स्ट्रीट फूड च्या व्यवसायात काही सोप्या टेक्निक्स लक्षात ठेवा भाग ५

मराठी पदार्थ भाग ५ मध्ये बघणार आहोत.

 सर्वात फेमस पदार्थ म्हणजे पोहा, पुढे यादी देत आहे त्यानुसार जा.


१) पोहे

२) उपमा

३) शिरा


ह्यामध्ये तुम्हाला जास्त काही एड करायची गरज नाही, पोहे कुठेही लावा लगेच संपले जातात. मला जोर्पयंत मित्राने अण्णा कडील मेदू वडा खायची सवय लावली नाही त्या अगोदर पोहे फिक्स असायचे. ऑफिस ला जातांना मध्येच एक जन टोप घेवून बसायचा पण गर्दी तुफान. तो परिसरच तसा होता म्हणून.


क्वालिटी तुम्ही जिथे आणि जसा व्यवसाय करणार आहात त्यानुसार ठेवा, जिथे कमी दर्ज्याचे जाते तिथे उत्तम दर्ज्याचे विकले जाणार नाही आणि कोणी विकत पण घेणार नाही.


इथे पदार्थ ओव्हन किंवा एअर फ्रायर मध्ये बनू शकतात कि नाही हे माहिती नाही.


हा व्यवसाय एक छोटासा टेबल टाकून, दुकान घेवून किंवा घरातून करू शकता.


जसे पहिल्या ३ भागांमध्ये सांगितले आहे त्यानुसार कमी जास्त करत व्यवसाय सुरु करू शकता.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Image by Mohammad Shahbaz Ansari from Pixabay

Previous
Next Post »
0 आपले विचार