गर्भ संस्कार आणि संस्कार मुलांना अद्भुत शक्ती असलेले सुपरहिरो बनवू शकतात



महाभारतातील अभिमन्यू ची कथा तुम्हाला माहितीच असेल. तो कमी वयाचा असून मोठ मोठे महारथी योद्धा जे चक्र्व्युव्ह भेदू नाही शकत ते अभिमन्यू भेदू शकला कारण त्याला गर्भात असताना चक्रव्यूह कसे भेदायचे हे सागितले गेले होते. ह्याला म्हणतात संस्काराची शक्ती.

तुम्ही तुमच्या मुलांना कुठले संस्कार देत आहात?

तुम्ही मुलांना जाणते अजाणतेपणे काय शिकवत आहात?

मुल गर्भात असतांना आई च्या भावना, कंपने आणि उर्जेने शिकतो तर जन्म झाल्यावर कुटुंबातील वातावरणाने शिकतो. हे शिक्षण त्याचा स्वभाव बनून जाते आणि तुम्हाला माहिती असेल कि स्वभाव हा बदलू शकत नाही.

स्वभाव हा अनुवांशिकतेवर देखील अवलंबून असतो. काहींचे जीन्स तसे असतात जेणेकरून पिढीजात संस्कार पुढे सरकत जातात व इथे गर्भसंस्कार किंवा संस्कार देण्याची गरज भासत नाही.

तुम्ही मुलांना कसे वाढवता?

किंवा

तुम्ही कुठल्या वातावरणात वाढला आहात?

जर मुलांचा विश्वास हा दृढ ठेवला व त्यासोबत त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले कि ते तुम्ही शिकवलेले कधीही विसरत नाही आणि त्यांची कृती देखील चुकत नाही.

पालकांना वाटत असेल कि ते मुलांना काही शिकवत नाही पण ते तुमचे वागणे बघून शिकत जातात व तो त्यांचा स्वभाव बनत जातो.

तुम्ही तुमच्या मुलांमध्ये कुठले सोफ्टवेअर इंस्टाल करत आहात?

तुमची तुमच्या मुलांना काळानुसार बदलणारे संस्कार देत आहात कि नाही?

संस्कृती, परंपरा आणि धर्म टिकवण्यासाठी अनेकदा जे गरजेचे नाही त्यावर लक्ष्य केंद्रित करून विना गरजेचे संस्कार टिकवून ठेवले जातात पण जे गरजेचे आहेत त्याकडे सपशेल दुर्लक्ष्य केले जाते.

आपले अध्यात्म इतके समृद्ध आहे कि त्यामधील थोडे थोडे ज्ञान देखील तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार स्वरुपात देत गेलात तरी ते त्यांच्यातील अद्भुत शक्ती जागृत करू शकतील.

मुलं काही एका दिवसात मोठी होत नाही तर काही वर्षे जावू द्यावी लागतात. २० वर्षांपासून जो प्रयोग सुरु केला होता त्याने ५ ते १० वर्षांनंतर रिझल्ट दिला ते देखील १०० %.

टीव्हीवर फक्त ठराविक चेहरे समोर येतात किंवा ज्यांना इमेज मार्केटिंग करायची असते त्यांची जीवनगाथा आपण टीव्हीवर बघतो पण असे अनेक आहेत जे टीव्हीवर येत नाही पण क्षमता तशीच किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. प्रसिद्ध होणे न होणे आपल्यावर अवलंबून आहे.

काही मुलांची मानसिक क्षमता वाढली, काही फक्त डोळ्यांनी कुणाही एका व्यक्तीला किंवा समूहाला संमोहित करू शकतात. काहींनी मेंदूची क्षमता वाढली व ते मेंदूच पुरेपूर वापर करू शकतात. काहींनी शारीरिक क्षमता वाढवली आणि ते खेळ व खेळ सलग्न क्षेत्रात पुढे गेलेले आहे. हि सर्व मुल काळानुसार जगत आहेत व त्यांना जसे आयुष्य पाहिजे तसे जगत आहे. कुठेही अतिरेक नाही किंवा काही नाही.

आपल्या अध्यात्मात १४ विद्या आणि ६४ कला आहेत आणि ह्या सर्व कलांमध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण पारंगत होते. आणि हेच संस्कार स्वरुपात तुमच्या मुलांना दिले जाते जेणेकरून ते एखाद्या सुपरहिरो सारखे आयुष्य जगू शकतील.

आपण ऐकतो ना कि ह्या व्यक्तीवर हा हा देव प्रसन्न आहे म्हणून ह्यामागे देखील संस्कारच वास्तव आहे. माझे अनेक विद्यार्थी आहेत जे बोलत असतात कि लक्ष्मी आणि कुबेर प्रसन्न आहे म्हणून, सरस्वती आणि गणपती प्रसन्न आहे म्हणून, कुलदैवत प्रसन्न आहे म्हणून त्याचे कारण संस्कार आहेत.

महादेव, लक्ष्मी, कुबेर, पार्वती, गणपती, विष्णू, सरस्वती किंवा इतर कुठलेही देव ह्यांनी तुम्हाला त्यांचा थोडा अंश जरी दिला तरी तुम्ही सुपरहिरो सारखे आयुष्य जगू शकतात पण त्यासाठी तुमचे शरीर संस्काराने तसे तयार झाले पाहिजे.

आताचे यशस्वी लोक ज्यांच्यावर शास्त्रज्ञानी संशोधन केले आहे त्यांनी सरावात अनेक वर्षे सातत्य ठेवले आहे किंवा त्यांना तसे संस्कार भेटले आहेत. हा सर्व डाटा उपलब्ध आहे, त्या सुपरहिरो लोकांवर प्रयोग केले गेले आहे, शेवटी शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला कि त्यांची मानसिकता, अनेक वर्षांचा सराव आणि संस्कार ह्यांनी त्यांना सुपर हिरो बनवले आहे.

मुल लहान असताना लवकर शिकते व आपल्यात कमी वयात अद्भुत शक्ती, क्षमता जागृत करते, त्याच मुलाचे वय वाढ गेल्यावर देखील तो आपली अद्भुत शक्ती किंवा क्षमता निर्माण करू शकतो फक्त थोडा वेळ जास्त लागेल बाकी सर्व नियम सारखेच आहे.

तुम्हालाही तुमच्या मुलांमध्ये, तुमच्यामध्ये अद्भुत क्षमता जागृत करायच्या आहेत? कोर्स आणि इतर सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे. आजच संपर्क करा.

तुमच्या म्हणजे पालकांच्या आणि मुलांच्या कुठल्याही समस्या का असेना त्या सर्वांवर समाधान आहे. तुमचा एक व्हास्टएप मेसेज तुमचे आयुष्य बदलू शकतो.

धन्यवाद
अश्विनीकुमार


मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार