आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची?




ध्यान:

झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्याची गरज भासत नाही.

जर गाढ शांत झोप लागत नसेल तर पुढे मी ध्यानाचे तीन प्रकार सांगत आहेत ते फोलोव करा.



पहिला प्रकार

मन एकाग्र करणे म्हणजे श्वासावर, विचारावर, वस्तूवर किंवा जी कृती करून आपले मन एकाग्र होते ती कृती करणे.



दुसरा प्रकार

विचारांवर लक्ष्य केंद्रित करणे व सकारात्मक विचार करणे. जर नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना सकारात्मक विचारांनी बदलणे.



तिसरा प्रकार

तुम्हाला तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष्य केंद्रती करायचे आहे. कल्पना करायची आहे कि प्राण उर्जा किंवा कॉस्मिक उर्जा हि तुमच्या शरीरातून वाहत आहे.



तुमच्या क्षमतेनुसार, मर्यादेनुसार ध्यान करा.



काहींना एक मिनिट पुरेसा आहे तर काहींना एक दिवस.



व्यायाम :



जिथे शारीरिक हालचाल होते त्याला व्यायाम बोलतात.



व्यायाम हा फक्त शारीरिक हालचालींशी निगडीत नाही तर मन आणि शरीर ह्यांचे मिलन आहे.



काहींना गैरसमज असतो कि व्यायाम बोलले कि फक्त शारीरिक हालचाल बाकी काही नाही.



योग, धावणे (जागेवर देखील धावू शकता.), सूर्यनमस्कार, पुश अप व इतर व्यायाम प्रकारांचा तुम्ही वापर करू शकता.



व्यायामाचे प्रकार असे निवडा कि ज्यामुळे सर्व शरीराचा व्यायाम झाला पाहिजे. दररोज व्यायाम करायची सवय लावून घ्या.



आहार : स्थानिक ऋतूनुसार जे पिकते तोच आहार घ्या. आहार सहसा बदलू नका. आहार तुमची पचनसंस्था मजबूत ठेवतो. परदेशी आहारापासून लांब रहा. चिभेचे चोचले पुरवू नका.



आजू बाजूचे वातावरण / सहवास : तुमच्या आजू बाजूचे वातावरण हे सकारात्मक पाहिजे. तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात राहत आहात ती लोक सकारात्मक, मुक्त मनाची, कामी येणारी आणि प्रोस्ताहन देणारी पाहिजे.



किती सोपे आहे हे तुम्हाला समजलेच असेल. आता ह्या क्षणापासून कायमस्वरूपी सवय लावून घ्या. जर स्वताहून सवय लागत नसेल तर तुम्ही प्रशिक्षक ची सेवा घेवू शकता. फुकटच्या नकारात्मक मित्रांच्या समूहापेक्षा एक व्यवसायिक फी घेणारा प्रशिक्षक कधीही चांगला. यशस्वी लोकांकडे मित्र कमी आणि प्रशिक्षक जास्त असतात.



धन्यवाद

अश्विनीकुमार


मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत


आकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली? भाग २ अर्नोल्ड श्वार्ज़नेगर


आकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली?

भाग २

अर्नोल्ड श्वार्ज़नेगर - व्यवसायिक बॉडीबिल्डर,  हॉलीवूड अभिनेता, सिने निर्माता, व्यवसायिक, लेखक आणि राजकीय नेता.

जेव्हा मी तरून होतो तेव्हा मी कल्पना करायचो कि मला जे हवे आहे ते मला मिळाले आहे, त्याचे अस्तित्व माझ्या आयुष्यात आहे, मी त्याचा अनुभव घेत आहे मग ते काहीही असो ते मला मिळायचेच.

आपले मन मेंदू प्रचंड शक्तिशाली आहे.

मला माझे पहिले मिस्टर युनिव्हर्स विजेतेपद मिळाले ते नंतर पण त्या अगोदर मी स्पर्धेत असा वावरायचो कि जसे ते विजेतेपद मलाच मिळालेले आहे. मला विजेता घोषित केलेले आहे. मी अनेकदा हे विश्वविजेतेपद पारितोषिक मिळवलेले आहे. मी विश्विजेता होणार ह्याबद्दल मला शंकाच नव्हती माझ्या मनात.

मी शरीरशौष्ठव स्पर्धेत विश्विजेता बनल्यावर मला प्रसिद्ध कलाकार देखील बनायचे होते. (म्हणजे एक यशाचे शिखर पार केल्यावर दुसर्या यशाच्या शिखरावर कशी उडी मारली जाते तुम्हाला ह्या उदाहरणावरून समजेल.) मी हाच नियम वापरला, स्वतःला यशस्वी अभिनेता समजायला लागलो, माझे एका पाठोपाठ सिनेमे यशस्वी होत आहेत आणि जगभर गाजत आहे असा सेट वर वावरायचो. आणि शेवटी माझे सिनेमे प्रचंड हिट होऊ लागले व मला इथे देखील जगप्रसिद्ध नायक बनवले, सिने क्षेत्रातील अनेक जागतिक पुरस्कार मी माझ्या नावावर केले.

हाच मन मेंदूचा नियम वापरून मला व्यवसायिक व्हायचे होते मी झालो. मला लेखक व्यायचे होते मी झालो. मला राजकारणी व्हायचे होते मी झालो.

हि मन मेंदूची शक्ती क्षमता तुमच्या आमच्या आणि सर्वांची आहे. हे एक जिवंत उदाहरण आहे ज्या व्यक्तीने सर्वकाही आपल्या मन, मेंदू च्या जोरावर मिळवले.

मला जितके यशस्वी, श्रीमंत, समृद्ध आणि कठीण प्रसंगावर मात करणारे भेटले त्या सर्वांची कथा एकसारखीच आहे. एक आजारावर मात करत आयुष्य जगत आहे, एकाने कठीण आर्थिक संकटांना तोंड दिले, एकाने नैराश्य झटकत यशाची उंच भरारी घेतली आणि इतर अनेक ज्यांनी संकटांना तोंड देत यश सुख समृद्धी आणि शांती ने भरलेले आयुष्य जगत आहेत.

(गुगल सर्च कराल किती विश्विजेतेपद मिळवले आहे ते, कृती, परिस्थिती बोलते ना कि फक्त सकारात्मक बोलणे आहे. पैसा असेल तर अमेरिकेत देखील जावून येवू शकता व त्यांना भेटू शकता.)

आपल्या मन, मेंदू आणि विचारात इतकी शक्ती आहे कि पुढील क्षणी आपण आपले आयुष्य बदलू शकतो.

तुम्ही इथे तुमचे नकारात्मक आयुष्य जगत आहात आणि तुमच्याच परिसरात एखादी व्यक्ती मन, मेंदू आणि विचारांचा वापर करून सकारात्मक आयुष्य जगत आहे, ती तिच्या आयुष्यात चमत्कार घडवत आहे. अश्या व्यक्ती तेव्हाच तुमच्या आयुष्यात येतील जेव्हा तुम्ही तुमचे अंतर्मन आणि दृष्टीकोन बदलाल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

ऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc

आकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली? भाग १ जिम केरी - हॉलीवूड अभिनेता



द मास्क सिनेमा आठवतोय तुम्हाला? हिरवा चेहरा असलेला सुपर हिरो? कॉमेडी सिनेमा? हसून हसून पोट दुखेल असा? त्या सिनेमात काम करणाऱ्या कलाकाराचे नाव आहे जिम केरी.

जिम केरी लहनपणी मध्यम वर्गीय आयुष्य जगत होता पण एकदा अचानक एक मोठे संकट आले व त्याच्या कुटुंबाला स्थलांतर करावे लागले, जिम केरी ला शाळेसोबत घर चालवण्यासाठी काम देखील करावे लागले. त्यांना गाडीमध्ये रहावे लागले होते.

जिम केरी जीवन जगण्यासाठी धडपड करत होता व त्याला कलाकार देखील बनायचे होते, अशीच मेहनत घेताना त्याला एका सिरीयल मध्ये काम मिळते. जिम केरी मेलिसा नावाच्या वेटर सोबत लग्न करतो, पण काही वर्षांनी त्यांचा वाईट पद्धतीने घटस्फोट होतो.

जिथे वाटत होते कि सर्वकाही ठीक होईल पण तिथे देव काहीतरी वेगळीच योजना आखून बसलेला असतो.

जिम केरी प्रयत्न करणे सोडत नाही. तो शून्यात असतो. आणि इथे आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करतो. आपण बोलतो ना कल्पना, सकारात्मक विचार भावना कंपने आणि उर्जा आपले आयुष्य बदलते ते? ते कसे आता पुढे सांगतो.

जिम केरी सतत कल्पना करायचा कि दिग्दर्शकाला त्याची एक्टिंग आवडली आहे, लोक त्याच्या एक्टिंग ची स्तुती करत आहेत, एक्टिंग चांगली केली अशी प्रशंसा करत आहेत.

जिम केरी बोलत होता कि त्याच्याकडे कुठलीच संधी उपलब्ध नव्हती पण वेळ होता म्हणून तो सकारात्मक विचार आणि कल्पना करत होता. ज्यामुळे मनाला बरे वाटत होते.

काम आणि घरातील अंतर हे गाडीने पार करावे लागत होते आणि तेव्हा जिम केरी ला फावला वेळ भेटायचा तेव्हा तो विचार करायचा कि "मला सर्वकाही भेटले आहे, मला जे हवे आहे ते भेटले आहे. ते आता माझ्याकडे नाही पण ह्या जगात अस्तित्वात आहे आणि ते माझ्या आयुष्यात येणारच."

जिम केरी स्वतःच स्वतः साठी चेक लिहायचा आणि असे समजायचा कि दिग्दर्शकाने तो चेक दिला आहे आणि हा सराव सतत ३ वर्षे त्याने केला आहे. चेक खिशात ठेवून खराब होत होते.

असेच दिवसामागून दिवस गेले आणि शेवटी Dumb and Dumber ह्या सिनेमासाठी जिम केरी ला १० दशलक्ष डॉलर चा चेक देण्यात आला.

अनेक मुलाखतीमध्ये जिम केरी ने अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करून यशस्वी कसा झाला, प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी केली हे सांगितले आहे.

हो तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता, तुम्ही देखील तुमच्या समस्यांवर मात करू शकता, तुम्ही देखील तुमचे ध्येय पूर्ण करू शकता, तुम्ही देखील आजारपणावर मात करू शकता, हो सर्वकाही शक्य आहे आणि हि क्षमता जनजात नैसर्गिक तुमच्यात आहेत.

पुढील रविवारी अजून एक आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून यशस्वी झालेल्या व्यक्तीची यशोगाथा घेवून येत आहे.

पुढचा विषय तुम्ही निवडा मी त्यावर लेख लिहील. विषय कुठलाही असो संकोचू नका, इनबॉक्स किंवा व्हास्टएप मध्ये मेसेज कराल.

अश्विनीकुमार

#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

ऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc

विवाहबाह्य संबंध सुरवात, प्रकार आणि तीव्रता



विवाहबाह्य संबंध ह्याकडे आपण एकाच नजरेने बघू शकत नाही. ह्यामध्ये विविधता असते, त्यानुसार आपल्याला त्याच्याकडे बघितले पाहिजे जेणेकरून भविष्यात होणारे कौटुंबिक वादविवाद आणि गुन्हे हे थांबवता येतील.

अ) विवाहाअगोदर असलेले संबंध :
१) नातेसंबंधातील चुलत, मावस, दूरचे भाऊ बहिण ह्यांच्यामध्ये असलेले संबंध किंवा समवयानुसार नात्यातील जुळलेले संबंध
२) ओळखीच्या पैकी असलेले संबंध, विविध कारणाने बघण्यात असलेली व्यक्ती, परिसरात राहणारी, किंवा नातेवाईक सोडून ओळखीचे असलेले.
३) अनोळखी नात्यातून तयार झालेले संबंध
४) ऑनलाईन तयार झालेले संबंध

हे संबंध विविध कारणांनी जुळतात. काही फक्त एकच कारण नसते. प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असते. एकदा का मुल कारण भेटले कि आपण योग्य उपाय किंवा निर्णय घेवू शकतो. इथे समजूतदारपणा लागतो.

विविध कारणांनी जेव्हा प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह होतो तेव्हा ह्या संबंधांचे काय होते?

१) संबंध कायमस्वरूपी विसरले जातात.
२) संबंध लक्ष्यात असतात पण भावना जुळलेल्या नसतात.
३) संबंध लक्ष्यात देखील असतात व भावना देखील जुळलेल्या असतात.
४) संबंध मैत्रीचे ठेवतात.
५) संबंध थोडे पुढचे ठेवलेले असतात.
६) जुने जसे चालू होते तसेच संबंध सुरु ठेवले जातात.
७) लग्नाचा जोडीदार नाकारून पहिल्या जोडीदाराला पसंदी दिली जाते.
८) दोन्ही बाजूने किंवा एका बाजूने हिंसा केली जाते.

लग्नानंतर जुळलेले संबंध

लग्नानंतर विविध कारणांनी संबंध जुळले जातात त्याची कारणे हि वेगळी असतात.

१) भावनिक करणे.
२) शारीरिक कारणे
३) कौटुंबिक कारणे.
४) लैंगिक कारणे.
५) आर्थिक कारणे
६) मुलभूत कारणे
७) समलिंगी जोडीदार.

जो नवीन कायदा बनवला आहे ज्यामध्ये त्वरित कारवाई चे आदेश दिले आहे त्याचा वापर करून कायदेशीर खंडणी वसूल केली जाते.

अनेकदा जोडीदाराकडून विवाहबाह्य संबंध ठेवायला परवानगी दिली जाते त्याची कारणे वेगळी आहे.

विवाहबाह्य संबंधाला वयाची अट नाही. तरून ते म्हातारपणाचे विवाहबाह्य संबंध असतात त्यामुळे तुम्ही वयाकडे बघून काहीही बोलू शकत नाहीत.

काही विवाहबाह्य संबंध हे पकडले जातात तर काही पकडले जात नाहीत. काही जोडीदार कानाडोळा करतात तर काही तीव्र आक्षेप घेतात. इथे देखील त्यांचे स्वतः चे काही निर्णय जे परिस्थिती नुसार घेतलेले असतात.

अनेकदा जोडीदार मुलांच्या भविष्याकडे बघून दुर्लक्ष्य करतात. समाजाचा दबाव हा देखील एक भाग आहे जिथे अब्रू जावू नये म्हणून घरातील गोष्ट हि घरातच ठेवली जाते.

जर तुम्हाला समस्याचे समाधान पाहिजे तर तुम्ही सर्वांना एकच नियम लावू शकत नाही. घटस्फोट घेणे, दुसरे घर घेवून राहणे, आर्थिक जबाबदारी, भावनिक आणि लैंगिक गरजा ह्या देखील बघणे महत्वाचे आहे.

स्त्री असू दे किंवा पुरुष ह्या दोघांना देखील दोष दिला जातो. घटस्फोटीत स्त्रिया ह्यांच्याकडे संधी म्हणून बघितली जाते आणि पुरुषांचे दोष काढले जातात त्यामुळे ह्या दोघांचे जगणे हे मुश्कील होवून जाते.

चीड एकाच गोष्टीची येते जेव्हा जोडीदाराची हत्या, मुलांची हत्या केली जाते तेव्हा, हत्या करण्यापेक्षा वेगळे झालेले बरे. हत्या म्हणजे हि लोक मनुष्य प्राण्यात राहण्याच्या लायकीची नाही आहे.

समस्या आहे तिथे समाधान पण आहे. जे योग्य समाधान आहे तेच निवडा. भावनांना तुम्ही जखडून ठेवू शकत नाही. भावना ह्या एका क्षणात देखील बदलतात. हे मी अनुभवले देखील आहे आणि बघितले देखील आहे.

योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन तुम्हाला ह्या सर्व परिस्थिती मधून बाहेर काढू शकते. कृपया घरगुती उपाय करून परिस्थिती अजून चिघळवू नका नाहीतर नंतर परिणाम अजून वाईट होत जातील.

#अश्विनीकुमार

#बालक #पालक #कुटुंब आणि #नातेसंबंध

#वैवाहिकजीवन #मुलांचेसंगोपन #गर्भसंस्कार #शिक्षण #आर्थिकआयुष्य #लैंगिकआयुष्य #विवाहबाह्यसंबंध #पती #पत्नी #तणाव #नैराश्य #भांडणे #कौटुंबिकसमस्या #पुरुषअधिकार #मानसिकशोषण #शारीरिकशोषण #लैंगिकशोषण

appointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : Balak Palak Children Parents

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

आपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा?


आपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा?

वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्या दोन्ही मार्गांनी तुम्ही तुमच्या समस्या दूर करू शकता.

अनेकदा इंटरनेट वर मी बघतो कि विज्ञान आणि अध्यात्म ह्या मध्ये सतत वाद सुरु असतो आणि त देखील कमेंट मध्ये, पण ह्याचे मोठे नुकसान हे जी व्यक्ती समस्येने ग्रस्त आहे त्या व्यक्तीवर होतो.

मी नेहमी सांगतो कि तुमचा ज्या वर विश्वास आहे तो मार्ग निवडा आणि तीच मार्ग तुम्हाला तुमची समस्या दूर करून देईल. जर वैज्ञानिक मार्गाने तुमची समस्या दूर होऊ शकते तर वैज्ञानिक मार्ग निवडा आणि जर अध्यात्मिक मार्गाने तुमची समस्या दूर होऊ शकते तर अध्यात्मिक मार्ग निवडा.

ना विज्ञान परिपूर्ण आहे आणि नाही अध्यात्म, उत्तर हे तुम्हाला तुमच्या अनुभवातच सापडेल आणि तेच अंतिम सत्य आहे. माझ्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे विज्ञानाने सांगितले कि व्यक्ती कधीच बरी होऊ शकत नाही तिथे त्या व्यक्तीला पूर्ण बरे अध्यात्माने केले आणि जिथे अध्यात्माने सांगितले कि व्यक्ती बरी होऊ शकत नाही तिथे बरे विज्ञानाने केले.

ह्या अध्यात्म आणि विज्ञानाच्या भांडणात निसर्गाला आणि ब्रम्हांडाला विसरू नका. कारण शेवटी हेच शक्तिशाली आहेत आणि बाकी अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोघांवर अवलंबून आहे.

विज्ञानाने जसे फेल झालेली किडनी बसवण्याचा देखील शोध लावला तिथे किडनी चोरण्याचा देखील शोध लागला. अध्यात्मात समस्या दूर देखील केल्या जातात तर दुसरीकडे लोकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या लुबाडले देखील जाते. तुम्हाला तुमची सद्विवेकबुद्धी वापरायची आहे.

जिथे झोपेच्या पक्षाघाताला मानसिक आजार संबोधतात तिथे दुसरीकडे दुष्ट शक्तींनी केलेला आघात देखील संबोधतात. ज्यामध्ये मुळ कारण आहे त्या मार्गानेच उपचार होईल, बाकी वाद विवाद हे अजून समस्या वाढवत जातील. कारण एकदा का व्यक्तीचा दोन्ही मार्गावरील विश्वास उडाला कि तो काही बरा होत नाही.

घरात कोणीतरी आहे, शरीरावर कोणतरी बसलेले आहे, बोलू शकत नाही, कुणाला आवाज जात नाही आणि खरच हे झोपेत होते कि ते जागे असतात हा देखील समजत नाही इतके वास्तव अनुभव असतात ते म्हणजे विचार करा ती व्यक्ती कुठल्या परिस्थिती मधून जात असते ते.

शरीर जे अनुभवणार तेच वास्तव. मग शरीराने स्वप्नातील हृदय विकाराचा झटका अनुभवला कि ते वास्तव, जेव्हा घरचे सकाळी उठवायला जातात तेव्हा ती व्यक्ती मृत झालेली असते, पण त्याच वेळेस योग्य उपचार मिळाले असते तर प्राण वाचवता आले असते. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये मिळतील.

जे धडधाकट होते त्यांना मधुमेह कसा झाला? जे ठणठणीत होते त्यांना कर्करोग कसा झाला? जेवण थोडे असून सुद्धा शरीराची जाडी वाढत का आहे? जास्त जेवूनसुद्धा शरीर बारीक का आहे?

९८ % आपण अंतर्मनात जे आहे त्यानुसार आयुष्य जगत असतो आणि ते आपल्याला समजून देखील येत नाही. आपल्या अंतर्मनात सर्वकाही दडलेले आहे.

तुम्हाला श्रीमंत बनायचे आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला आजारपण दूर करायचे आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला परीक्षा पास व्हायची आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला नोकरी मिळवायची आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला प्रेमासाठी, लग्नासाठी जोडीदार आकर्षित करायचा आहे?
अंतर्मनावर काम करा.

कुठल्याही शास्त्रापेक्षा स्वतःला शक्तिशाली समजा आणि मगच उपचाराला लागा. १०० % खात्री देवून सांगतो कि तुम्ही जो काही मार्ग निवडाल त्याने तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल.

जिथे मी आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, वास्तू शास्त्र, उर्जा शास्त्र आणि इतर मार्गांनी लोकांच्या समस्येवर यशस्वी यशस्वी उपचार केले तिथे दुसरीकडे अध्यात्म तंत्र साधनेचा वापर करून देखील यशस्वी उपचार केलेले आहेत. आणि ह्या दोन्ही विद्यांचे मूळ हे आपल्या पौराणिक शास्त्रात किंवा ज्ञानात आढळून येईल.

तुमच्याकडे एक समस्या असेल तर त्या समस्येवर मात करण्याचे, ती समस्या दूर करण्याचे हजारो नाही तर लाखो मार्ग आहेत.

#अश्विनीकुमार

डिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत?









जर शरीराला बाहेरून जखम झाली तर ती व्यक्तीला दिसून येते, ती व्यक्ती धावतपळत जावून उपचार करून घेते. जर आतमध्ये जखम झाली तर त्या व्यक्तीला अनेक समस्या निर्माण होतात, वेदना असह्य होतात मग डॉक्टर कडे जावून, एमआरआय, सिटी स्केन, एक्स रे काढून त्या आतील जखमेवर उपचार सुरु करून ती जखम बरी करतात.

जेव्हा व्यक्तीला मानसिक जखम होते तेव्हा ती जखम दिसून येत नाही, तिची तीव्रता समजून येत नाही. ती व्यक्ती बाहेरून हसत खेळत आयुष्य जगत असते पण जेव्हा एकट्यात असते तेव्हा आपल्या भावना रडून ओरडून किंवा स्वतःला त्रास देवून व्यक्त करते पण कुणाकडेही ती व्यक्त होत नाही.

मानसिक जखम जितकी खोल तितके तिचे परिणाम गंभीर. अश्या व्यक्ती स्वतःला गंभीर इजा, दुखापत करून घेवू शकतात पण त्या जखमा कपड्यांमध्ये झाकल्या जातात किंवा झाकून ठेवतात. सतत च्या नकारात्मक विचारांमुळे शारीरिक आजार बळावतात. त्या आजारांचे रुपांतर जीवघेण्या आजारात होते. उपचारांना प्रतिसाद देत नाही.

मानसिक आजार आहे हे केव्हा कळते जेव्हा ती व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते, उपचारांना प्रतिसाद देत नाही तेव्हा. जीव वाचला तर ठीक नाहीतर परत त्या व्यक्तीला संधी भेटत नाही. फक्त कुटुंबातील सदस्यांना माहिती असते पण बाहेरच्या लोकांना सामान्य व्यक्ती दिसून येते.

मानसिक आजार कायमस्वरूपी बरे करू शकतो का?

हो मानसिक आजार कायमस्वरूपी बरे करू शकतो. फक्त मान्य केले पाहिजे कि मानसिक आजार आहे आणि पारंपारिक घरगुती उपचारपद्धती काम करत नसेल तर लगेच तज्ञांची मदत घ्या. जितका जुना आजार तितका तो बरा व्हायला वेळ लागतो पण तो पूर्णपणे बरा होतो.

#अश्विनीकुमार

#मानसशास्त्र आणि #आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1