लग्नासाठी जोडीदार निवडतांना काय काळजी घ्यावी?


१) भावनेने निर्णय घेवू नये
२) शारीरिक आकर्षणाने निर्णय घेवू नये.
३) आई वडील कसे आहेत हे तपासावे
४) होणारा वर वधू कसे आहेत हे तपासावे
५) डिटेक्टिव्ह (गुप्तहेर) नेमावा

६) शब्दांवर लक्ष ठेवावे
७) देहबोलीवर लक्ष ठेवा अग्रेसिव्ह लगेच समजून येतात
८) वैवाहिक समुपदेशकांची मदत घ्यावी व त्यांचा निर्णय मानावा.
९) कुंडली स्वत न सांगता बनवावी व तपासून घावी
१०) मानसिकता तपासावी

११) नात्यामध्ये देखील फसवणूक बघितली आहे, आणि जर तुम्ही लहानपणी बघितले असेल ती व्यक्ती मोठी होई पर्यंत पूर्ण बदलू शकते, विविध छटा निर्माण होऊ शकतात.
१२) घाई करायची नाही आणि जोथे घाई झाली तिथे शंका घेणे व लग्न दूर ढकलणे, चौपट पटीने चौकशी करणे.
१३) काही खरच गुन्हेगारी प्रवृत्ती चे असतात एखादी व्यक्ती किंवा पूर्ण कुटुंब तेव्हा अश्यांना आयुष्यातून लांब ठेवा.
१४) जोडीदाराचे आणि त्याच्या कुटुंबाचे आर्थिक आयुष्य तपासावे आणि समजून घ्यावे
१५) विरुद्धलिंगी मित्र मैत्रिणी किती आहेत हे तपासावे

१६) भावनिक साक्षर आणि सक्षम आहे कि नाही हे तपासावे
१७) लैंगिक गरजा कश्या आहेत ते ओळखावे, ह्यामध्ये जास्त गुन्हे घडतात
१८) सोशल नेटवर्क आयडी तपासावा
१९) नात्यांमध्ये संबंध आहेत कि नाही हे समजायला वेळ जातो किंवा लग्नानंतर खूप उशिरा कळून येते.
२०) समलिंग जोडीदार समजून येवू शकतो पण उभयलिंगी नाही त्यामुळे लैंगिकतेबद्दल माहिती नीट काढाल.

२१) लग्नाला ठराविक कालावधी द्या, लग्न जोडीदाराची खात्री असते म्हणून काही दिवस किंवा काही महिने व्यक्ती स्वभावावर ताबा ठेवू शकतो.
२२) सुरुवातील दबाव येईल असे काहीतरी घडले तर मूळ स्वभाव बाहेर येवू शकतो.
२३) अगोदर नाते संबंध नसलेले बरे कारण नंतर उफाळून येवू शकतात. 
२४) काहींचे १ पेक्षा जास्त लग्न आणि कुटुंब असतात, कधी कधी समजून येत नाही किंवा जेव्हा संपत्ती वाटपाची वेळ येते तेव्हा समजून येते. अशी लोक त्यांचे आयुष्य लपवण्यात पारंगत असतात.
२५) जेन एक्स वाय झेड च्या नावावर सर्वांना स्वैराचारी ठरवू नका.

२६) लग्न म्हणजे पाळणाघर किंवा समुपदेशन केंद्र नव्हे, जो जसा जोडीदार असेल तो तसाच राहील.
२७) कोणी परिपूर्ण असते तर कोणी नसते, तुम्हाला समजून यायला पाहिजे, जसे कि एखाद्या जोडीदाराला मानसिक त्रास असू शकतो पण तो योग्य जोडीदार असू शकतो आणि तुम्ही तुमचे कुटुंब सहन करू शकतात तर त्यांना तुमच्या आयुष्यात आणू शकता. पण मानसिक आजार न सांभाळण्यासारखे असतात.
२८) अनेकदा आजू बाजूचे लोक पण योग्य सल्ला देतात तो अमलात आणण्याचा प्रयत्न करावा.
२९) स्त्रियांनी दुप्पट काळजी घ्यावी. भले काही स्त्रियांची नावे बातम्यात येतात त्यामुळे सर्वांना दोष देवू शकत नाही.
३०) स्त्री किंवा पुरुष जोडीदार जो चांगला असतो त्याला सर्वकाही सहन करावे लागते. कायदे वाईट स्त्री पुरुषांच्या बाजूने आहेत.
३१) तडजोड दीर्घकालीन आणि दोन्ही बाजूने पाहिजे कुटुंब सांभाळण्याकडे लक्ष पाहिजे, इतरांचे १ मिनिटांचे रील्स म्हणजे आयुष्य नाही.

धन्यवाद
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

मोबाईल क्रमांक फक्त appointment बुक करण्यासाठी आहे  

Latest
Previous
Next Post »
0 आपले विचार