफा मिळण्यास सुरवात होते पण जर तुम्ही सगळेच गमावून नंतर तज्ञ लोकांची मदत घ्यायचा प्रयत्न केला तर जगातील कितीही विद्वान असू देत, कुणीही काही करू शकत नाही म्हणून हुशार बना, वर्तमानात पूर्ण जगताना भविष्य पण सुखकर करून टाका.

पहला कदम हा टीव्ही वरील कार्यक्रम बघत जा, झी वरील तज्ञ राजेश तांबे यांचा पासवर्ड श्रीमंतीचा कार्यक्रम बघत जा, माझावरील कार्यक्रम मराठी बिग बोस हा उद्योगपतींच्या मुलाखतीचा कार्यक्रम बघत जा ह्यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल. विचार बदलेल तेव्हा कृती बदलेल, कृती बदलेल तेव्हा सवय बदलेल, सवय बदलेल तेव्हा स्वभाव बदलेल आणि जेव्हा स्वभाव बदलेल तेव्हा भाग्य बदलेल आणि हेच आर्थिक शिक्षण आपल्या मुलांना लहानपणापासून द्या व त्यांचे भविष्य उज्वल करून टाका. धन्यवाद. अश्विनीकुमार ८०८०२१८७९७ चला उद्योजक घडवूया समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



तीच लोक पुढे जातात जी
ध्येयाने झपाटलेली असतात,
निर्भय असतात व
आत्मविकासात गुंग असतात.

तुमचे व्यक्तिमत्व ह्यापैकी कुठले आहे?

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



हे सर्वकाही पैश्याबद्दल आहे, न कि स्वातंत्र्याबद्दल.
जर तुम्हाला वाटत असेल कि तुम्ही स्वतंत्र आहात
तर विना पैश्याचे कुठेतरी जावून दाखवा.
भ्रमात राहू नका, वास्तवात या.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

उद्योग किंवा व्यवसाय कसा सुरु करायचा

उद्योग किंवा व्यवसाय कसा सुरु करायचा


जेव्हा नोकरी शोधताना पगारासाठी कुठलीही नोकरी शोधता तेव्हा तुम्ही द्विधा मनस्थितीत नसतात मग उद्योग चालू करतानाच का तुम्ही द्विधा मनस्थितीत येता? तेव्हा का नाही तुम्ही कुठलाही उद्योग सुरु करून त्यामधून महिन्याची नियमित उत्पन्न सुरु करत? तुम्हाला महिनाभर साहेब जितका वेळ सांगेन तितका वेळ काम करावेच लागते त्यानंतरच तुम्हाला पुढच्या महिन्यात पगार भेटेल तसेच उद्योगाचेही आहे, तुम्हाला ठराविक रक्कम आगाऊ घेवून आपले काम सुरु करायचे असते व ठराविक वेळेत ती वस्तू किंवा सेवा समोरच्या ग्राहकाला द्यावी लागते. नोकरीतील चुका ह्या साहेब खपवून घेत नाही व वस्तू किंवा सेवा ह्यामधील चुका ग्राहक खपवून घेत नाही. उद्योग किंवा व्यवसाय करणे हे नोकरी करण्यापेक्षा कितीतरी पटीने सोपे आहे. 

१) कुठल्याही एका वस्तू किंवा सेवेची कल्पना करा
२) किमंत ठरवण्यासाठी पुढील बेरीज करा
कच्चा माल किंमत + जागेचे भाडे + विजेचा खर्च + कर्मचारी किंवा कामगार यांचा पगार + (ऐच्छिक कर्जाचे हफ्ते) * कमीत कमी २५ % नफा = एकूण उत्पन्न.
३) जिथे आर्थिक बाजू येते तिथे मानसिक आणि भावनिक दृष्ट्या मजबूत राहावे लागते, कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय हा मानसिक व भावनिक कमजोरीने नाही करता येत.
४) कमीत कमी ३ ते ५ किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी उद्योगाचा विचार करावा.
५) उद्योग किंवा व्यवसाय हा तोट्यात चालला असेल तर त्यावर आपण खालील पर्याय करू शकता
अ) कर्मचारी यांच्यावर जास्त गुंतवणूक करावी व तज्ञ अनुभवी कर्मचारी ठेवावे. (कायमची गुंतवणूक.)
ब) आमच्यासारख्या तज्ञ लोकांची मदत घ्यावी. (ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक व नंतर तासानुसार गुंतवणूक)
क) उद्योग दुसऱ्या उद्योगपतीला विका
ड) जास्त तोटा होण्याअगोदर उद्योगातून बाहेर पडा व दुसरा उद्योग सुरु करण्याच्या मागे लागा.


आयुष्यात मरेपर्यंत एक गोष्ट लक्ष्यात ठेवा तुम्ही पैश्याने गरीब झालात तर चालेल ती आज नाही उद्या कमी भरून काढू शकतो पण जर मनाने गरीब झालात तर तुमचे आयुष्य व तुमच्या पुढील पिढीचे आयुष्य धोक्यात येईल. स्वतःपुरता विचार नका करू नेहमी ७ पिढ्यांचा विचार करून ठेवा.


मी लोकांना पहिले मानसिक दृष्ट्या सक्षम करतो जेणेकरून भविष्य उ
ज्वल होते. तुमचे उद्योगाच्या दिशेने एक पाऊल तुम्हाला मानसिक गुलामीतून मुक्त करते व मर्यादा ओलांडायला लावते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो, त्यानंतर मी माझे काम चालू करतो.

उद्योजक कुठल्याही शैक्षणिक संस्थेतून निर्माण केला जावू शकत नाही, त्याला स्वतःच्या मनात विचारात आणि कृतीत स्वतहून बदल करावा लागतो. कृती म्हणजे तुमचे पंख आहे तुम्ही जेवढे कृतीचे पंख वापरून मजबूत कराल तेवढ्या उंच स्वप्नांच्या आकाशात तुम्ही भरारी मारू शकतात.

लक्ष्यात ठेवा गर्दी फक्त पायथ्याशी असते, शिखरावर खूप कमी लोक असतात.


भीतीचा सामना करा,
भविष्य उज्वल करा,
जे उत्तम आहे त्यावर तुमचा हक्क आहे,
भीतीच्या पलीकडे अमर्याद आयुष्य तुमची वाट बघत आहे.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



श्रीमंत आणि समृद्धीचे विचार तुम्हाला
श्रीमंत आणि समृद्ध नाही बनवत,
तुमचा विश्वास आणि तुमची भावना बनवतात.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



उरलेला वेळ कसा घालवतात हा एकमेव फरक
गरीब
आणि
श्रीमंत
माणसांमध्ये असतो.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक